< अनुवाद 6 >
1 १ तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा.
Un šie ir tie baušļi, tie likumi un tās tiesas, ko Tas Kungs, jūsu Dievs, ir pavēlējis jums mācīt, ka jūs pēc tiem darāt tai zemē, ko jūs ejat iemantot:
2 २ तुम्ही, तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे, म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल.
Ka tu To Kungu, savu Dievu, bīsties un turi visus Viņa likumus un Viņa baušļus, ko es tev pavēlu, tu un tavi bērni un tavi bērnu bērni, visas tava mūža dienas, un ka tu ilgi dzīvo.
3 ३ इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.
Klausies tad, Israēl, un ņem vērā, ka tu tos dari, lai tev labi klājās, un lai jūs ļoti vairojaties, kā Tas Kungs, tavu tēvu Dievs, tev ir runājis, tai zemē, kur piens un medus tek.
4 ४ हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.
Klausies, Israēl, Tas Kungs, mūsu Dievs, ir viens vienīgs Kungs.
5 ५ आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत: करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
Un tev To Kungu, savu Dievu, būs mīlēt no visas savas sirds, no visas savas dvēseles un no visa sava spēka.
6 ६ मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या.
Un šie vārdi, ko es tev šodien pavēlu, lai tev iet pie sirds.
7 ७ त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
Un tev tos būs piekodināt saviem bērniem un no tiem runāt savā namā sēžot un pa ceļu ejot, guļoties un ceļoties.
8 ८ त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा.
Un tev tos būs siet par zīmi uz savu roku, un tiem būs būt par piemiņas zīmi starp tavām acīm.
9 ९ दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
Un tev tos būs rakstīt uz sava nama stenderes un uz saviem vārtiem.
10 १० अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हास देईल.
Kad nu Tas Kungs, tavs Dievs, tevi ievedīs tai zemē, ko Viņš zvērējis taviem tēviem Ābrahāmam, Īzakam un Jēkabam, tev dot, lielas un labas pilsētas, ko tu neesi uzcēlis,
11 ११ उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.
Un namus visa labuma pilnus, ko tu neesi pildījis, un izcirstas akas, ko tu neesi izcirtis, vīna dārzus un eļļas koku dārzus, ko tu neesi dēstījis, ka tu ēdīsi un būsi paēdis,
12 १२ पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले.
Tad sargies, ka tu neaizmirsti To Kungu, kas tevi izvedis no Ēģiptes zemes, no tā vergu nama.
13 १३ तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका.
Tev būs bīties To Kungu, savu Dievu, un Viņam kalpot un pie Viņa vārda zvērēt.
14 १४ तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका.
Jums nebūs dzīties pakaļ citiem dieviem, kas ir no apkārtēju tautu dieviem.
15 १५ कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.
Jo Tas Kungs, tavs Dievs, tavā vidū ir stiprs un dusmīgs Dievs; ka Tā Kunga, tava Dieva, bardzība pret tevi neiedegās un tevi neizdeldē no zemes virsas.
16 १६ मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका.
Jums To Kungu, savu Dievu, nebūs kārdināt, kā jūs Viņu kārdinājāt Masā.
17 १७ तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा.
Turēdami turat Tā Kunga, sava Dieva, baušļus līdz ar Viņa liecībām un ar Viņa likumiem, ko Viņš tev pavēlējis.
18 १८ उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हास द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यामध्ये तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल.
Un dari, kas tiesa un labi priekš Tā Kunga acīm, lai tev labi klājās un tu ej un iemanto to labo zemi, ko Tas Kungs taviem tēviem zvērējis,
19 १९ परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.
Kad Viņš izdzīs visus tavus ienaidniekus tavā priekšā, itin kā Tas Kungs ir runājis.
20 २० आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील.
Kad nākamās dienās tavs dēls jautās un sacīs: kuras ir tās liecības un tie likumi un tās tiesas, ko Tas Kungs, mūsu Dievs, jums ir pavēlējis?
21 २१ तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले.
Tad tev būs atbildēt savam dēlam: mēs bijām Faraona kalpi Ēģiptes zemē, bet Tas Kungs mūs caur stipru roku no Ēģiptes zemes izvedis.
22 २२ परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत.
Un Tas Kungs deva zīmes un lielus un briesmīgus brīnumus Ēģiptes zemē pie Faraona un pie visa viņa nama priekš mūsu acīm.
23 २३ आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले.
Un Viņš mūs izveda no turienes, ka Viņš mūs atvestu un mums dotu to zemi, ko Viņš mūsu tēviem bija zvērējis.
24 २४ ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवील व आपले भले करील.
Un Tas Kungs mums pavēlēja visus šos likumus darīt, To Kungu, savu Dievu, bīties, mums par labu mūžam, ka mēs dzīvi taptu paturēti, it tā tas šodien ir.
25 २५ जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.
Un tā būs mūsu taisnība, kad mēs sargāsim un darīsim visus šos baušļus Tā Kunga, sava Dieva, priekšā, kā Viņš mums ir pavēlējis.