< उपदेशक 2 >
1 १ मी आपल्या मनात म्हटले, “आता ये, मी आनंदाद्वारे तुझी पारख करतो. म्हणून आनंदाचा उपभोग घे पण पाहा, हे सुद्धा केवळ तात्पुरत्या हवेच्या झुळकेसारखे आहे.”
Ngathi mina enhliziyweni yami: Woza-ke, ngizakuzama ngentokozo, njalo kholisa okuhle. Khangela-ke, lalokhu kwakuyize.
2 २ मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे?
Ngokuhleka ngathi: Kuyibuhlanya! Langentokozo: Kwenzani?
3 ३ जे मनुष्यास चांगले, जे त्यांनी आकाशाखाली आपल्या आयुष्याचे सर्व दिवस करावे ते मी शोधून पाहीपर्यंत माझे मन मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवीत घेऊन जात असताही, मी आपली इच्छा द्राक्षरसाने कशी पुरी करावी आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला.
Ngadinga enhliziyweni yami ukuthokozisa inyama yami ngewayini (kodwa ngakhokhela inhliziyo yami ngenhlakanipho), lokubambelela ebuthutheni, ngize ngibone ukuthi kuyini lokho okulungele abantwana babantu, abangakwenza ngaphansi kwamazulu, ngenani lensuku zempilo zabo.
4 ४ नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली, आणि स्वत: साठी द्राक्षाचे मळे लावले.
Ngazenzela imisebenzi emikhulu; ngazakhela izindlu; ngazihlanyelela izivini;
5 ५ मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली.
ngazenzela izivande lezivande zezihlahla; ngahlanyela kuzo izihlahla zezithelo zohlobo lonke;
6 ६ झाडे लावलेल्या वनास पाणी पुरवावे म्हणून मी आपणासाठी तलाव निर्माण केले.
ngazenzela amachibi amanzi okuthelela ngawo ihlathi lokukhulisa izihlahla;
7 ७ मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी यरूशलेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अधिक गुरांचे आणि शेरडामेंढरांच्या कळपाचे मोठे धन मजजवळ होते.
ngathenga izigqili lezigqilikazi, ngaba labazalelwe endlini; njalo ngaba lemfuyo enengi yenkomo lezimvu okwedlula bonke ababekhona ngaphambi kwami eJerusalema;
8 ८ मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या.
ngazibuthela futhi isiliva legolide lemfuyo ekhethekileyo yamakhosi leyamazwe; ngazizuzela abahlabeleli labahlabelelikazi, lentokozo zabantwana babantu, amantombazana emihlobo yonke.
9 ९ जे माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले.
Ngakho ngaba mkhulu nganda okwedlula wonke owayekhona ngaphambi kwami eJerusalema, lenhlakanipho yami yema lami.
10 १० जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले, ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही, कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे; आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते.
Lakho konke amehlo ami akufisayo kangiwancitshanga khona, kangigodlanga inhliziyo yami lakuyiphi intokozo; ngoba inhliziyo yami yathokoza ekutshikatshikeni kwami konke; lalokhu kwaba yisabelo sami somtshikatshika wami wonke.
11 ११ नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.
Mina ngasengikhangela yonke imisebenzi izandla zami eziyenzileyo, lomtshikatshika engangitshikatshike ukuwenza; khangela-ke, konke kwakuyize lokukhathazeka komoya, njalo kwakungekho nzuzo ngaphansi kwelanga.
12 १२ मग मी ज्ञान, वेडेपणा व मूर्खपणा याकडे लक्ष देण्यास वळलो. कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून येणारा राजा काय करील? जे काही त्याने यापूर्वी केले तेच तो करणार.
Mina ngasengibuyela ukubona inhlakanipho lobuhlanya lobuthutha. Ngoba angenzani umuntu olandela inkosi? Lokho okuvele sekwenziwe.
13 १३ नंतर मला समजायला लागले जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे.
Mina ngasengibona ukuthi inhlakanipho ingcono kulobuthutha njengokukhanya kungcono kulomnyama.
14 १४ ज्ञानी मनुष्य काय करतो हे त्याचे डोळे पाहत असतात, पण मूर्ख अंधारात चालतो, असे असून सर्वांची एक सारखीच गती असते. असेही मी समजलो.
Ohlakaniphileyo, amehlo akhe asekhanda lakhe, kodwa isithutha sihamba emnyameni; ngasengisazi lami ukuthi isehlakalo sinye sehlela bonke.
15 १५ मग मी आपल्या मनात म्हणालो, मूर्खाविषयी जे काय घडते, ते माझ्याही बाबतीत घडेल, मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल? मी आपल्या मनात अनुमान काढले, हे सुद्धा व्यर्थच आहे.
Mina ngasengisithi enhliziyweni yami: Njengoba kusehlela isithutha kuzangehlela lami; pho, kungani-ke mina ngangihlakaniphe okwedlulisileyo? Ngasengikhuluma enhliziyweni yami ukuthi lokhu lakho kuyize.
16 १६ मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सर्वकाळपर्यंत राहणार नाही. कारण पुढे येणाऱ्या दिवसात सर्वकाही अगदी विसरून जातील म्हणून शहाणा मनुष्य मूर्खासारखाच मरतो.
Ngoba kakukho ukukhunjulwa kohlakaniphileyo okwedlula koyisithutha phakade; ngoba lokhu okukhona khathesi ensukwini ezizayo konke kuzakhohlakala. Ohlakaniphileyo ufa njani? Njengesithutha.
17 १७ यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटला. जे काम भूतलावर करण्यात येते त्याचे मला वाईट वाटले. सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहेत.
Ngasengizonda impilo, ngoba umsebenzi owenziwa ngaphansi kwelanga wawubuhlungu kimi; ngoba konke kuyize lokukhathazeka komoya.
18 १८ माझे अपार कष्ट, जे मी भूतलावर केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो. कारण जो मनुष्य माझ्यामागून येईल त्याच्याकडे ते सोडून मला जावे लागणार.
Yebo, mina ngawuzonda wonke umtshikatshika wami engawutshikatshika ngaphansi kwelanga, ngoba ngizawutshiyela umuntu ozakuba khona ngemva kwami.
19 १९ आणि तो मनुष्य शहाणा असेल की मूर्ख असेल कोणाला माहित? परंतु माझे सर्व श्रम, जे मी भूतलावर केले आहेत आणि ज्यात मी आपणास ज्ञान दाखवले आहे, त्यावर तो अधिकार चालवील. हेही व्यर्थ आहे.
Ngubani-ke owaziyo ukuthi uzakuba ngohlakaniphileyo kumbe oyisithutha? Kanti uzabusa phezu kwawo wonke umtshikatshika wami engawutshikatshikayo lengiwenze ngenhlakanipho ngaphansi kwelanga. Lokhu lakho kuyize.
20 २० म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले.
Mina ngasengiphenduka ngadangalisa inhliziyo yami ngomtshikatshika wonke engangiwutshikatshika ngaphansi kwelanga.
21 २१ कारण ज्याचे श्रम ज्ञानाने, विद्येने आणि कौशल्याने होतात असा मनुष्य कोण आहे? तरी त्यासाठी ज्याने काही श्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेऊन सोडून जावे हेही व्यर्थच आहे आणि मोठी शोकांतिका आहे.
Ngoba kulomuntu omtshikatshika wakhe ukunhlakanipho lakulwazi lakubuqotho, kanti uzawunika umuntu ongatshikatshikanga kuwo ube yisabelo sakhe. Lokhu lakho kuyize, lobubi obukhulu.
22 २२ कारण मनुष्य सूर्याच्या खाली जे सर्व श्रम करतो आणि आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्यास काय फायदा होतो?
Ngoba ulani umuntu ngomtshikatshika wakhe wonke langokukhathazeka kwenhliziyo yakhe akutshikatshike ngaphansi kwelanga?
23 २३ कारण मनुष्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्रीदेखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही. हेही वायफळच आहे.
Ngoba insuku zakhe zonke zizinsizi, lomsebenzi wakhe uyikudabuka; lebusuku inhliziyo yakhe kayiphumuli. Lokhu lakho kuyize.
24 २४ मनुष्याने खावे, प्यावे आणि श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्यास काहीही उत्तम नाही. हे ही देवाच्या हातून घडते असे मी पाहिले.
Kakukho okungcono emuntwini kulokuthi adle anathe abonise umphefumulo wakhe okuhle emtshikatshikeni wakhe. Lokhu lakho mina ngabona ukuthi kuvela esandleni sikaNkulunkulu.
25 २५ कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल?
Ngoba ngubani ongadla kumbe ngubani ongakholisa kulami?
26 २६ जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्यास तो ज्ञान, विद्या आणि आनंद देतो. परंतु तो पाप्याला कष्ट देतो, अशासाठी की त्याने संग्रह करावा व साठवून ठेवावे आणि जो देवासमोर चांगला आहे त्यास ते द्यावे. हेही व्यर्थ आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.
Ngoba yena uyamnika umuntu olungileyo phambi kobuso bakhe inhlakanipho lolwazi lentokozo; kodwa isoni uyasinika umsebenzi wokubutha lokubuthelela ukunika olungileyo phambi kukaNkulunkulu. Lokhu lakho kuyize lokukhathazeka komoya.