< अनुवाद 27 >

1 मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांस आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
Mose na wazee wa Israeli wakawaagiza watu: “Yashikeni maagizo haya yote ninayowaagiza leo.
2 तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.
Mtakapokuwa mmevuka Mto Yordani na kuingia katika nchi awapayo Bwana Mungu wenu, msimamishe mawe makubwa na mkayatie lipu.
3 त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे.
Andikeni juu yake maneno yote ya sheria hii wakati mtakapokuwa mmevuka na kuingia katika nchi awapayo Bwana Mungu wenu, nchi itiririkayo maziwa na asali, kama vile Bwana, Mungu wa baba zenu, alivyowaahidi.
4 यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.
Mtakapokuwa mmevuka Yordani, simamisheni mawe haya juu ya Mlima Ebali, kama ninavyowaagiza leo, mkayatie lipu.
5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
Huko mjengeeni Bwana Mungu wenu madhabahu, madhabahu ya mawe. Msitumie kifaa chochote cha chuma juu yake.
6 वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.
Jengeni madhabahu ya Bwana Mungu wenu kwa mawe ya shambani, na mtoe sadaka za kuteketezwa juu yake kwa Bwana Mungu wenu.
7 तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.
Toeni sadaka za amani juu yake, mkizila na kufurahia mbele za Bwana Mungu wenu.
8 मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”
Nanyi mtaandika maneno yote ya sheria hii kwa wazi sana juu ya mawe haya ambayo mmesimamisha.”
9 मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
Kisha Mose na makuhani, ambao ni Walawi, wakawaambia Israeli wote, “Nyamaza ee Israeli, sikiliza! Sasa umekuwa taifa la Bwana Mungu wako.
10 १० तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम पाळ.
Mtii Bwana Mungu wako, na kufuata amri zake na maagizo ninayokupa leo.”
11 ११ त्याच दिवशी मोशेने लोकांस हेही सांगितले,
Siku ile ile Mose akawaagiza watu:
12 १२ ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.
Mtakapovuka Mto Yordani, makabila haya yatasimama juu ya Mlima Gerizimu kubariki watu: Simeoni, Lawi, Yuda, Isakari, Yosefu na Benyamini.
13 १३ तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.
Makabila haya yatasimama juu ya Mlima Ebali kwa kutamka laana: Reubeni, Gadi, Asheri, Zabuloni, Dani na Naftali.
14 १४ लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,
Nao Walawi watawasomea watu wote wa Israeli kwa sauti kubwa:
15 १५ “मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ती म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वरास अशा गोष्टींचा वीट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
“Alaaniwe mtu afanyaye sanamu ya kuchonga au mwenye kusubu sanamu, kitu ambacho ni chukizo kwa Bwana, kazi ya mikono ya fundi stadi, na kuisimamisha kwa siri.”
16 १६ “नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
“Alaaniwe mtu amdharauye baba yake na mama yake.”
17 १७ परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
“Alaaniwe mtu asogezaye jiwe la mpaka wa jirani yake.”
18 १८ लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
“Alaaniwe mtu ampotoshaye kipofu njiani.”
19 १९ लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
“Alaaniwe mtu apotoshaye haki ya mgeni, yatima au mjane.”
20 २० लेवींनी म्हणावे “वडीलांच्या पत्नीशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
“Alaaniwe mtu akutanaye kimwili na mke wa baba yake, kwa maana anadharau malazi ya baba yake.”
21 २१ लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
“Alaaniwe mtu akutanaye kimwili na mnyama yeyote.”
22 २२ लेवींनी म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
“Alaaniwe mtu akutanaye kimwili na dada yake, binti wa baba yake au binti wa mama yake.”
23 २३ लेवींनी म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
“Alaaniwe mtu akutanaye kimwili na mama mkwe wake.”
24 २४ लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
“Alaaniwe mtu amuuaye jirani yake kwa siri.”
25 २५ लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
“Alaaniwe mtu apokeaye rushwa ili kumuua mtu asiye na hatia.”
26 २६ लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
“Alaaniwe mtu yule ambaye hatashikilia maneno ya sheria hii kwa kuyatekeleza.”

< अनुवाद 27 >