< उपदेशक 3 >
1 १ प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.
Ⱨǝrbir ixning muwapiⱪ pǝsli bar, asmanlar astidiki ⱨǝmmǝ arzuning ɵz waⱪtimu bar;
2 २ जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.
Tuƣuluxning bir waⱪti bar, ɵlüxningmu bir waⱪti bar; Tikix waⱪti bar, tikilgǝnni sɵküx waⱪti bar;
3 ३ ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. मोडण्याची वेळ आणि बांधण्याचीही वेळ असते.
Ɵltürüx waⱪti bar, saⱪaytix waⱪti bar; Buzux waⱪti bar, ⱪurux waⱪti bar;
4 ४ रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते. शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते.
Yiƣlax waⱪti bar, külüx waⱪti bar; Matǝm tutux waⱪti bar, ussul oynax waⱪti bar;
5 ५ धोंडे फेकून देण्याची वेळ असते आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते. दुसऱ्या लोकांस आलिंगन देण्याची वेळ आणि आलिंगन आवरून धरण्याची वेळ असते.
Taxlarni qɵriwetix waⱪti bar, taxlarni yiƣip-toplax waⱪti bar; Ⱪuqaⱪlax waⱪti bar, ⱪuqaⱪlaxtin ɵzini tartix waⱪti bar;
6 ६ गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.
Izdǝx waⱪti bar, yoⱪaldi dǝp waz keqix waⱪtimu bar;
7 ७ वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. शांत बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.
Yirtix waⱪti bar, tikix waⱪti bar; Süküt ⱪelix waⱪti bar, sɵz ⱪilix waⱪti bar;
8 ८ प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांती करण्याचीही वेळ असते.
Sɵyüx waⱪti bar, nǝprǝtlinix waⱪti bar; Urux waⱪti bar, tinqliⱪ waⱪti bar.
9 ९ काम करणारा जे श्रम करतो त्यास त्यामध्ये काय लाभ मिळतो?
Ixligǝn ɵz ixliginidin nemǝ payda alidu?
10 १० देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे.
Mǝn Huda insan baliliriƣa yükligǝn, ixlǝp japa tartix kerǝk bolƣan ixni kɵrgǝnmǝn.
11 ११ देवाने आपल्या समयानुसार प्रत्येक गोष्ट अनुरूप अशी बनवली आहे. त्याने त्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना निर्माण केली आहे. तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्य समजू शकत नाही.
U ⱨǝrbir ixning waⱪti kǝlgǝndǝ güzǝl bolidiƣanliⱪini bekitkǝn; u yǝnǝ mǝnggülükni insanlarning kɵngligǝ salƣan; xunga, insan Hudaning ɵz ⱨayatiƣa baxtin ahirƣiqǝ nemini bekitkǝnlikini bilip yǝtmǝstur.
12 १२ त्यांनी जिवंत असेपर्यंत आनंदीत रहावे व चांगले ते करीत रहावे याहून त्यास काही उत्तम नाही असे मला समजले.
Insanlarƣa ⱨayatida xadlinix wǝ yahxiliⱪ ⱪilixtin baxⱪa ǝwzǝl ix yoⱪ ikǝn dǝp bilip yǝttim.
13 १३ आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे आणि त्याच्या सर्व कामातून आनंद कसा मिळवावा हे देवाचे दान आहे.
Xundaⱪla yǝnǝ, ⱨǝrbir kixining yeyix-iqixi, ɵzining barliⱪ ǝjridin ⱨuzur elixi, mana bu Hudaning sowƣisidur.
14 १४ देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार आहे असे मी समजतो. त्याच्यात अधिक काही मिळवू शकत नाही आणि त्याच्यातून काही कमीही करू शकत नाही. कारण लोकांनी त्याच्याजवळ आदराने यावे म्हणून देवाने हे सारे केले आहे.
Hudaning ⱪilƣanlirining ⱨǝmmisi bolsa, mǝnggülük bolidu, dǝp bilimǝn; uningƣa ⱨeqnǝrsini ⱪoxuxⱪa wǝ uningdin ⱨeqnǝrsini eliwetixkǝ bolmaydu; Hudaning ularni ⱪilƣanlirining sǝwǝbi insanni Ɵzidin ǝymindürüxtur.
15 १५ जे काही अस्तित्वात आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते. आणि जे काही अस्तित्वात यावयाचे आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते. देव मानवजातीला दडलेल्या गोष्टी शोधण्यास लावतो.
Ⱨazir bolƣanliri ɵtkǝndimu bolƣandur; kǝlgüsidǝ bolidiƣan ix alliⱪaqan bolƣandur; Huda ɵtkǝn ixlarni soraydu.
16 १६ आणि पृथ्वीवर न्यायाचे स्थान बघितले तर तेथे दुष्टता अस्तित्वात होती. आणि नीतिमत्वाच्या स्थानात पाहिले तर तेथे नेहमी दुष्टता सापडते.
Mǝn ⱪuyax astida yǝnǝ xu ixni kɵrdümki — soraⱪ ornida, xu yǝrdǝ ⱨeliⱨǝm rǝzillik turidu; ⱨǝⱪⱪaniyliⱪ turux kerǝk bolƣan jayda, mana rǝzillik turidu!
17 १७ मी आपल्या मनात म्हटले, देव प्रत्येक गोष्टीचा व प्रत्येक कामाचा योग्यसमयी सदाचरणी आणि दुष्ट लोकांचा न्याय करील.
Mǝn kɵnglümdǝ: «Huda ⱨǝⱪⱪaniy ⱨǝm rǝzil adǝmni soraⱪⱪa tartidu; qünki ⱨǝrbir arzu-mǝⱪsǝt wǝ ⱨǝrbir ixning ɵz waⱪti bar» — dedim.
18 १८ मी माझ्या मनात म्हटले, देव मानवजातीची पारख करतो यासाठी की आपण पशुसारखे आहोत हे त्यास दाखवून द्यावे.
Mǝn kɵnglümdǝ: — Bundaⱪ boluxi insan balilirining sǝwǝbidindur; Huda ularni sinimaⱪqi, [bu ixlar] ular ɵzlirining pǝⱪǝt ⱨaywanlarƣa ohxax ikǝnlikini kɵrüxi üqün bolƣan, dǝp oylidim.
19 १९ जे मानवजातीस घडते तेच पशुसही घडते. जसे पशू मरतात तसे लोकही मरतात. ते सर्व एकाच हवेतून श्वास घेतात, पशुपेक्षा मानवजात वरचढ नाही. सर्वकाही केवळ व्यर्थ नाही काय?
Qünki insan balilirining bexiƣa kelidiƣini ⱨaywanlarƣimu kelidu, ularning kɵridiƣini ohxax bolidu. Ulardin aldinⱪisi ⱪandaⱪ ɵlgǝn bolsa, keyinkisimu xundaⱪ ɵlidu, ularda ohxaxla birla nǝpǝs bardur. Insanning ⱨaywanlardin ⱨeq artuⱪqiliⱪi yoⱪ; qünki ⱨǝmmǝ ix bimǝniliktur.
20 २० सर्व काही एकाच स्थानी जातात. सर्वकाही मातीपासून आले आहेत आणि सर्वकाही पुन्हा मातीस जाऊन मिळतात.
Ularning ⱨǝmmisi bir jayƣa baridu; ⱨǝmmisi topa-qangdin qiⱪⱪan, ⱨǝmmisi topa-qangƣa ⱪaytidu.
21 २१ मानवजातीचा आत्मा वर जातो आणि पशुचा आत्मा खाली जमिनीत जातो की काय हे कोणाला माहीत आहे?
Kim adǝm balilirining roⱨini bilidu? U yuⱪiriƣa qiⱪamdu, buni kim bilidu? Ⱨaywanlarning roⱨi, u yǝr tegigǝ qüxǝmdu, kim bilidu?
22 २२ मग मी पाहिले की, मनुष्याने आपल्या कामात आनंद करावा यापेक्षा काही उत्तम नाही. कारण हा त्याचा वाटा आहे. कारण तो मरून गेल्यावर जे काही होईल ते पाहायला त्यास कोण परत आणील?
Xuning bilǝn mǝn insanning ɵz ǝjridin ⱨuzurlinixidin artuⱪ ix yoⱪtur, dǝp kɵrdum; qünki mana, bu uning nesiwisidur; qünki uni ɵzidin keyin bolidiƣan ixlarni kɵrüxkǝ kim elip kelidu?