< अनुवाद 21 >

1 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि त्यास कोणी मारले हे कळाले नाही
“在耶和华—你 神所赐你为业的地上,若遇见被杀的人倒在田野,不知道是谁杀的,
2 तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे.
长老和审判官就要出去,从被杀的人那里量起,直量到四围的城邑,
3 मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक कालवड निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी.
看哪城离被杀的人最近,那城的长老就要从牛群中取一只未曾耕地、未曾负轭的母牛犊,
4 मग वडीलधाऱ्याने कालवड वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी तीची मान कापावी.
把母牛犊牵到流水、未曾耕种的山谷去,在谷中打折母牛犊的颈项。
5 तेव्हा लेवी वंशातील याजकांनी यावेळी तिथे असावे. आपली सेवा करून घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांस आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.
祭司利未的子孙要近前来;因为耶和华—你的 神拣选了他们事奉他,奉耶和华的名祝福,所有争讼殴打的事都要凭他们判断。
6 मग त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील मनुष्यांनी, कालवड मारल्यावर तिच्यावर आपले हात धुवावे.
那城的众长老,就是离被杀的人最近的,要在那山谷中,在所打折颈项的母牛犊以上洗手,
7 व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही.
祷告说:‘我们的手未曾流这人的血;我们的眼也未曾看见这事。
8 हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस. आम्हास शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हास दोषी धरु नकोस. त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचा दोष राहू देऊ नको. या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.”
耶和华啊,求你赦免你所救赎的以色列民,不要使流无辜血的罪归在你的百姓以色列中间。’这样,流血的罪必得赦免。
9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करून तुम्ही आपल्यामधून या निरअपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू काढून टाकावा.
你行耶和华眼中看为正的事,就可以从你们中间除掉流无辜血的罪。”
10 १० जेव्हा तू आपल्या शत्रूशी युद्ध करायला जाशील व देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्यांना बंदीवान कराल.
“你出去与仇敌争战的时候,耶和华—你的 神将他们交在你手中,你就掳了他们去。
11 ११ तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहीत झालास आणि लग्न करावे असे एखाद्याला वाटल्यास.
若在被掳的人中见有美貌的女子,恋慕她,要娶她为妻,
12 १२ तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.
就可以领她到你家里去;她便要剃头发,修指甲,
13 १३ तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडीलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल.
脱去被掳时所穿的衣服,住在你家里哀哭父母一个整月,然后可以与她同房。你作她的丈夫,她作你的妻子。
14 १४ पुढे त्यास ती आवडली नाहीतर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिला पैसे देऊन विकू नये. तिला गुलाम म्हणून त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.
后来你若不喜悦她,就要由她随意出去,决不可为钱卖她,也不可当婢女待她,因为你玷污了她。”
15 १५ एखाद्याला दोन स्त्रिया असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.
“人若有二妻,一为所爱,一为所恶,所爱的、所恶的都给他生了儿子,但长子是所恶之妻生的。
16 १६ तर तो आपल्या मुलांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल तेव्हा नाआवडतीचा मुलगा ज्येष्ठ असताना त्याऐवजी आपल्या मालमत्तेची वाटणी करताना, त्याने आपल्या आवडतीच्या मुलाला जेष्ठत्वाचा हक्क देऊ नये.
到了把产业分给儿子承受的时候,不可将所爱之妻生的儿子立为长子,在所恶之妻生的儿子以上,
17 १७ त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्र नावडतीचा मुलगा असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्यास दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
却要认所恶之妻生的儿子为长子,将产业多加一分给他;因这儿子是他力量强壮的时候生的,长子的名分本当归他。”
18 १८ एखाद्याचा मुलगा हट्टी व बंडखोर, अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा असेल शिक्षा केली तरी त्यांचे ऐकत नसेल.
“人若有顽梗悖逆的儿子,不听从父母的话,他们虽惩治他,他仍不听从,
19 १९ अशावेळी आईवडीलांनी त्यास गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावे.
父母就要抓住他,将他带到本地的城门、本城的长老那里,
20 २० या शहरातल्या वडीलधाऱ्यानी त्यांनी सांगावे की, हा उद्दाम व बंडखोर आहे. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.
对长老说:‘我们这儿子顽梗悖逆,不听从我们的话,是贪食好酒的人。’
21 २१ यावर त्या गावातील मनुष्यांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
本城的众人就要用石头将他打死。这样,就把那恶从你们中间除掉,以色列众人都要听见害怕。”
22 २२ एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल, अशावेळी त्याच्या देहांतानंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील,
“人若犯该死的罪,被治死了,你将他挂在木头上,
23 २३ तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याच दिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.
他的尸首不可留在木头上过夜,必要当日将他葬埋,免得玷污了耶和华—你 神所赐你为业之地。因为被挂的人是在 神面前受咒诅的。

< अनुवाद 21 >