< इफि. 5 >
1 १ तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,
अतो यूयं प्रियबालका इवेश्वरस्यानुकारिणो भवत,
2 २ आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
ख्रीष्ट इव प्रेमाचारं कुरुत च, यतः सोऽस्मासु प्रेम कृतवान् अस्माकं विनिमयेन चात्मनिवेदनं कृत्वा ग्राह्यसुगन्धार्थकम् उपहारं बलिञ्चेश्वराच दत्तवान्।
3 ३ जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही.
किन्तु वेश्यागमनं सर्व्वविधाशौचक्रिया लोभश्चैतेषाम् उच्चारणमपि युष्माकं मध्ये न भवतु, एतदेव पवित्रलोकानाम् उचितं।
4 ४ तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी.
अपरं कुत्सितालापः प्रलापः श्लेषोक्तिश्च न भवतु यत एतान्यनुचितानि किन्त्वीश्वरस्य धन्यवादो भवतु।
5 ५ कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही.
वेश्यागाम्यशौचाचारी देवपूजक इव गण्यो लोभी चैतेषां कोषि ख्रीष्टस्य राज्येऽर्थत ईश्वरस्य राज्ये कमप्यधिकारं न प्राप्स्यतीति युष्माभिः सम्यक् ज्ञायतां।
6 ६ पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.
अनर्थकवाक्येन कोऽपि युष्मान् न वञ्चयतु यतस्तादृगाचारहेतोरनाज्ञाग्राहिषु लोकेष्वीश्वरस्य कोपो वर्त्तते।
7 ७ म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका.
तस्माद् यूयं तैः सहभागिनो न भवत।
8 ८ कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.
पूर्व्वं यूयम् अन्धकारस्वरूपा आध्वं किन्त्विदानीं प्रभुना दीप्तिस्वरूपा भवथ तस्माद् दीप्तेः सन्ताना इव समाचरत।
9 ९ कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात.
दीप्ते र्यत् फलं तत् सर्व्वविधहितैषितायां धर्म्मे सत्यालापे च प्रकाशते।
10 १० प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.
प्रभवे यद् रोचते तत् परीक्षध्वं।
11 ११ आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा.
यूयं तिमिरस्य विफलकर्म्मणाम् अंशिनो न भूत्वा तेषां दोषित्वं प्रकाशयत।
12 १२ कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे.
यतस्ते लोका रहमि यद् यद् आचरन्ति तदुच्चारणम् अपि लज्जाजनकं।
13 १३ सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते.
यतो दीप्त्या यद् यत् प्रकाश्यते तत् तया चकास्यते यच्च चकास्ति तद् दीप्तिस्वरूपं भवति।
14 १४ कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
एतत्कारणाद् उक्तम् आस्ते, "हे निद्रित प्रबुध्यस्व मृतेभ्यश्चोत्थितिं कुरु। तत्कृते सूर्य्यवत् ख्रीष्टः स्वयं त्वां द्योतयिष्यति।"
15 १५ म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.
अतः सावधाना भवत, अज्ञाना इव माचरत किन्तु ज्ञानिन इव सतर्कम् आचरत।
16 १६ वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत.
समयं बहुमूल्यं गणयध्वं यतः काला अभद्राः।
17 १७ म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
तस्माद् यूयम् अज्ञाना न भवत किन्तु प्रभोरभिमतं किं तदवगता भवत।
18 १८ आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा,
सर्व्वनाशजनकेन सुरापानेन मत्ता मा भवत किन्त्वात्मना पूर्य्यध्वं।
19 १९ सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा.
अपरं गीतै र्गानैः पारमार्थिककीर्त्तनैश्च परस्परम् आलपन्तो मनसा सार्द्धं प्रभुम् उद्दिश्य गायत वादयत च।
20 २० आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
सर्व्वदा सर्व्वविषयेऽस्मत्प्रभो यीशोः ख्रीष्टस्य नाम्ना तातम् ईश्वरं धन्यं वदत।
21 २१ ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा.
यूयम् ईश्वराद् भीताः सन्त अन्येऽपरेषां वशीभूता भवत।
22 २२ पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा.
हे योषितः, यूयं यथा प्रभोस्तथा स्वस्वस्वामिनो वशङ्गता भवत।
23 २३ कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे.
यतः ख्रीष्टो यद्वत् समिते र्मूर्द्धा शरीरस्य त्राता च भवति तद्वत् स्वामी योषितो मूर्द्धा।
24 २४ ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
अतः समिति र्यद्वत् ख्रीष्टस्य वशीभूता तद्वद् योषिद्भिरपि स्वस्वस्वामिनो वशता स्वीकर्त्तव्या।
25 २५ पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
अपरञ्च हे पुरुषाः, यूयं ख्रीष्ट इव स्वस्वयोषित्सु प्रीयध्वं।
26 २६ यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
स ख्रीष्टोऽपि समितौ प्रीतवान् तस्याः कृते च स्वप्राणान् त्यक्तवान् यतः स वाक्ये जलमज्जनेन तां परिष्कृत्य पावयितुम्
27 २७ यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
अपरं तिलकवल्यादिविहीनां पवित्रां निष्कलङ्काञ्च तां समितिं तेजस्विनीं कृत्वा स्वहस्ते समर्पयितुञ्चाभिलषितवान्।
28 २८ याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो.
तस्मात् स्वतनुवत् स्वयोषिति प्रेमकरणं पुरुषस्योचितं, येन स्वयोषिति प्रेम क्रियते तेनात्मप्रेम क्रियते।
29 २९ कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो.
कोऽपि कदापि न स्वकीयां तनुम् ऋतीयितवान् किन्तु सर्व्वे तां विभ्रति पुष्णन्ति च। ख्रीष्टोऽपि समितिं प्रति तदेव करोति,
30 ३० कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.
यतो वयं तस्य शरीरस्याङ्गानि मांसास्थीनि च भवामः।
31 ३१ “म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.”
एतदर्थं मानवः स्वमातापितरोै परित्यज्य स्वभार्य्यायाम् आसंक्ष्यति तौ द्वौ जनावेकाङ्गौ भविष्यतः।
32 ३२ हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते.
एतन्निगूढवाक्यं गुरुतरं मया च ख्रीष्टसमिती अधि तद् उच्यते।
33 ३३ तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
अतएव युष्माकम् एकैको जन आत्मवत् स्वयोषिति प्रीयतां भार्य्यापि स्वामिनं समादर्त्तुं यततां।