< इफि. 3 >

1 या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे.
this/he/she/it because of I/we Paul the/this/who prisoner the/this/who Christ Jesus above/for you the/this/who Gentiles
2 देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल;
if indeed to hear the/this/who management the/this/who grace the/this/who God the/this/who to give me toward you
3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे.
that/since: since according to revelation (to make known *N(k)O*) me the/this/who mystery as/just as to write/designate in/on/among little/few
4 जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल,
to/with which be able to read to understand the/this/who understanding me in/on/among the/this/who mystery the/this/who Christ
5 ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संततीला सांगण्यात आले नव्हते.
which (in/on/among *k*) other generation no to make known the/this/who son the/this/who a human as/when now to reveal the/this/who holy apostle it/s/he and prophet in/on/among spirit/breath: spirit
6 हे रहस्य ते आहे की, परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्याबरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत आणि अभिवचनाचे भागीदार आहेत.
to exist the/this/who Gentiles co-heir and of the same body and sharer the/this/who promise (it/s/he *k*) in/on/among (the/this/who *k*) Christ (Jesus *NO*) through/because of the/this/who gospel
7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो.
which (to be *N(k)O*) servant according to the/this/who free gift the/this/who grace the/this/who God (the/this/who to give *N(k)O*) me according to the/this/who active energy the/this/who power it/s/he
8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,
I/we the/this/who least all (the/this/who *k*) holy: saint to give the/this/who grace this/he/she/it (in/on/among *k*) the/this/who Gentiles to speak good news (the/this/who *N(k)O*) unsearchable (riches *N(k)O*) the/this/who Christ
9 आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रकट करावे. (aiōn g165)
and to illuminate all which? the/this/who (management *N(K)O*) the/this/who mystery the/this/who to conceal away from the/this/who an age: age in/on/among the/this/who God the/this/who the/this/who all to create (through/because of Jesus Christ *K*) (aiōn g165)
10 १० यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे.
in order that/to to make known now the/this/who beginning and the/this/who authority in/on/among the/this/who heavenly through/because of the/this/who assembly the/this/who manifold wisdom the/this/who God
11 ११ देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे. (aiōn g165)
according to purpose the/this/who an age: eternity which to do/make: do in/on/among (the/this/who *no*) Christ Jesus the/this/who lord: God me (aiōn g165)
12 १२ ख्रिस्तामध्ये आम्हास त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे.
in/on/among which to have/be the/this/who boldness and (the/this/who *k*) access in/on/among confidence through/because of the/this/who faith it/s/he
13 १३ म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे.
therefore to ask not to lose heart in/on/among the/this/who pressure me above/for you who/which to be glory you
14 १४ या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो,
this/he/she/it because of to bend/bow the/this/who a knee me to/with the/this/who father (the/this/who lord: God me Jesus Christ *K*)
15 १५ ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
out from which all family line in/on/among heaven and upon/to/against earth: planet to name
16 १६ त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे.
in order that/to (to give *N(k)O*) you according to (the/this/who riches *N(k)O*) the/this/who glory it/s/he power to strengthen through/because of the/this/who spirit/breath: spirit it/s/he toward the/this/who in/inner/inwardly a human
17 १७ विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे
to dwell the/this/who Christ through/because of the/this/who faith in/on/among the/this/who heart you in/on/among love to root and to found
18 १८ यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
in order that/to to have power to grasp with all the/this/who holy: saint which? the/this/who width and length and height and depth
19 १९ म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे.
to know and/both the/this/who to surpass the/this/who knowledge love the/this/who Christ in order that/to to fulfill toward all the/this/who fulfillment the/this/who God
20 २० आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे,
the/this/who then be able above/for all to do/make: do above/for out from excessively which to ask or to understand according to the/this/who power the/this/who be active in/on/among me
21 २१ त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn g165)
it/s/he the/this/who glory in/on/among the/this/who assembly (and *no*) in/on/among Christ Jesus toward all the/this/who generation the/this/who an age: eternity the/this/who an age: eternity amen (aiōn g165)

< इफि. 3 >