< अनुवाद 27 >
1 १ मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांस आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
Moïse et les anciens d'Israël donnèrent cet ordre au peuple: « Observez tous les commandements que je vous prescris aujourd'hui.
2 २ तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.
Le jour où vous passerez le Jourdain pour entrer dans le pays que l'Éternel, votre Dieu, vous donne, vous dresserez de grandes pierres et vous les enduirez de plâtre.
3 ३ त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे.
Tu écriras sur elles toutes les paroles de cette loi, quand tu auras passé le Jourdain, pour entrer dans le pays que l'Éternel, ton Dieu, te donne, un pays où coulent le lait et le miel, comme te l'a promis l'Éternel, le Dieu de tes pères.
4 ४ यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.
Lorsque tu auras passé le Jourdain, tu dresseras sur le mont Ebal ces pierres que je te commande aujourd'hui, et tu les enduiras de plâtre.
5 ५ तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
Tu y bâtiras un autel à Yahvé ton Dieu, un autel de pierres. Tu n'y emploieras pas d'outil en fer.
6 ६ वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.
Tu bâtiras l'autel de Yahvé, ton Dieu, avec des pierres non taillées. Tu y offriras des holocaustes à l'Éternel, ton Dieu.
7 ७ तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.
Tu y sacrifieras des sacrifices de prospérité et tu y mangeras. Tu te réjouiras devant l'Éternel, ton Dieu.
8 ८ मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”
Tu écriras sur les pierres toutes les paroles de cette loi, très clairement. »
9 ९ मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
Moïse et les prêtres lévitiques parlèrent à tout Israël en disant: « Tais-toi et écoute, Israël! Aujourd'hui, tu es devenu le peuple de l'Éternel, ton Dieu.
10 १० तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम पाळ.
Tu obéiras donc à la voix de Yahvé ton Dieu, et tu mettras en pratique ses commandements et ses lois, que je te prescris aujourd'hui. »
11 ११ त्याच दिवशी मोशेने लोकांस हेही सांगितले,
Le même jour, Moïse donna cet ordre au peuple:
12 १२ ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.
« Voici ceux qui se tiendront sur le mont Garizim pour bénir le peuple, lorsque vous aurez franchi le Jourdain: Siméon, Lévi, Juda, Issacar, Joseph et Benjamin.
13 १३ तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.
Ceux-là se tiendront sur le mont Ebal pour la malédiction: Ruben, Gad, Aser, Zabulon, Dan et Nephtali.
14 १४ लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,
Les Lévites diront d'une voix forte à tous les hommes d'Israël:
15 १५ “मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ती म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वरास अशा गोष्टींचा वीट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
« Maudit est l'homme qui fait une image gravée ou fondue, une abomination pour Yahvé, l'œuvre des mains de l'artisan, et qui la place dans le secret ». Tout le peuple répondra et dira: « Amen.
16 १६ “नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
« Maudit soit celui qui déshonore son père ou sa mère ». Tout le peuple dira « Amen ».
17 १७ परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
« Maudit soit celui qui enlève le repère de son prochain ». Tout le peuple dira « Amen ».
18 १८ लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
« Maudit soit celui qui égare l'aveugle sur la route ». Tout le peuple dira « Amen ».
19 १९ लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
« Maudit soit celui qui refuse de rendre justice à l'étranger, à l'orphelin et à la veuve ». Tout le peuple dira « Amen ».
20 २० लेवींनी म्हणावे “वडीलांच्या पत्नीशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
« Maudit soit celui qui couche avec la femme de son père, car il déshonore la couche de son père ». Tout le peuple dira « Amen ».
21 २१ लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
« Maudit soit celui qui couche avec n'importe quelle espèce d'animal ». Tout le peuple dira « Amen ».
22 २२ लेवींनी म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
« Maudit soit celui qui couche avec sa sœur, la fille de son père ou la fille de sa mère ». Tout le peuple dira « Amen ».
23 २३ लेवींनी म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
« Maudit soit celui qui couche avec sa belle-mère ». Tout le peuple dira « Amen ».
24 २४ लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
« Maudit soit celui qui tue secrètement son prochain ». Tout le peuple dira « Amen ».
25 २५ लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
« Maudit soit celui qui accepte un pot-de-vin pour tuer un innocent ». Tout le peuple dira « Amen ».
26 २६ लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
« Maudit soit celui qui ne respecte pas les paroles de cette loi en les mettant en pratique. Tout le peuple dira 'Amen'. »