< उपदेशक 12 >
1 १ तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी, आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील, त्यामध्ये मला काही सुख नाही.
Og tænk paa din Skaber i din Ungdoms Dage, førend de onde Dage komme, og de Aar nærme sig, om hvilke du skal sige: Jeg har ikke Lyst til dem:
2 २ सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील.
Førend Solen og Lyset og Maanen og Stjernerne formørkes, og Skyerne komme igen efter Regnen;
3 ३ त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील आणि बळकट मनुष्य वाकतील, आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत, आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही.
den Dag, da Husets Vogtere bæve, og de stærke Mænd krumme sig, og de, som betjene Møllen, holde op, fordi de ere blevne faa, og de, som se igennem Vinduerne, blive dunkle;
4 ४ त्यासमयी जेव्हा रस्त्यातील दरवाजे बंद होतील आणि जात्याचा आवाज थांबेल, तेव्हा पक्ष्याच्या शब्दाने मनुष्य बिथरेल, आणि मुलींच्या गायनाचास्वर लुप्त होईल.
da begge Døre til Gaden lukkes, naar Møllens Røst bliver svag, og man staar op ved Fuglens Røst, og alle Sangens Døtre nedbøjes;
5 ५ तेव्हा मनुष्यास उंचावरच्या ठिकाणांची आणि रस्त्यावरील पुढील धोक्यांची भीती वाटेल, आणि तेव्हा बदामाचे झाड फुलेल, आणि तेव्हा टोळ स्वतःपुढे भारी असा वाटेल, आणि तेव्हा स्वाभाविक इच्छा दुर्बल होईल. नंतर मनुष्य आपल्या सनातन घरास जातो, आणि शोक करणारे रस्त्यात फिरतात.
da de ogsaa frygte for den høje, og der er Rædsler paa Vejen, og Mandeltræet blomstrer, og Græshoppen bliver sig selv til en Byrde, og Begærligheden forgaar; thi Mennesket farer til sit evige Hus, og de sørgende gaa omkring paa Gaden;
6 ६ तू आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, रुप्याची तार तुटण्यापूर्वी किंवा सोन्याचा कटोरा चेपण्यापूर्वी, अथवा झऱ्याजवळ घागर फुटण्यापूर्वी, अथवा पाण्याचा रहाट विहिरीकडे मोडला जाईल,
førend Sølvsnoren borttages, og Guldlampen bliver knust; og Krukken sønderbrydes ved Kilden, og Hjulet sønderslaas ved Brønden;
7 ७ ज्या ठिकाणापासून ती आली, माती परत मातीला मिळेल, आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.
og Støvet kommer til Jorden igen, som det var før, og Aanden kommer til Gud igen, som gav den.
8 ८ उपदेशक म्हणतो, धुक्याची वाफ, प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी वाफ आहे.
Forfængeligheders Forfængelighed! sagde Prædikeren, alt er Forfængelighed!
9 ९ उपदेशक ज्ञानी होता आणि म्हणून तो लोकांस ज्ञान शिकवीत गेला. त्याने अभ्यास व निरक्षण करून व पुष्कळ म्हणीचा संच केला.
Og forøvrigt, efterdi Prædikeren var en viis Mand, saa lærte han fremdeles Folket Kundskab og hørte og ransagede og forfattede mange Ordsprog.
10 १० उपदेशकाने स्पष्ट व सत्याची सरळमार्गी वचने शोधून लिहिण्याचा प्रयत्न केला.
Prædikeren søgte at finde behagelige Ord, og det, som er skrevet, er Ret, Sandheds Ord.
11 ११ ज्ञानाची वचने आरींसारखी आहेत. शिक्षकाची त्याच्या म्हणीच्या संग्रहातील वचने खोल ठोकलेल्या खिळ्यांसारखी आहेत. ती एकाच मेंढपाळाकडून शिकविण्यात आली आहेत.
De vises Ord ere som Braadde og som Søm, der trænge dybt ind, I Samlingens Mestre! de ere givne af den ene Hyrde.
12 १२ माझ्या मुला, त्याखेरीज अधिक सावध रहा. पुष्कळ पुस्तके रचण्याला, काही अंत नाही. खूप अभ्यास देहाला थकवा आणेल.
Og forøvrigt, min Søn! lad dig paaminde af dem; at gøre mange Bøger, saa at der er ingen Ende paa, og megen Læsning trætter Legemet.
13 १३ याविषयाचा शेवट हाच आहे, सर्व काही ऐकल्यानंतर, तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे.
Enden paa Sagen, naar alting er hørt, er denne: Frygt Gud og hold hans Bud; thi det bør hvert Menneske at gøre.
14 १४ देव सगळ्या कृत्यांचा न्याय करील, त्याबरोबर प्रत्येक गुप्त गोष्टीचा, मग ती वाईट असो किंवा चांगली.
Thi Gud skal føre hver Gerning for Dom med alt det, som er skjult, enten det er godt eller ondt.