< अनुवाद 8 >
1 १ आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि बहुगुणित व्हाल व तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेल्या प्रदेशात प्रवेश करून तो तुम्ही ताब्यात घ्याल.
“Kowos in oaru in akos ma sap nukewa nga sot nu suwos misenge, tuh kowos fah ku in moul ac puseni ac utyak eis facl se su LEUM GOD El wulela kac nu sin papa matu tomowos.
2 २ तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत: करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
Esam kolyuk lun LEUM GOD lowos in fufahsryesr loeloes lowos sasla yen mwesis ke yac angngaul somla. El supu ma upa in srike kowos, tuh Elan ku in etu ma oan insiowos, ac lah pwaye kowos ac akos ma sap lal.
3 ३ परमेश्वराने तुम्हास लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही व तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हास खाऊ घातला. मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने जगतो हे तुम्हास कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले.
El tuh oru kowos in masrinsral, na El kite kowos ke manna, sie mwe mongo ma kowos, ac papa matu tomowos, soenna kang meet. El oru ma inge in luti kowos lah mwet uh tia moul ke bread mukena, a ke kas nukewa ma LEUM GOD El fahk.
4 ४ गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.
Ke lusen yac angngaul inge, nuknuk lowos tiana mahi, ac niowos tia pac fafwak.
5 ५ तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे.
Esam lah LEUM GOD lowos El aksuwosye kowos ac kai kowos, oana ke sie papa el kai tulik natul.
6 ६ तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्यास अनुसरा आणि त्याच्याबद्दल भय धरून आदर बाळगा.
Ke ma inge, oru oana LEUM GOD El sapkin nu suwos! Moul fal nu ke ma sap lal ac arulana akfulatyal.
7 ७ तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत.
LEUM GOD lowos El uskowosme nu in sie facl wo — sie acn pus infacl ac unon in kof we, oayapa oasr kwakof ye fohk uh ma soror nu infahlfal uh ac infulan eol uh;
8 ८ ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.
sie acn ma oasr wheat, barley, grape, fig, pomegranate, olive ac honey we.
9 ९ येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल.
Kowos ac tiana masrinsral we, ku enenu kutena ma. Eot we uh oasr iron loac, ac kowos ku in pukanak copper ke eol srisrik we.
10 १० तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
Ac fah pukanten mwe mongo nowos, ac kowos fah sang kulo nu sin LEUM GOD lowos ke facl na wowo El sot nu suwos.
11 ११ सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
“Kowos in arulana karinganang tuh kowos in tia mulkunla LEUM GOD lowos; a kowos in arulana akos ma sap ac oakwuk nukewa lal su nga sot nu suwos misenge.
12 १२ त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल.
Ke pacl se pukanten mwe mongo nowos, ac kowos musaela lohm wowo suwos ac muta loac,
13 १३ तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल.
ac ke puseni cow ac sheep nutuwos, silver ac gold lowos, ac kutepacna ma saya lowos,
14 १४ या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.
taranna tuh kowos in tia inse fulatak ac mulkunla LEUM GOD lowos su uskowosme liki Egypt, acn se ma kowos tuh mwet kohs we.
15 १५ विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
El pwen kowos sasla yen mwesis lulap ac aksangeng sac, yen oasr wet pwasin ac scorpion we. El oru kof in sororma liki sie eot wen nu suwos in acn pulamlam ac wangin kof we.
16 १६ तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हास खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हास नम्र केले.
In acn mwesis uh El kite kowos ke manna, sie mwe mongo ma papa matu tomowos uh tiana kang meet. El oru in upa nu suwos in srike kowos, tuh Elan ku in akinsewowoye kowos tok ke ma wo.
17 १७ हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.
Ouinge, kowos in tiana nunku mu kasrup lowos uh ma ke ku ac etauk lowos sifacna.
18 १८ तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे.
Esam lah LEUM GOD lowos pa sot ku nu suwos in kasrupi. El oru ouinge mweyen El srakna karingin wulela lal nwe misenge ma El orala yurin papa matu tomowos.
19 १९ तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरू नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच आहे, ही ताकीद मी आताच तुम्हास देऊन ठेवतो.
Kowos in tiana mulkunla LEUM GOD lowos, ku forla nu sin god ngia in alu ac orekma nu selos. Kowos fin oru ouinge, na nga fahk nu suwos misenge lah pwayena kowos ac kunausyukla.
20 २० ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.
Kowos fin tia akos LEUM GOD, na kowos ac kunausyukla, oana mutunfacl ingo su El ac kunausla meet liki na kowos ilyak nu in facl selos.