< अनुवाद 9 >
1 १ हे इस्राएलांनो ऐका, तुम्ही आज यार्देन नदीपलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तीशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत. त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे.
Zwana, Israyeli; uzachapha iJordani lamuhla, ukungenela ukudla ilifa lezizwe ezinkulu lezilamandla kulawe, imizi emikhulu ebiyelwe ngemithangala efika emazulwini.
2 २ तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हास माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याविषयी आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे.
Abantu abakhulu labade, abantwana bamaAnaki wena obaziyo, wena osuzwile ngabo kuthiwa: Ngubani ongema phambi kwabantwana bakaAnaki?
3 ३ पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे.
Ngakho yazi lamuhla ukuthi yiNkosi uNkulunkulu wakho echapha phambi kwakho, engumlilo oqothulayo; yona izabachitha, njalo yona izabehlisela phansi phambi kwakho; njalo lizabaxotsha basuke elifeni labo, libabhubhise masinyane, njengokutsho kweNkosi kuwe.
4 ४ तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे.
Ungakhulumi enhliziyweni yakho, lapho iNkosi uNkulunkulu wakho isibaxotshile phambi kwakho, usithi: Ngenxa yokulunga kwami iNkosi ingingenise ukudla ilifa lelizwe leli. Kodwa ngenxa yobubi balezizizwe iNkosi izixotsha zisuke elifeni lazo phambi kwakho.
5 ५ तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
Kakungenxa yokulunga kwakho kumbe ngenxa yobuqotho benhliziyo yakho ukuthi ungene ukudla ilifa lelizwe lazo; kodwa ngenxa yobubi balezizizwe iNkosi uNkulunkulu wakho izixotsha zisuke elifeni lazo phambi kwakho, lokuthi iqinise ilizwi iNkosi eyalifungela oyihlo, uAbrahama, uIsaka loJakobe.
6 ६ म्हणून तुम्ही हे निश्चित लक्षात ठेवा की, तुमच्या चांगूलपणामुळे हा उत्तम देश तुमचा देव परमेश्वर तुम्हास वतन म्हणून देत आहे असे नाही, कारण तुम्ही फार ताठमानेचे राष्ट्र आहात.
Yazi-ke ukuthi kakungenxa yokulunga kwakho ukuthi iNkosi uNkulunkulu wakho ikunika lelilizwe elihle ukuthi udle ilifa lalo; ngoba uyisizwe esilentamo elukhuni.
7 ७ रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढवून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करीत आलेले आहात.
Khumbula, ungakhohlwa, ukuthi wayithukuthelisa iNkosi uNkulunkulu wakho enkangala; kusukela osukwini owaphuma ngalo elizweni leGibhithe laze lafika kulindawo, beliyivukela iNkosi.
8 ८ होरेबात तुम्ही परमेश्वरास क्रोधाविष्ट केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता.
LeHorebe layithukuthelisa iNkosi, yaze yalithukuthelela iNkosi ukulichitha.
9 ९ त्याचे असे झाले; परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार म्हणजे दगडी पाट्या घेण्यासाठी मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो.
Sengenyukele entabeni ukwemukela izibhebhe zamatshe, izibhebhe zesivumelwano iNkosi eyasenza lani, ngasengihlala entabeni insuku ezingamatshumi amane lobusuku obungamatshumi amane, angidlanga sinkwa, anginathanga manzi.
10 १० परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले
INkosi yasinginika lezozibhebhe ezimbili zamatshe zilotshwe ngomunwe kaNkulunkulu, laphezu kwazo kulotshiwe ngokwamazwi wonke iNkosi eyayiwakhulume lani entabeni, iphakathi komlilo ngosuku lokuhlangana.
11 ११ चाळीस दिवस, चाळीस रात्री झाल्यावर परमेश्वराने त्या आज्ञापटाच्या पाट्या मला दिल्या.
Kwasekusithi ekupheleni kwensuku ezingamatshumi amane lobusuku obungamatshumi amane, iNkosi yangipha izibhebhe ezimbili zamatshe, izibhebhe zesivumelwano.
12 १२ परमेश्वर म्हणाला, “ऊठ आणि ताबडतोब खाली जा. मिसरहून तू आणलेले लोक बिघडले आहेत. इतक्यातच ते माझ्या आज्ञांपासून बहकले आहेत. त्यांनी स्वत: साठी एक ओतीव मूर्ती केली आहे.”
INkosi yasisithi kimi: Sukuma wehle ngokuphangisa usuke lapha, ngoba abantu bakho owabakhupha eGibhithe bonakalisile, baphambukile ngokuphangisa endleleni engabalaya yona, bazenzela isithombe esibunjwe ngokuncibilikisa.
13 १३ परमेश्वर असेही मला म्हणाला, “मी या लोकांस पाहीले आहे. ते फार हट्टी आहेत.
INkosi yasikhuluma kimi isithi: Ngibabonile lababantu, khangela-ke, bangabantu abantamo zilukhuni.
14 १४ मला आडवू नकोस, त्यांचा नाश करु दे. मी त्यांचे नाव आकाशाखालून खोडून टाकीन. मग मी तुझे, त्यांच्याहून श्रेष्ठ आणि समर्थ असे दुसरे राष्ट्र उभारीन.”
Ngiyekela ukuze ngibabhubhise, ngesule ibizo labo lisuke ngaphansi kwamazulu; njalo ngizakwenza ube yisizwe esilamandla lesikhulu kulabo.
15 १५ मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या.
Ngasengiphenduka ngisehla entabeni, lentaba yayivutha umlilo; lezibhebhe zombili zesivumelwano zazisezandleni zami zombili.
16 १६ मी पाहिले की तुमचा देव परमेश्वर त्याच्या इच्छेविरूद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही सोन्याच्या वासराची ओतीव मूर्ती केली होती. परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबवून तुम्ही बहकून गेला होता!
Ngasengibona, khangelani-ke, lalonile eNkosini uNkulunkulu wenu, lalizenzele ithole elibunjwe ngokuncibilikisa, laliphambukile ngokuphangisa endleleni iNkosi eyayililayile.
17 १७ तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्या फोडून टाकल्या.
Ngasengibamba izibhebhe zombili, ngazilahla ezandleni zami zombili, ngazibulala phambi kwamehlo enu.
18 १८ मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात.
Ngasengiziwisela phansi phambi kweNkosi njengakuqala, insuku ezingamatshumi amane lobusuku obungamatshumi amane, ngingadli sinkwa, nginganathi manzi, ngenxa yaso sonke isono senu elisonileyo, lisenza okubi emehlweni eNkosi, liyithukuthelisa.
19 १९ परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले.
Ngoba ngangisesaba ukuthukuthela lolaka iNkosi eyayilithukuthelela ngakho ukulibhubhisa; kodwa iNkosi yangizwa langalesosikhathi.
20 २० परमेश्वर अहरोनावर इतका संतापला होता की, त्याचा नाश करणार होता. पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली.
INkosi yasimthukuthelela kakhulu uAroni ukuze imbhubhise; kodwa ngamkhulekela loAroni ngalesosikhathi.
21 २१ मग तुमचे ते अमंगळ कृत्य, तुम्ही केलेली वासराची मूर्ती मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करून भस्म करून टाकले व डोंगरावरुन वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
Ngasengithatha isono senu, ithole elalilenzile, ngalitshisa ngomlilo, ngalichoboza, ngalicholisisa laze laba lincinyane njengothuli; ngaphosa uthuli lwalo esifuleni esasisehla entabeni.
22 २२ नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वरास संतप्त केलेत.
LeTabera, leMasa, leKiribothi-Hathava laliyithukuthelisa iNkosi.
23 २३ जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हास रवाना करून सांगितले की, “जा, व जो देश मी तुम्हास दिला आहे तो ताब्यात घ्या,” तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही.
Lalapho iNkosi yalithuma lisuka eKadeshi-Bhaneya isithi: Yenyukani, lidle ilifa lelizwe engilinike lona, laselihlamukela umlayo weNkosi uNkulunkulu wenu, kaliyikholwanga, kalilalelanga ilizwi layo.
24 २४ जेव्हापासून मी तुम्हास ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे.
Lalivele liyivukele iNkosi kusukela osukwini engalazi ngalo.
25 २५ तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे परमेश्वर म्हणाला होता.
Ngasengiziwisela phansi phambi kweNkosi insuku ezingamatshumi amane lobusuku obungamatshumi amane, engaziwisela phansi ngazo, ngoba iNkosi yayithe izalichitha.
26 २६ मी परमेश्वरास विनवणी केली की हे प्रभू तुझ्या प्रजेचा नाश करु नकोस. तू आपले लोक तुझे वतन खंडून घेतले आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिसरमधून मुक्त करून बाहेर आणले आहेस.
Ngasengikhuleka eNkosini ngathi: Nkosi Jehova, ungabachithi abantu bakho lelifa lakho, obahlenge ngobukhulu bakho, owabakhupha eGibhithe ngesandla esilamandla.
27 २७ अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरून जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर.
Khumbula inceku zakho, uAbrahama, uIsaka, loJakobe; ungakhangeli inkani yalababantu lobubi babo lesono sabo,
28 २८ तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोक म्हणतील, परमेश्वर त्यांना स्वत: च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.
hlezi ilizwe owasikhupha kilo lithi: Ngenxa yokuthi iNkosi yayingelamandla okubangenisa elizweni eyabathembisa lona, langenxa yokuthi ibazonda, yabakhupha ukuze ibabulalele enkangala.
29 २९ पण हे लोक तुझेच आहेत, म्हणजे तुझे वतन आहेत, तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर देशातून त्यांना बाहेर आणले आहेस.
Kube kanti bangabantu bakho lelifa lakho, owabakhupha ngamandla akho amakhulu langengalo yakho eyeluliweyo.