< इफि. 6 >

1 मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे.
Mubhana bhogopaji apafi bhenyu hu shi Ngolobhe afuatanaje ene ye lyoli.
2 “आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
“Obhonje ne neshinshi hwa isewaho na hwa nyina waho” (Afutanaje ene ndajinzyo eya hwande yeli ne ndagano),
3
“nkasibhe nafu hulimwe nkamukhalaje olwizyo otali munsi.”
4 आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
Amwe mwa baba, mganje bhavisye abahna bhenyu na bhasababisye ilyoyo, baada yesho, walelaji na bhasunde hundajizyo zya Gosi.
5 दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा.
Amwe mwabhomba mbombo bhogopaji agosi bhenyu wepa pansi neheshima engosi na yinje no owoga wawafuma. mumoyo genyu mubhewoga hwa bhene nanshi satihu mwogopa omwene Kilisti.
6 मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा,
Uwoga wenyu usahabhe pala tu agosi bhenyu na bhabhenya na wasovye. Baada yakwe, mubhanje woga nanshi atumwa bha Kilisti. Bhombaji zya songwa Ongolobhe afume mmoyo genyu,
7 ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा,
bhabhombeleji hu moyo genyu gonti, afuatanaje mhubhombela Gosi wala se bhantu,
8 प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल.
mhwanziwa amanye aje kilo libhombo omuntu lya bhomba, aipata e zawadi afume hwa Gosi, atabhe tumwa au mwigule.
9 आणि मालकांनो तुम्ही, त्यांना न धमकावता, तुमच्या दासाशी तसेच वागा, तुम्हास हे ठाऊक आहे की, दोघाचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
Namwe mwagosi bhombaji shesho hwa tumwa bhenyu. Mganje abhogofye nkamumenye aje Ogosi wabhonti yayola waliwanya. Nkamumanye aje na humo apendelele mhati yakwe.
10 १० शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
Esho mubhanje ni lyomi hwa gosi mvuwezo wilyomi lyakwe.
11 ११ सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
Kwati esilaha zyonti zya Ngolobhe, ili nkamuwezye ahwemelele shingunga sha setano.
12 १२ कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. (aiōn g165)
Afuatanaje ibhoo lyetu seli danda ne nyama, huli zaidi ye umwene noutawala we roho na tabhala bha munsi bhe mabhibhi ne nkisi, shizanye empopo hu sehemu ya humwanya. (aiōn g165)
13 १३ या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल
Eshi kwati esilaha zyonti zya Ngolobhe, ili nkamuwezye akhala sawa ashi zanye amabhibhi hunsiki ezi embibhi. Baada ya male kila hantu, myemelela sawa.
14 १४ तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा.
Hwahuje eemlelaji sawa. Bhombaji eshi afutanaje mfungwile nkanda ne lyoli pashifubha.
15 १५ शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला.
Bhombaji eshi mubhanje mkwete ouhaani mmagaga genyu walombe lele izu lye waushe.
16 १६ नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा.
Hu kila namna mweje engao ye lweteshelo yayaihumwavwa azimwe olutisyo lwa bhibhi.
17 १७ आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या,
Kwataji enkofilwa ye woziwa ni panga lye shoroho, ambalyo lizu lya Ngolobhe.
18 १८ प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पाहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
epo ne mputo zyayo ne dua. Putaji huu shirolo umuda gwonti. Enyenyo ene mubhanje bha hwenye muda gwonti hu uvumilivu wonti ne mpute zyabhaputile aputi bhonti.
19 १९ आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
Putaji sababu ya huline, ili nkepwe izu nihwigula ilomu lyane. Putaji aje nkenele zyaje huu huu dandamazu elyoli ehobhela yeyanjila olulombelelo.
20 २० मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.
Ashilile ululombelelo ane endibalozi nenfungwilwe amanyoro aje muhati enjanje no ujasiri kama nanshi sehwiyomvezye ayanje.
21 २१ पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील.
Amwe mumanye amambo gane shehwendelela, o Tikiko oholo wane owamwetu otumwa ohogowe hwa gosi, aibhabhonzya kila hantu.
22 २२ मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.
Entumwilye hulimwe hwi lengo kabisa, aje mumanye azizye amoyo getu.
23 २३ देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो.
Olutengano lubhe hwa holo, no lwomvwano no lweteshelo afame hwa Ngolobhe Ogosi oYesu Kristi.
24 २४ जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
Uwene nate na bhonti wagene ogosi oYesu Kilisti hulwo mvwano lula wa saga ufwa.

< इफि. 6 >