< उपदेशक 11 >
1 १ आपली भाकर जलावर सोड. कारण पुष्कळ दिवसानी तुला ते पुन्हा मिळेल.
當將你的糧食撒在水面, 因為日久必能得着。
2 २ तू सात आठ लोकांस वाटा दे. कारण पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हास कल्पना नाही.
你要分給七人,或分給八人, 因為你不知道將來有甚麼災禍臨到地上。
3 ३ जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील; तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात, आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील.
雲若滿了雨,就必傾倒在地上。 樹若向南倒,或向北倒, 樹倒在何處,就存在何處。
4 ४ जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही. जो ढगांचा रंग पाहत राहतो तो पेरणी करणार नाही.
看風的,必不撒種; 望雲的,必不收割。
5 ५ जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही, आईच्या गर्भात बाळाची हाडे कशी वाढतात हेही जसे तुला कळत नाही तसेच सर्व काही निर्माण करणाऱ्या देवाच्या कार्याचे आकलन तुला करता येणार नाही.
風從何道來,骨頭在懷孕婦人的胎中如何長成,你尚且不得知道;這樣,行萬事之上帝的作為,你更不得知道。
6 ६ सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस. कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.
早晨要撒你的種,晚上也不要歇你的手,因為你不知道哪一樣發旺;或是早撒的,或是晚撒的,或是兩樣都好。
7 ७ प्रकाश खरोखर गोड आहे, आणि सूर्य पाहणे डोळ्यांस आनंददायक गोष्ट आहे.
光本是佳美的,眼見日光也是可悅的。
8 ८ जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो, पण तो येण्याऱ्या अंधकाराच्या दिवसाचा विचार करो, कारण ते पुष्कळ होतील. जे सर्व येते ते व्यर्थच आहे.
人活多年,就當快樂多年;然而也當想到黑暗的日子。因為這日子必多,所要來的都是虛空。
9 ९ हे तरुणा, तू आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदीत करो, आणि तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वाबद्दल देव तुझा न्याय करील. हे तुझ्या लक्षात असू दे.
少年人哪,你在幼年時當快樂。在幼年的日子,使你的心歡暢,行你心所願行的,看你眼所愛看的;卻要知道,為這一切的事,上帝必審問你。
10 १० यास्तव आपल्या मनातून राग दूर कर, आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको. कारण तारुण्य व सामर्थ्य ही व्यर्थ आहेत.
所以,你當從心中除掉愁煩,從肉體克去邪惡;因為一生的開端和幼年之時,都是虛空的。