< उपदेशक 7 >
1 १ किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.
Better a name, than precious ointment, —and the day of death, than the day of one’s birth.
2 २ मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा, शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे, जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे. म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील.
Better to go to the house of mourning, than to go to the house of banqueting, for, that, is the end of all men, —and, the living, should take it to his heart.
3 ३ हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो.
Better is grief than laughter, —for, by the marring of the face, amended is the heart.
4 ४ शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते, पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते.
The heart of the wise, is in the house of mourning, but, the heart of dullards, in the house of mirth.
5 ५ मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे.
Better to hear the rebuke of the wise, than for any man to hear the song of dullards,
6 ६ भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे. हे सुद्धा व्यर्थच आहे.
For, as the crackling of thorns under a pot, so, is the laughter of the dullard, —even this, then, was vanity.
7 ७ पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते आणि लाच मन भ्रष्ट करते.
For, oppression, maddeneth the wise, —and a bribe, destroyeth the understanding.
8 ८ एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे. आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे.
Better the latter end of a thing, than the beginning thereof, —Better a patient spirit, than a haughty spirit.
9 ९ तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो.
Do not be rash in thy spirit, to be indignant, —for, indignation, in the bosom of dullards, doth remain.
10 १० या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही.
Do not say, What hath happened, that, the former days, were better than these? for, not wisely, askest thou concerning this.
11 ११ आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे. ज्या कोणाला सूर्य दिसतो त्यांचा फायदा होतो.
Good is wisdom, with an inheritance, —and a profit, to such as see the sun.
12 १२ कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते. परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की, ते जीवन वाचविते.
For, a protection, is wisdom, and, a protection, is silver, —but, the advantage of knowledge, is, that, wisdom, giveth life to the possessors thereof.
13 १३ देवाच्या कृत्यांचा विचार कराः जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?
Consider the work of God, —for who can straighten what he hath bent?
14 १४ जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे. या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये.
In the day of prosperity, be joyful, but, in the day of misfortune, consider, —Even the one equally with the other, hath God made, to the end man might find out—after him—nothing.
15 १५ मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात, आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.
Everything, had I seen, in my days of vanity, —Here was a righteous man, perishing in his righteousness, and there was a lawless man, continuing long in his wickedness.
16 १६ स्वनीतिमान होऊ नका, स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो?
Do not become so very righteous, neither count thyself wise beyond measure, —wherefore shouldst thou destroy thyself?
17 १७ दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका, तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?
Do not be so very lawless, neither become thou foolish, —wherefore shouldst thou die, before thy time?
18 १८ तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे, आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल.
It is well that thou shouldst lay fast hold of this, but, even from the other, do not withdraw thy hand, —for, he that revereth God, shall come forth out of them all.
19 १९ एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते,
Wisdom, bringeth more strength to a wise man, than ten heroes, that are in the city.
20 २० जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही.
For, as for men, there is none righteous in the earth, that doeth good, and sinneth not.
21 २१ बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका. कारण तुमचा नोकर कदाचित तुम्हास शाप देताना ऐकाल.
Moreover, not to all the words which men speak, do thou apply thy heart, —lest thou hear thine own servant reviling thee!
22 २२ त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत.
For truly, many times, thy heart knoweth, —that, even thou thyself, hast reviled others.
23 २३ मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो, मी ज्ञानी होईन, परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते.
All this, have I proved by wisdom, —I said, I will be wise, but, that, was far from me.
24 २४ ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल?
Far away, is that which hath been, —and deep, deep, who can find it out?
25 २५ मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले. आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले, आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.
Resolved, I, in my heart, to know and search out, and to seek wisdom, and a conclusion, —and to know lawlessness [to be] stupidity, and folly to be madness.
26 २६ मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली, तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे, आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत. जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो. पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो.
I, could indeed find, to be, more bitter than death, the woman, whose heart is, snares and nets, and her hands, bonds, —whoso is pleasing before God, shall escape from her, but, he that sinneth, shall be captured by her.
27 २७ मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.
See! this, have I found, saith the Proclaimer [counting] one by one, to find a conclusion;
28 २८ मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.
what my soul still sought, yet I found not, —one man out of a thousand, have I found, but, a woman among all these, have I not found.
29 २९ मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.
Only, see, this, have I found, That God made man upright, but, they, have sought out many devices.