< अनुवाद 20 >

1 तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.
Ko greš ven na boj zoper svoje sovražnike in vidiš konje in bojne vozove in ljudstvo, številnejše od tebe, se jih ne boj, kajti Gospod, tvoj Bog, je s teboj, ki te je privedel gor iz egiptovske dežele.
2 तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याकडे येऊन त्यांच्याशी बोलणे करावे.
In zgodilo se bo, ko se približate k bitki, da bodo pristopili duhovniki in spregovorili ljudstvu
3 ते अशी, “इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका.
ter jim rekli: ›Prisluhni, oh Izrael, danes se približujete bitki zoper svoje sovražnike. Naj vaša srca ne slabijo, ne bojte se in ne trepetajte, niti zaradi njih ne bodite prestrašeni,
4 कारण तुम्हास देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरूद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हास मदत करणारा आहे.”
kajti Gospod, vaš Bog, je ta, ki gre z vami, da se za vas bori zoper vaše sovražnike, da vas reši.‹
5 मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला असे सांगावे, “नवीन घर बांधून अजून त्याचे अर्पण केले नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
Častniki bodo ljudstvu govorili, rekoč: ›Kateri mož je tam, ki je zgradil novo hišo in je ni posvetil? Naj ta gre in se vrne k svoji hiši, da v bitki ne umre in je ne posveti drug moški.
6 द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल.
In kateri mož je ta, ki je zasadil vinograd in še ni jedel od njega? Tudi ta naj gre in se vrne k svoji hiši, da v bitki ne umre in drug moški ne jé od njega.
7 तसेच, पत्नीला मागणी घालून अजून लग्न केलेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.”
In kateri mož je tam, ki je zaročil ženo in je še ni vzel? Naj gre in se vrne k svoji hiši, da v bitki ne umre in je ne vzame drug moški.‹
8 त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की “भीत्रा व घाबरलेल्या मनाचा कोणी असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही हृदयाचे अवसान गळेल.”
Častniki bodo naprej govorili ljudstvu in bodo rekli: ›Kateri moški je tam, ki je bojazljiv in boječ? Naj gre in se vrne k svoji hiši, da ne bo srce njegovih bratov oslabelo tako kakor njegovo srce.‹
9 अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी.
Zgodilo se bo, ko bodo častniki končali govorjenje ljudstvu, da bodo postavili poveljnike vojsk, da vodijo ljudstvo.
10 १० तुम्ही एखाद्या नगरावर चाल करून जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करून पाहा.
Ko prideš blizu mesta, da se boriš zoper njega, potem mu razglasi mir.
11 ११ त्यांनी तुमच्या बोलण्याला शांतीने उत्तर देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील.
Zgodilo se bo, če ti ta naredi odgovor miru in ti odpre, potem se bo zgodilo, da ti bodo vsi ljudje, ki so najdeni notri, postali davkoplačevalci in ti bodo služili.
12 १२ पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला.
Če pa s teboj ne bo sklenilo miru, temveč se bo zoper tebe vojskovalo, potem ga boš oblegal
13 १३ आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना तलवारीने ठार करा.
in ko ga Gospod, tvoj Bog, izroči v tvoje roke, boš vsakega tamkajšnjega moškega udaril z ostrino meča.
14 १४ पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत: साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.
Toda ženske, malčke, živino in vse, kar je v mestu, torej ves njegov plen, boš vzel k sebi in jedel boš plen svojih sovražnikov, ki ti ga je dal Gospod, tvoj Bog.
15 १५ तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे.
Tako boš storil vsem mestom, ki so zelo daleč od tebe, ki niso od mest teh narodov.
16 १६ पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.
Toda od mest teh ljudstev, ki ti jih Gospod, tvoj Bog, da za dediščino, ne boš ohranil živega ničesar, kar diha,
17 १७ हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा.
temveč jih boš popolnoma uničil, namreč Hetejce, Amoréjce, Kánaance, Perizéjce, Hivéjce in Jebusejce, kakor ti je zapovedal Gospod, tvoj Bog,
18 १८ नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हास शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.
da te ne naučijo delati po vseh svojih ogabnostih, ki so jih storili svojim bogovom. Tako bi grešili zoper Gospoda, svojega Boga.
19 १९ युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.
Ko boš dolgo časa oblegal mesto in se vojskoval zoper njega, da ga zavzameš, ne boš uničil njegovih dreves s tem, da bi nadnje privedel sekiro, kajti od njih lahko ješ in ne boš jih posekal, da bi jih uporabil pri obleganju (kajti poljsko drevo je življenje človeku).
20 २० पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेल ते नगर पडेपर्यंत युद्धासाठी लागणारी तटबंदी बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.
Uničil in posekal boš le drevesa, za katera veš, da niso drevesa za hrano. Zoper mesto, ki se bojuje s teboj, boš zgradil branike, dokler ne bo podjarmljeno.

< अनुवाद 20 >