< एस्तेर 4 >

1 जे झाले ते सर्व मर्दखयाला समजले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि गोणताटाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासली. तो बाहेर नगरामध्ये आणि मोठयाने आक्रोश करत आणि दुःखाने रडत निघाला.
モルデカイ凡てこの爲れたる事を知しかばモルデカイ衣服を裂き麻布を纒ひ灰をかぶり邑の中に行て大に哭き痛く號び
2 पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला, कारण गोणताटाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही राजद्वारातून आत जाण्यास मनाई होती.
王の門の前までも斯して來れり 其は麻布をまとふては王の門の内に入ること能はざればなり
3 राजाचा हुकूम ज्या ज्या प्रांतात पोचला तेथे तेथे यहूद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि गोणताटाची वस्त्रे घालून बहुतेक यहूदी राखेत पडून राहिले.
すべて王の命とその詔書と到れる諸州にてはユダヤ人の中におほいなる哀みあり斷食哭泣號呼おこれり また麻布をまとふて灰の上に坐する者おほかりき
4 जेव्हा एस्तेरच्या दासी आणि तिचे सेवक खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयाविषयी सांगितले, तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु: खी आणि नाराज झाली. गोणताटाच्या ऐवजी घालायला तिने मर्दखयाकडे वस्रे पाठवली, पण त्याने ती स्विकारली नाहीत.
ここにエステルの侍女およびその侍從等きたりてこれを告ければ后はなはだしく憂ひ衣服をおくり之をモルデカイにきせてその麻布を脱しめんとしたりしがうけざりき
5 एस्तेरने मग हथाकाला बोलावले, हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एकजण होता. हे काय व कशासाठी आहे हे समजावे म्हणून मर्दखयाकडे जाऊन चौकशी करण्याची तिने त्यास आज्ञा दिली.
ここをもてエステルは王の侍從の一人すなはち王の命じて己に侍らしむるハタクといふ者を召しモルデカイの許に往きてその何事なるか何故なるかを知きたれと命ぜり
6 तेव्हा राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळया जागेत मर्दखय होता तिथे हथाक गेला.
ハタクいでて王の門の前なる邑の廣場にをるモルデカイにいたりしに
7 मर्दखयाने मग त्यास जे घडले ते सर्व सांगितले. यहूद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती चांदी जमा करायचे हामानाने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले.
モルデカイおのれの遇たるところを具にこれに語りかつハマンがユダヤ人を滅ぼす事のために王の府庫に秤りいれんと約したる銀の額を告げ
8 यहूद्यांच्या वधाची आज्ञा शूशन नगरात दिली होती त्या राजाज्ञेची प्रतही तिला दाखवण्यासाठी दिली. एस्तेरने राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी दयेची याचना व विनंती करावी ही जबाबदारी त्याने तिच्यावर सोपवली.
またその彼等をほろぼさしむるためにシユシヤンにおいて書て與へられし詔書の寫本を彼にわたし之をエステルに見せかつ解あかし また彼に王の許にゆきてその民のためにこれに矜恤を請ひその前に願ふことを爲べしと言つたへよと言り
9 म्हणून हथाकाने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखयाने जे सांगितले ते सर्व कळवले.
ハタクかへり來りてモルデカイの言詞をエステルに告ければ
10 १० मग मर्दखयासाठी एस्तेरने हथाकाजवळ निरोप दिलाः
エステル、ハタクに命じモルデカイに言をつたへしむ云く
11 ११ ती म्हणाली, “मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी मग तो पुरुष असो की स्त्री, राजाचा एकच कायदा आहेः तो म्हणजे मृत्यूदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या मनुष्यास जीवदान मिळते. आणि मला तर राजाकडून गेल्या तीस दिवसात बोलावणे आलेले नाही.”
王の諸臣がよび王の諸州の民みな知る男にもあれ女にもあれ凡て召れずして内庭に入て王にいたる者は必ず殺さるべき一の法律あり されど王これに金圭を伸れば生るを得べし かくて我此三十日は王にいたるべき召をかうむらざるなり
12 १२ मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयाला मिळाला.
エステルの言をモルデカイに告げけるに
13 १३ मर्दखयाला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने एस्तेरला आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यहूदी लोकांतून सुरक्षित सुटशील असे समजू नकोस.
モルデカイ命じてエステルに答へしめて曰く 汝王の家にあれば一切のユダヤ人の如くならずして免かるべしと心に思ふなかれ
14 १४ तू आत्ता गप्प बसलीस तर यहूद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून सुटका आणि मुक्ती मिळेल, पण तुझा आणि तुझ्या पित्याच्या घराण्याचा मात्र नाश होईल. कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.”
なんぢ若この時にあたりて默して言ずば他の處よりして助援と拯救ユダヤ人に興らんされど汝どなんぢの父の家は亡ぶべし 汝が后の位を得たるは此のごとき時のためなりしやも知るべからず
15 १५ तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठवले:
エステルまたモルデカイに答へしめて曰く
16 १६ “जा, शूशनमधल्या सर्व यहूद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आत जाणे नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मरण पावले तर मरण पावले.”
なんぢ往きシユシヤンにをるユダヤ人をことごとく集めてわがために斷食せよ 三日の間夜晝とも食ふことも飮むこともするなかれ 我とわが侍女等もおなじく斷食せん しかして我法律にそむく事なれども王にいたらん 我もし死べくば死べし
17 १७ तेव्हा मर्दखय निघून गेला आणि एस्तेरने त्यास जे करायला सांगितले तसे त्याने केले.
ここにおいてモルデカイ往てエステルが凡ておのれに命じたるごとく行なへり

< एस्तेर 4 >