< उपदेशक 9 >

1 मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. नीतिमान आणि ज्ञानी माणसे व त्यांचे कार्ये समजण्याचा स्पष्टपणे प्रयत्न केला. ते सर्व देवाच्या हातात असते. कोणीतरी आपला तिरस्कार किंवा प्रेम करील याबद्दल काहीही माहीत नसते.
پس از بررسی تمام این چیزها فهمیدم که هر چند زندگی اشخاص درستکار و خردمند در دست خداست، ولی رویدادهای خوشایند و ناخوشایند برای آنان رخ می‌دهد و انسان نمی‌فهمد چرا؟
2 जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते. नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, यज्ञ करणारा आणि यज्ञ न करणारा, या सर्वांची सारखीच गती होते. चांगला मनुष्य पापी मनुष्यासारखाच मरेल. शपथ वाहणाऱ्याची, तशीच शपथ वाहण्यास घाबरतो त्याची दशा सारखीच होते.
این رویدادها برای همهٔ انسانها رخ می‌دهد، چه درستکار باشند چه بدکار، چه خوب باشند چه بد، چه پاک باشند چه ناپاک، چه دیندار باشند چه بی‌دین. فرقی نمی‌کند که انسان خوب باشد یا گناهکار، قسم دروغ بخورد یا از قسم خوردن بترسد.
3 जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे त्यामध्ये एक अनिष्ट आहे. सर्वांचा शेवट सारखाच होतो. मानवजातीच्या मनात सर्व दुष्टता भरलेली असते. ते जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्या मनात वेडेपण असते. मग त्यानंतर ते मेलेल्यास जाऊन मिळतात.
یکی از بدترین چیزهایی که در زیر این آسمان اتفاق می‌افتد این است که همه نوع واقعه برای همه رخ می‌دهد. به همین دلیل است که انسان مادامی که زنده است دیوانه‌وار به شرارت روی می‌آورد.
4 जो मनुष्य अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. पण हे म्हणणे खरे आहे. जिवंत कुत्रा मरण पावलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.
فقط برای زنده‌ها امید هست. سگ زنده از شیر مرده بهتر است!
5 जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते. मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. कारण त्यांचे स्मरण विसरले आहे.
زیرا زنده‌ها اقلاً می‌دانند که خواهند مرد! ولی مرده‌ها چیزی نمی‌دانند. برای مرده‌ها پاداشی نیست و حتی یاد آنها نیز از خاطره‌ها محو می‌شود.
6 त्यांची प्रीती, द्वेष व मत्सर ही कधीच नष्ट होऊन गेली आहेत, आणि जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे, त्यामध्ये त्यांना पुन्हा कधीही जागा नाही.
محبتشان، نفرتشان و احساساتشان، همه از بین می‌رود و آنها دیگر تا ابد در زیر این آسمان نقشی نخواهند داشت.
7 तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षरस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे.
پس برو و نان خود را با لذت بخور و شراب خود را با شادی بنوش و بدان که این کار تو مورد قبول خداوند است.
8 सर्वदा तुझी वस्त्रे शुभ्र असावी आणि तुझ्या डोक्यास तेलाचा अभिषेक असावा.
همیشه شاد و خرم باش!
9 तुझ्या व्यर्थतेच्या आयुष्याचे जे दिवस त्याने तुला सूर्याच्या खालती दिले आहेत त्यामध्ये, तुझ्या व्यर्थतेच्या सर्वच दिवसात, तुझी पत्नी जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपले आयुष्य घालीव, कारण आयुष्यात, आणि तू ज्या आपल्या उद्योगात सूर्याच्या खालती श्रम करतोस तेथेही तुझा वाटा हाच आहे.
در این روزهای بیهودهٔ زندگی که خداوند در زیر این آسمان به تو داده است با زنی که دوستش داری خوش بگذران، چون این است پاداش همهٔ زحماتی که در زندگی خود، زیر این آسمان می‌کشی.
10 १० जे काही काम तुझ्या हाती पडेल ते सर्व तू आपल्या सामर्थ्याने कर. कारण ज्या कबरेत आपण सर्व जाणार आहोत त्यामध्ये काम, विचार, ज्ञान आणि शहाणपणही नसते. (Sheol h7585)
هر کاری که می‌کنی آن را خوب انجام بده، چون در عالم مردگان، که بعد از مرگ به آنجا خواهی رفت، نه کار کردن هست، نه نقشه کشیدن، نه دانستن و نه فهمیدن. (Sheol h7585)
11 ११ मी सूर्याच्या खालती काही कुतुहलाच्या गोष्टी पाहिल्या. वेगाने धावणारा शर्यत जिंकत नाही, सर्वशक्तिमान लढाई जिंकतो असे नाही. शहाण्याला अन्न खाता येते असे नाही. समंजसास संपत्ती मिळते असे नाही, आणि ज्ञान्यावरच अनुग्रह होतो असे नाही. त्याऐवजी समय व संधी त्या सर्वावर परीणाम होतात.
من متوجه چیز دیگری نیز شدم و آن این بود که در دنیا همیشه سریعترین دونده، برندهٔ مسابقه نمی‌شود و همیشه قویترین سرباز در میدان جنگ پیروز نمی‌گردد. اشخاص دانا همیشه شکمشان سیر نیست و افراد عاقل و ماهر همیشه به ثروت و نعمت نمی‌رسند، بلکه در همگی دست زمان و حادثه در کار است.
12 १२ कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही, जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो, किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.
انسان هرگز نمی‌داند چه بر سرش خواهد آمد. همان‌طور که ماهی در تور گرفتار می‌شود و پرنده به دام می‌افتد، انسان نیز وقتی که انتظارش را ندارد در دام بلا گرفتار می‌گردد.
13 १३ हे ज्ञानही मी भूतलावर पाहिले आहे आणि हे मला फार महत्वाचे वाटते.
در زیر این آسمان با نمونه‌ای از حکمت روبرو شدم که بر من تأثیر عمیقی گذاشت:
14 १४ थोडे लोक असलेले एक लहान शहर होते. एक महान राजा त्या शहराविरुध्द लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले.
شهر کوچکی بود که عده کمی در آن زندگی می‌کردند. پادشاه بزرگی با سپاه خود آمده، آن را محاصره نمود و تدارک حمله به شهر را دید.
15 १५ पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या ज्ञानाने त्या शहराचा बचाव केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब मनुष्यास विसरून गेले.
در آن شهر مرد فقیری زندگی می‌کرد که بسیار خردمند بود. او با حکمتی که داشت توانست شهر را نجات دهد. اما هیچ‌کس او را به یاد نیاورد.
16 १६ मग मी निर्णय केला, बळापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे पण गरीबाच्या ज्ञानाला तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाही.
آنگاه فهمیدم که اگرچه حکمت از قوت بهتر است، با وجود این اگر شخص خردمند، فقیر باشد خوار شمرده می‌شود و کسی به سخنانش اعتنا نمی‌کند.
17 १७ विद्वान मनुष्याने शांतपणे उच्चारलेले काही शब्द हे मूर्ख राजाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात.
ولی با این حال، سخنان آرام شخص خردمند از فریاد پادشاه نادانان بهتر است.
18 १८ शहाणपण हे युध्दातल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते. पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करतो.
حکمت از اسلحهٔ جنگ مفیدتر است، اما اشتباه یک نادان می‌تواند خرابی زیادی به بار آورد.

< उपदेशक 9 >