< अनुवाद 34 >

1 मवाब प्रदेशातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व गिलाद प्रदेश,
Och Mose gick utaf de Moabiters mark, upp på berget Nebo, uppå klinten af berget Pisga, tvärtemot Jericho; och Herren viste honom det hela landet Gilead, allt intill Dan;
2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला.
Och hela Naphthali, och Ephraims land, och Manasse, och hela Juda land, allt intill det yttersta hafvet;
3 तसेच नेगेब आणि सोअरापासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हेही दाखवले.
Och söderut, och den breda ängden vid Jericho Palma stadsens, allt intill Zoar.
4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस.”
Och Herren sade till honom: Detta är det landet, som jag Abraham, Isaac och Jacob, svorit hafver, och sagt: Jag skall gifva det dine säd. Du hafver nu sett det med din ögon; men du skall icke komma ditöfver.
5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्यास सांगितले होतेच.
Och så blef Mose Herrans tjenare der död i de Moabiters lande, efter Herrans ord.
6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही.
Och han begrof honom uti dalenom uti de Moabiters lande, emot Peors hus; och ingen hafver fått veta hans graf allt intill denna dag.
7 मोशे मरण पावला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती व दृष्टी चांगली होती.
Och Mose var hundrade och tjugu år gammal, då han blef död; hans ögon voro intet mörk vorden, och hans kinder voro intet förfallna.
8 इस्राएल लोकांनी मोशेसाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले.
Och Israels barn begreto Mose på de Moabiters mark i tretio dagar; och de gråto- och klagodagar öfver Mose vordo fullkomnade.
9 मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्यास नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.
Men Josua, Nuns son, vardt uppfylld med vishetsanda; ty Mose hade lagt sina händer på honom; och Israels barn lydde honom, och gjorde såsom Herren budit hade Mose.
10 १० इस्राएलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वरास मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता.
Och sedan stod ingen Prophete upp i Israel, såsom Mose, den Herren kände ansigte mot ansigte;
11 ११ मिसर देशामध्ये महान चमत्कार करून दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसर देशामध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले.
Till allahanda tecken och under, till hvilken Herren honom sände, att han dem göra skulle i Egypti land, på Pharao och alla hans tjenare, och på allt hans land;
12 १२ मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.
Och till all den mägtiga hand, och stora syner, som Mose gjorde för hela Israels ögon.

< अनुवाद 34 >