< एस्तेर 5 >
1 १ तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.
And it comes to pass on the third day, that Esther puts on royalty, and stands in the inner-court of the house of the king in front of the house of the king, and the king is sitting on his royal throne, in the royal-house, opposite the opening of the house,
2 २ त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.
and it comes to pass, at the king’s seeing Esther the queen standing in the court, she has received grace in his eyes, and the king holds out to Esther the golden scepter that [is] in his hand, and Esther draws near, and touches the top of the scepter.
3 ३ मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
And the king says to her, “What do you [want], Esther, O queen? And what [is] your request? To the half of the kingdom—and it is given to you.”
4 ४ एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.”
And Esther says, “If to the king [it be] good, the king comes in, and Haman, today, to the banquet that I have made for him”;
5 ५ तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले.
and the king says, “Hurry Haman—to do the word of Esther”; and the king comes in, and Haman, to the banquet that Esther has made.
6 ६ ते द्राक्षरस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले “तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरीसुध्दा ती मान्य होईल.”
And the king says to Esther, during the banquet of wine, “What [is] your petition? And it is given to you; and what [is] your request? To the half of the kingdom—and it is done.”
7 ७ एस्तेरने उत्तर दिले, “माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की,
And Esther answers and says, “My petition and my request [is]:
8 ८ जर महाराजाची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन.”
if I have found grace in the eyes of the king, and if to the king [it be] good, to give my petition, and to perform my request, the king comes, and Haman, to the banquet that I make for them, and tomorrow I do according to the word of the king.”
9 ९ हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन: स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला.
And Haman goes forth on that day rejoicing and glad in heart, and at Haman’s seeing Mordecai in the gate of the king, and he has not risen nor moved for him, then is Haman full of fury against Mordecai.
10 १० तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले.
And Haman forces himself, and comes into his house, and sends, and brings in his friends, and his wife Zeresh,
11 ११ आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.
and Haman recounts to them the glory of his wealth, and the abundance of his sons, and all that with which the king made him great, and with which he lifted him up above the heads and servants of the king.
12 १२ हामान म्हणाला, “एवढेच नाहीतर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर माझ्याशिवाय कोणालाच बोलावले नाही. आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे.
And Haman says, “Indeed, Esther the queen brought none in with the king, to the feast that she made, except myself, and also for tomorrow I am called to her, with the king,
13 १३ पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.”
and all this is not profitable to me, during all the time that I am seeing Mordecai the Jew sitting in the gate of the king.”
14 १४ मग हामानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्यास म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो पन्नास हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.” हामानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला.
And his wife Zeresh says to him, and all his friends, “Let them prepare a tree, in height fifty cubits, and in the morning speak to the king, and they hang Mordecai on it, and go in with the king to the banquet rejoicing”; and the thing is good before Haman, and he prepares the tree.