< एस्तेर 5 >

1 तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.
καὶ ἐγενήθη ἐν τῇ ἡμέρᾳ τῇ τρίτῃ ὡς ἐπαύσατο προσευχομένη ἐξεδύσατο τὰ ἱμάτια τῆς θεραπείας καὶ περιεβάλετο τὴν δόξαν αὐτῆς καὶ εἰσελθοῦσα πάσας τὰς θύρας κατέστη ἐνώπιον τοῦ βασιλέως καὶ αὐτὸς ἐκάθητο ἐπὶ τοῦ θρόνου τῆς βασιλείας αὐτοῦ
2 त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.
καὶ ἄρας τὴν χρυσῆν ῥάβδον ἐπέθηκεν ἐπὶ τὸν τράχηλον αὐτῆς καὶ ἠσπάσατο αὐτὴν καὶ εἶπεν λάλησόν μοι
3 मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
καὶ εἶπεν ὁ βασιλεύς τί θέλεις Εσθηρ καὶ τί σού ἐστιν τὸ ἀξίωμα ἕως τοῦ ἡμίσους τῆς βασιλείας μου καὶ ἔσται σοι
4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.”
εἶπεν δὲ Εσθηρ ἡμέρα μου ἐπίσημος σήμερόν ἐστιν εἰ οὖν δοκεῖ τῷ βασιλεῖ ἐλθάτω καὶ αὐτὸς καὶ Αμαν εἰς τὴν δοχήν ἣν ποιήσω σήμερον
5 तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले.
καὶ εἶπεν ὁ βασιλεύς κατασπεύσατε Αμαν ὅπως ποιήσωμεν τὸν λόγον Εσθηρ καὶ παραγίνονται ἀμφότεροι εἰς τὴν δοχήν ἣν εἶπεν Εσθηρ
6 ते द्राक्षरस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले “तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरीसुध्दा ती मान्य होईल.”
ἐν δὲ τῷ πότῳ εἶπεν ὁ βασιλεὺς πρὸς Εσθηρ τί ἐστιν βασίλισσα Εσθηρ καὶ ἔσται σοι ὅσα ἀξιοῖς
7 एस्तेरने उत्तर दिले, “माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की,
καὶ εἶπεν τὸ αἴτημά μου καὶ τὸ ἀξίωμά μου
8 जर महाराजाची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन.”
εἰ εὗρον χάριν ἐνώπιον τοῦ βασιλέως ἐλθάτω ὁ βασιλεὺς καὶ Αμαν ἐπὶ τὴν αὔριον εἰς τὴν δοχήν ἣν ποιήσω αὐτοῖς καὶ αὔριον ποιήσω τὰ αὐτά
9 हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन: स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला.
καὶ ἐξῆλθεν ὁ Αμαν ἀπὸ τοῦ βασιλέως ὑπερχαρὴς εὐφραινόμενος ἐν δὲ τῷ ἰδεῖν Αμαν Μαρδοχαῖον τὸν Ιουδαῖον ἐν τῇ αὐλῇ ἐθυμώθη σφόδρα
10 १० तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले.
καὶ εἰσελθὼν εἰς τὰ ἴδια ἐκάλεσεν τοὺς φίλους καὶ Ζωσαραν τὴν γυναῖκα αὐτοῦ
11 ११ आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.
καὶ ὑπέδειξεν αὐτοῖς τὸν πλοῦτον αὐτοῦ καὶ τὴν δόξαν ἣν ὁ βασιλεὺς αὐτῷ περιέθηκεν καὶ ὡς ἐποίησεν αὐτὸν πρωτεύειν καὶ ἡγεῖσθαι τῆς βασιλείας
12 १२ हामान म्हणाला, “एवढेच नाहीतर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर माझ्याशिवाय कोणालाच बोलावले नाही. आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे.
καὶ εἶπεν Αμαν οὐ κέκληκεν ἡ βασίλισσα μετὰ τοῦ βασιλέως οὐδένα εἰς τὴν δοχὴν ἀλλ’ ἢ ἐμέ καὶ εἰς τὴν αὔριον κέκλημαι
13 १३ पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.”
καὶ ταῦτά μοι οὐκ ἀρέσκει ὅταν ἴδω Μαρδοχαῖον τὸν Ιουδαῖον ἐν τῇ αὐλῇ
14 १४ मग हामानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्यास म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो पन्नास हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.” हामानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला.
καὶ εἶπεν πρὸς αὐτὸν Ζωσαρα ἡ γυνὴ αὐτοῦ καὶ οἱ φίλοι κοπήτω σοι ξύλον πηχῶν πεντήκοντα ὄρθρου δὲ εἰπὸν τῷ βασιλεῖ καὶ κρεμασθήτω Μαρδοχαῖος ἐπὶ τοῦ ξύλου σὺ δὲ εἴσελθε εἰς τὴν δοχὴν σὺν τῷ βασιλεῖ καὶ εὐφραίνου καὶ ἤρεσεν τὸ ῥῆμα τῷ Αμαν καὶ ἡτοιμάσθη τὸ ξύλον

< एस्तेर 5 >