< अनुवाद 21 >
1 १ तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि त्यास कोणी मारले हे कळाले नाही
汝の神ヱホバの汝に與へて獲させたまふ地において若し人殺されて野に仆れをるあらんに之を殺せる者の誰なるかを知ざる時は
2 २ तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे.
汝の長老等と士師等出きたりその人の殺されをる處よりその四周の邑々までを度るべし
3 ३ मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक कालवड निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी.
而してその人の殺されをる處に最も近き邑すなはちその邑の長老等は未だ使はず未だ軛を負せて牽ざるところの少き牝牛を取り
4 ४ मग वडीलधाऱ्याने कालवड वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी तीची मान कापावी.
邑の長老等その牝牛を耕すことも種蒔こともせざる流つきせぬ谷に牽ゆきその谷において牝牛の頸を折べし
5 ५ तेव्हा लेवी वंशातील याजकांनी यावेळी तिथे असावे. आपली सेवा करून घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांस आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.
その時は祭司たるレビの子孫等其處に進み來るべし彼らは汝の神ヱホバが選びて己に事へしめまたヱホバの名をもて祝することを爲しめたまふ者にて一切の訴訟と一切の爭競は彼らの口によりて決定るべきが故なり
6 ६ मग त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील मनुष्यांनी, कालवड मारल्यावर तिच्यावर आपले हात धुवावे.
而してその人の殺されをりし處に最も近き邑の長老等その谷にて頸を折たる牝牛の上において手を洗ひ
7 ७ व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही.
答へて言べし我らの手はこの血を流さず我らの目はこれを見ざりしなり
8 ८ हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस. आम्हास शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हास दोषी धरु नकोस. त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचा दोष राहू देऊ नको. या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.”
ヱホバよ汝が贖ひし汝の民イスラエルを赦したまへこの辜なき者の血を流せる罰を汝の民イスラエルの中に降したまふ勿れと斯せば彼らその血の罪を赦されん
9 ९ याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करून तुम्ही आपल्यामधून या निरअपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू काढून टाकावा.
汝かくヱホバの善と觀たまふ事をおこなひその辜なき者の血を流せる咎を汝らの中より除くべし
10 १० जेव्हा तू आपल्या शत्रूशी युद्ध करायला जाशील व देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्यांना बंदीवान कराल.
汝出て汝の敵と戰ふにあたり汝の神ヱホバこれを汝の手に付したまひて汝これを俘虜となしたる時
11 ११ तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहीत झालास आणि लग्न करावे असे एखाद्याला वाटल्यास.
汝もしその俘虜の中に貌美しき女あるを見てこれを悦び取て妻となさんとせば
12 १२ तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.
汝の家の中にこれを携へゆくべし而して彼はその髮を剃り爪を截り
13 १३ तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडीलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल.
まだ俘虜の衣服を脱すてて汝の家に居りその父母のために一月のあひだ哀哭べし然る後なんぢ故の處に入りてこれが夫となりこれを汝の妻とすべし
14 १४ पुढे त्यास ती आवडली नाहीतर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिला पैसे देऊन विकू नये. तिला गुलाम म्हणून त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.
その後汝もし彼を好まずなりなば彼の心のままに去ゆかしむべし決して金のためにこれを賣べからず汝すでにこれを犯したれば之を嚴く待遇べからざるなり
15 १५ एखाद्याला दोन स्त्रिया असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.
人二人の妻ありてその一人は愛する者一人は惡む者ならんにその愛する者と惡む者の二人ともに男の子を生ありてその長子もし惡む婦の產る者なる時は
16 १६ तर तो आपल्या मुलांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल तेव्हा नाआवडतीचा मुलगा ज्येष्ठ असताना त्याऐवजी आपल्या मालमत्तेची वाटणी करताना, त्याने आपल्या आवडतीच्या मुलाला जेष्ठत्वाचा हक्क देऊ नये.
その子等に己の所有を嗣しむる日にその惡む婦の產る長子を措てその愛する婦の產る子を長子となすべからず
17 १७ त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्र नावडतीचा मुलगा असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्यास दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
必ずその惡む者の產る子を長子となし己の所有を分つ時にこれには二倍を與ふべし是は己の力の始にして長子の權これに屬すればなり
18 १८ एखाद्याचा मुलगा हट्टी व बंडखोर, अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा असेल शिक्षा केली तरी त्यांचे ऐकत नसेल.
人にもし放肆にして背悖る子ありその父の言にも母の言にも順はず父母これを責るも聽ことをせざる時は
19 १९ अशावेळी आईवडीलांनी त्यास गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावे.
その父母これを執へてその處の門にいたり邑の長老等に就き
20 २० या शहरातल्या वडीलधाऱ्यानी त्यांनी सांगावे की, हा उद्दाम व बंडखोर आहे. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.
邑の長老たちに言べし我らの此子は放肆にして背悖る者我らの言にしたがはざる者放蕩にして酒に耽る者なりと
21 २१ यावर त्या गावातील मनुष्यांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
然る時は邑の人みな石をもて之を撃殺すべし汝かく汝らの中より惡事を除き去べし然せばイスラエルみな聞て懼れん
22 २२ एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल, अशावेळी त्याच्या देहांतानंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील,
人もし死にあたる罪を犯して死刑に遇ことありて汝これを木に懸て曝す時は
23 २३ तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याच दिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.
翌朝までその體を木の上に留おくべからず必ずこれをその日の中に埋むべし其は木に懸らるる者はヱホバに詛はるる者なればなり斯するは汝の神ヱホバの汝に賜ふて產業となさしめたまふ地の汚れざらんためなり