< इफि. 3 >
1 १ या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे.
For this reason, I Paul, the prisoner of the Christ Jesus on account of you Gentiles,
2 २ देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल;
if, indeed, you have heard of the stewardship of the grace of God, which was given to me for your benefit,
3 ३ जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे.
that by revelation was made known to me the mystery, (as I briefly wrote above,
4 ४ जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल,
so that, when you read, you can see my understanding in the mystery of the Christ, )
5 ५ ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संततीला सांगण्यात आले नव्हते.
which, in other generations, was not made known to the sons of men, as it is now revealed to his holy apostles and prophets by the Spirit;
6 ६ हे रहस्य ते आहे की, परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्याबरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत आणि अभिवचनाचे भागीदार आहेत.
that the Gentiles should be fellow-heirs, and of the same body, and partakers of his promise in the Christ, through the gospel,
7 ७ देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो.
of which I was made a minister according to the gift of the grace of God which was given to me, in proportion to the energy of his power:
8 ८ जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,
to me, who am by far the least of all the saints, has this grace been given, that I might preach among the Gentiles the unsearchable riches of the Christ,
9 ९ आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रकट करावे. (aiōn )
and enlighten all men with respect to the plan of the mystery, which was concealed from the ages in God, who created all things; (aiōn )
10 १० यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे.
to the end that the manifold wisdom of God might now be made known, through the church, to the principalities and authorities in the heavenly regions,
11 ११ देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे. (aiōn )
according to the arrangement of the ages, which he established by Christ Jesus our Lord, (aiōn )
12 १२ ख्रिस्तामध्ये आम्हास त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे.
in whom we have boldness and access with confidence, through our faith in him.
13 १३ म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे.
For which cause I beseech you not to grow faint on account of my afflictions for you, which are your glory.
14 १४ या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो,
For this reason I bow my knees to the Father of our Lord Jesus Christ,
15 १५ ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
from whom the whole family in heaven and on earth is named,
16 १६ त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे.
that he may grant to you, according to the riches of his glory, to be mightily strengthened by his Spirit in the inner man,
17 १७ विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे
that Christ may dwell in your hearts through the faith;
18 १८ यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
that, being rooted and founded in love, you may be fully able to comprehend with all the saints what is the breadth and length and depth and hight,
19 १९ म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे.
and to know the love of the Christ that passes our knowledge, that you may be filled with aft the fullness of God.
20 २० आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे,
Now to him that is able to do exceeding abundantly above all that we ask or think according to his power which works in us,
21 २१ त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn )
to him be glory in the church by Christ Jesus, throughout all the generations of the age of ages. Amen. (aiōn )