< अनुवाद 22 >
1 १ आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा.
You shall not see your brother’s ox or his sheep go astray, and hide yourself from them: you shall in any case bring them again to your brother.
2 २ तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्यास परत कर.
And if your brother be not near to you, or if you know him not, then you shall bring it to your own house, and it shall be with you until your brother seek after it, and you shall restore it to him again.
3 ३ कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा, व त्या शेजाऱ्याला मदत कर.
In like manner shall you do with his ass; and so shall you do with his raiment; and with all lost thing of your brother’s, which he has lost, and you have found, shall you do likewise: you may not hide yourself.
4 ४ कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्यास उठवून उभे राहायला मदत करा.
You shall not see your brother’s ass or his ox fall down by the way, and hide yourself from them: you shall surely help him to lift them up again.
5 ५ बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकांचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विट आहे.
The woman shall not wear that which pertains to a man, neither shall a man put on a woman’s garment: for all that do so are abomination to the LORD your God.
6 ६ वाटेत तुम्हास झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.
If a bird’s nest chance to be before you in the way in any tree, or on the ground, whether they be young ones, or eggs, and the dam sitting on the young, or on the eggs, you shall not take the dam with the young:
7 ७ हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल.
But you shall in any wise let the dam go, and take the young to you; that it may be well with you, and that you may prolong your days.
8 ८ नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हास लागणार नाही.
When you build a new house, then you shall make a battlement for your roof, that you bring not blood on your house, if any man fall from there.
9 ९ द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. त्यामुळे संपूर्ण कापणी पवित्र ठिकाणी दिली जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हास वापरता येणार नाही.
You shall not sow your vineyard with divers seeds: lest the fruit of your seed which you have sown, and the fruit of your vineyard, be defiled.
10 १० बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
You shall not plow with an ox and an ass together.
11 ११ लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरू नका.
You shall not wear a garment of divers sorts, as of woolen and linen together.
12 १२ वेगवेगळे धागे एकत्र करून त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.
You shall make you fringes on the four quarters of your clothing, with which you cover yourself.
13 १३ एखाद्या मनुष्यास लग्न केल्यावर पत्नीशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर पत्नी आवडेनाशी झाली आणि
If any man take a wife, and go in to her, and hate her,
14 १४ मी या स्त्रीशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल.
And give occasions of speech against her, and bring up an evil name on her, and say, I took this woman, and when I came to her, I found her not a maid:
15 १५ तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे.
Then shall the father of the damsel, and her mother, take and bring forth the tokens of the damsel’s virginity to the elders of the city in the gate:
16 १६ मुलीच्या वडिलाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्यास नकोशी झाली आहे.
And the damsel’s father shall say to the elders, I gave my daughter to this man to wife, and he hates her;
17 १७ त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा, असे मुलीच्या वडिलांनी तेथे सांगून, त्या गावच्या मंडळींना ती चादर दाखववावी.
And, see, he has given occasions of speech against her, saying, I found not your daughter a maid; and yet these are the tokens of my daughter’s virginity. And they shall spread the cloth before the elders of the city.
18 १८ यावर गावच्या वडिलांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी.
And the elders of that city shall take that man and chastise him;
19 १९ त्यास शंभर शेकेल दंड वसुल करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने पत्नी म्हणून तिचा स्विकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.
And they shall amerce him in an hundred shekels of silver, and give them to the father of the damsel, because he has brought up an evil name on a virgin of Israel: and she shall be his wife; he may not put her away all his days.
20 २० पण पत्नीबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर;
But if this thing be true, and the tokens of virginity be not found for the damsel:
21 २१ गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही मूर्खपणाची गोष्ट केली आहे. आपल्या वडिलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.
Then they shall bring out the damsel to the door of her father’s house, and the men of her city shall stone her with stones that she die: because she has worked folly in Israel, to play the whore in her father’s house: so shall you put evil away from among you.
22 २२ एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलातून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
If a man be found lying with a woman married to an husband, then they shall both of them die, both the man that lay with the woman, and the woman: so shall you put away evil from Israel.
23 २३ एखाद्या कुमारिकेची मागणी झालेली असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर
If a damsel that is a virgin be betrothed to an husband, and a man find her in the city, and lie with her;
24 २४ त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची पत्नी होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकावा.
Then you shall bring them both out to the gate of that city, and you shall stone them with stones that they die; the damsel, because she cried not, being in the city; and the man, because he has humbled his neighbor’s wife: so you shall put away evil from among you.
25 २५ पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.
But if a man find a betrothed damsel in the field, and the man force her, and lie with her: then the man only that lay with her shall die.
26 २६ त्या मुलीला काही करु नये. देहांत शासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.
But to the damsel you shall do nothing; there is in the damsel no sin worthy of death: for as when a man rises against his neighbor, and slays him, even so is this matter:
27 २७ त्यास ही मुलगी रानात आढळली, त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.
For he found her in the field, and the betrothed damsel cried, and there was none to save her.
28 २८ वाग्दत्त झालेली नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास
If a man find a damsel that is a virgin, which is not betrothed, and lay hold on her, and lie with her, and they be found;
29 २९ त्याने मुलीच्या वडीलांना पन्नास शेकेल रुपे द्यावी. आता ती त्याची पत्नी झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.
Then the man that lay with her shall give to the damsel’s father fifty shekels of silver, and she shall be his wife; because he has humbled her, he may not put her away all his days.
30 ३० “आपल्या वडलांच्या पत्नीशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”
A man shall not take his father’s wife, nor discover his father’s skirt.