< अनुवाद 24 >

1 एखाद्याला लग्नानंतर आपल्या पत्नीच्या संबंधाने एखादी अयोग्य गोष्ट कळली व ती त्यास आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा; मग तिला घराबाहेर काढावे.
人が妻をめとって、結婚したのちに、その女に恥ずべきことのあるのを見て、好まなくなったならば、離縁状を書いて彼女の手に渡し、家を去らせなければならない。
2 त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरा पती करावा.
女がその家を出てのち、行って、ほかの人にとつぎ、
3 त्यातून समजा असे झाले की या पतीचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट लिहून दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या पतीने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा पती मरण पावला तर पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये.
後の夫も彼女をきらって、離縁状を書き、その手に渡して家を去らせるか、または妻にめとった後の夫が死んだときは、
4 कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे या गोष्टीचा तुमचा देव परमेश्वर ह्याला वीट आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका.
彼女はすでに身を汚したのちであるから、彼女を去らせた先の夫は、ふたたび彼女を妻にめとることはできない。これは主の前に憎むべき事だからである。あなたの神、主が嗣業としてあなたに与えられる地に罪を負わせてはならない。
5 एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्यास सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्यास द्यावी.
人が新たに妻をめとった時は、戦争に出してはならない。また何の務もこれに負わせてはならない。その人は一年の間、束縛なく家にいて、そのめとった妻を慰めなければならない。
6 कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी गाहाण म्हणून ठेवून घेऊ नये, नाहीतर त्याचा जीवच गहाण ठेवून घेतल्यासारखे होईल.
ひきうす、またはその上石を質にとってはならない。これは命をつなぐものを質にとることだからである。
7 कोणी आपल्या इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या मनुष्यास ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.
イスラエルの人々のうちの同胞のひとりをかどわかして、これを奴隷のようにあしらい、またはこれを売る者を見つけたならば、そのかどわかした者を殺して、あなたがたのうちから悪を除き去らなければならない。
8 कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील ते ऐका.
らい病の起った時は気をつけて、すべてレビびとたる祭司が教えることを、よく守って行わなければならない。すなわちわたしが彼らに命じたように、あなたがたはそれを守って行わなければならない。
9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या.
あなたがたがエジプトから出てきたとき、道であなたの神、主がミリアムにされたことを記憶しなければならない。
10 १० तुम्ही आपल्या शेजाऱ्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरू नका.
あなたが隣人に物を貸すときは、自分でその家にはいって、質物を取ってはならない。
11 ११ बाहेरच थांबा. मग ज्याला तुम्ही कर्ज दिले आहे तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल.
あなたは外に立っていて、借りた人が質物を外にいるあなたのところへ持ち出さなければならない。
12 १२ तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले कपडे आणील. तर ते वस्त्र अंगावर घेऊन झोपू नका.
もしその人が貧しい人である時は、あなたはその質物を留めおいて寝てはならない。
13 १३ त्यास रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्यास पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हास आशीर्वाद देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय.
その質物は日の入るまでに、必ず返さなければならない。そうすれば彼は自分の上着をかけて寝ることができて、あなたを祝福するであろう。それはあなたの神、主の前にあなたの義となるであろう。
14 १४ तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो.
貧しく乏しい雇人は、同胞であれ、またはあなたの国で、町のうちに寄留している他国人であれ、それを虐待してはならない。
15 १५ त्यास रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.
賃銀はその日のうちに払い、それを日の入るまで延ばしてはならない。彼は貧しい者で、その心をこれにかけているからである。そうしなければ彼はあなたを主に訴えて、あなたは罪を得るであろう。
16 १६ मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आई-वडीलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आई-वडीलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्यास मिळावी.
父は子のゆえに殺さるべきではない。子は父のゆえに殺さるべきではない。おのおの自分の罪のゆえに殺さるべきである。
17 १७ गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये.
寄留の他国人または孤児のさばきを曲げてはならない。寡婦の着物を質に取ってはならない。
18 १८ मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हास सांगत आहे.
あなたはかつてエジプトで奴隷であったが、あなたの神、主がそこからあなたを救い出されたことを記憶しなければならない。それでわたしはあなたにこの事をせよと命じるのである。
19 १९ शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्याच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हास तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
あなたが畑で穀物を刈る時、もしその一束を畑におき忘れたならば、それを取りに引き返してはならない。それは寄留の他国人と孤児と寡婦に取らせなければならない。そうすればあなたの神、主はすべてあなたがする事において、あなたを祝福されるであろう。
20 २० जैतून वृक्षांच्या फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा शोधू नको. ती अनाथ, परके, विधवा यांच्यासाठी राहू दे.
あなたがオリブの実をうち落すときは、ふたたびその枝を捜してはならない。それを寄留の他国人と孤児と寡婦に取らせなければならない。
21 २१ द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली तर ती द्राक्षे पुन्हा तोडू नको ती अनाथ, परके, व विधवा त्यांच्यासाठीच राहू दे.
またぶどう畑のぶどうを摘み取るときは、その残ったものを、ふたたび捜してはならない。それを寄留の他国人と孤児と寡婦に取らせなければならない。
22 २२ तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हास हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.
あなたはかつてエジプトの国で奴隷であったことを記憶しなければならない。それでわたしはあなたにこの事をせよと命じるのである。

< अनुवाद 24 >