< अनुवाद 33 >

1 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः
וְזֹאת הַבְּרָכָה אֲשֶׁר בֵּרַךְ מֹשֶׁה אִישׁ הָאֱלֹהִים אֶת־בְּנֵי יִשְׂרָאֵל לִפְנֵי מוֹתֽוֹ׃
2 “परमेश्वर सीनाय येथून आला. उष: कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला, दहा हजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिक त्याच्याबरोबर होते.
וַיֹּאמַר יְהוָה מִסִּינַי בָּא וְזָרַח מִשֵּׂעִיר לָמוֹ הוֹפִיעַ מֵהַר פָּארָן וְאָתָה מֵרִבְבֹת קֹדֶשׁ מִֽימִינוֹ אשדת אֵשׁ דָּת לָֽמוֹ׃
3 परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
אַף חֹבֵב עַמִּים כָּל־קְדֹשָׁיו בְּיָדֶךָ וְהֵם תֻּכּוּ לְרַגְלֶךָ יִשָּׂא מִדַּבְּרֹתֶֽיךָ׃
4 मोशेने आम्हास नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबाच्या लोकांची ठेव आहे.
תּוֹרָה צִוָּה־לָנוּ מֹשֶׁה מוֹרָשָׁה קְהִלַּת יַעֲקֹֽב׃
5 इस्राएलचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
וַיְהִי בִישֻׁרוּן מֶלֶךְ בְּהִתְאַסֵּף רָאשֵׁי עָם יַחַד שִׁבְטֵי יִשְׂרָאֵֽל׃
6 रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
יְחִי רְאוּבֵן וְאַל־יָמֹת וִיהִי מְתָיו מִסְפָּֽר׃
7 मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: “परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे. त्यास शक्तीशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्यास साहाय्यकारी हो.”
וְזֹאת לִֽיהוּדָה וַיֹּאמַר שְׁמַע יְהוָה קוֹל יְהוּדָה וְאֶל־עַמּוֹ תְּבִיאֶנּוּ יָדָיו רָב לוֹ וְעֵזֶר מִצָּרָיו תִּהְיֶֽה׃
8 लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.
וּלְלֵוִי אָמַר תֻּמֶּיךָ וְאוּרֶיךָ לְאִישׁ חֲסִידֶךָ אֲשֶׁר נִסִּיתוֹ בְּמַסָּה תְּרִיבֵהוּ עַל־מֵי מְרִיבָֽה׃
9 हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
הָאֹמֵר לְאָבִיו וּלְאִמּוֹ לֹא רְאִיתִיו וְאֶת־אֶחָיו לֹא הִכִּיר וְאֶת־בנו בָּנָיו לֹא יָדָע כִּי שָֽׁמְרוּ אִמְרָתֶךָ וּבְרִֽיתְךָ יִנְצֹֽרוּ׃
10 १० ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
יוֹרוּ מִשְׁפָּטֶיךָ לְיַעֲקֹב וְתוֹרָתְךָ לְיִשְׂרָאֵל יָשִׂימוּ קְטוֹרָה בְּאַפֶּךָ וְכָלִיל עַֽל־מִזְבְּחֶֽךָ׃
11 ११ परमेश्वरा, जे जे लेवीचे आहे त्यास आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्विकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करून टाक.”
בָּרֵךְ יְהוָה חֵילוֹ וּפֹעַל יָדָיו תִּרְצֶה מְחַץ מָתְנַיִם קָמָיו וּמְשַׂנְאָיו מִן־יְקוּמֽוּן׃
12 १२ बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वरास प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील.”
לְבִנְיָמִן אָמַר יְדִיד יְהֹוָה יִשְׁכֹּן לָבֶטַח עָלָיו חֹפֵף עָלָיו כָּל־הַיּוֹם וּבֵין כְּתֵיפָיו שָׁכֵֽן׃
13 १३ योसेफाविषयी तो म्हणाला, “योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
וּלְיוֹסֵף אָמַר מְבֹרֶכֶת יְהֹוָה אַרְצוֹ מִמֶּגֶד שָׁמַיִם מִטָּל וּמִתְּהוֹם רֹבֶצֶת תָּֽחַת׃
14 १४ सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्यास देवो.
וּמִמֶּגֶד תְּבוּאֹת שָׁמֶשׁ וּמִמֶּגֶד גֶּרֶשׁ יְרָחִֽים׃
15 १५ टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
וּמֵרֹאשׁ הַרְרֵי־קֶדֶם וּמִמֶּגֶד גִּבְעוֹת עוֹלָֽם׃
16 १६ धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो. योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडूपातल्या, परमेश्वराचा दुवा त्यास मिळो.
וּמִמֶּגֶד אֶרֶץ וּמְלֹאָהּ וּרְצוֹן שֹׁכְנִי סְנֶה תָּבוֹאתָה לְרֹאשׁ יוֹסֵף וּלְקָדְקֹד נְזִיר אֶחָֽיו׃
17 १७ प्रथम जन्मलेल्या गोऱ्हासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
בְּכוֹר שׁוֹרוֹ הָדָר לוֹ וְקַרְנֵי רְאֵם קַרְנָיו בָּהֶם עַמִּים יְנַגַּח יַחְדָּו אַפְסֵי־אָרֶץ וְהֵם רִבְבוֹת אֶפְרַיִם וְהֵם אַלְפֵי מְנַשֶּֽׁה׃
18 १८ मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
וְלִזְבוּלֻן אָמַר שְׂמַח זְבוּלֻן בְּצֵאתֶךָ וְיִשָּׂשכָר בְּאֹהָלֶֽיךָ׃
19 १९ ते लोकांस आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”
עַמִּים הַר־יִקְרָאוּ שָׁם יִזְבְּחוּ זִבְחֵי־צֶדֶק כִּי שֶׁפַע יַמִּים יִינָקוּ וּשְׂפוּנֵי טְמוּנֵי חֽוֹל׃
20 २० गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.
וּלְגָד אָמַר בָּרוּךְ מַרְחִיב גָּד כְּלָבִיא שָׁכֵן וְטָרַף זְרוֹעַ אַף־קָדְקֹֽד׃
21 २१ स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”
וַיַּרְא רֵאשִׁית לוֹ כִּי־שָׁם חֶלְקַת מְחֹקֵק סָפוּן וַיֵּתֵא רָאשֵׁי עָם צִדְקַת יְהוָה עָשָׂה וּמִשְׁפָּטָיו עִם־יִשְׂרָאֵֽל׃
22 २२ दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
וּלְדָן אָמַר דָּן גּוּר אַרְיֵה יְזַנֵּק מִן־הַבָּשָֽׁן׃
23 २३ नफताली विषयी मोशेने सांगितले, “नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
וּלְנַפְתָּלִי אָמַר נַפְתָּלִי שְׂבַע רָצוֹן וּמָלֵא בִּרְכַּת יְהוָה יָם וְדָרוֹם יְרָֽשָׁה׃
24 २४ आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
וּלְאָשֵׁר אָמַר בָּרוּךְ מִבָּנִים אָשֵׁר יְהִי רְצוּי אֶחָיו וְטֹבֵל בַּשֶּׁמֶן רַגְלֽוֹ׃
25 २५ तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
בַּרְזֶל וּנְחֹשֶׁת מִנְעָלֶיךָ וּכְיָמֶיךָ דָּבְאֶֽךָ׃
26 २६ हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
אֵין כָּאֵל יְשֻׁרוּן רֹכֵב שָׁמַיִם בְעֶזְרֶךָ וּבְגַאֲוָתוֹ שְׁחָקִֽים׃
27 २७ देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ राहते! तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो.
מְעֹנָה אֱלֹהֵי קֶדֶם וּמִתַּחַת זְרֹעֹת עוֹלָם וַיְגָרֶשׁ מִפָּנֶיךָ אוֹיֵב וַיֹּאמֶר הַשְׁמֵֽד׃
28 २८ म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
וַיִּשְׁכֹּן יִשְׂרָאֵל בֶּטַח בָּדָד עֵין יַעֲקֹב אֶל־אֶרֶץ דָּגָן וְתִירוֹשׁ אַף־שָׁמָיו יַֽעַרְפוּ טָֽל׃
29 २९ इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची महान ठिकाणे तू तुडवशील!
אַשְׁרֶיךָ יִשְׂרָאֵל מִי כָמוֹךָ עַם נוֹשַׁע בַּֽיהוָה מָגֵן עֶזְרֶךָ וַאֲשֶׁר־חֶרֶב גַּאֲוָתֶךָ וְיִכָּֽחֲשׁוּ אֹיְבֶיךָ לָךְ וְאַתָּה עַל־בָּמוֹתֵימוֹ תִדְרֹֽךְ׃

< अनुवाद 33 >