< अनुवाद 2 >

1 मोशे आणखीन पुढे म्हणाला; “परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो.
E voltamos, e partimo-nos ao deserto caminho do mar Vermelho, como o SENHOR me havia dito; e rodeamos o monte de Seir por muitos dias.
2 परमेश्वर तेव्हा मला म्हणाला,
E o SENHOR me falou, dizendo:
3 ‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा.
Demais rodeastes este monte; voltai-vos ao norte.
4 आणि लोकांस आणखी एक सांग, तुम्हास वाटेत सेईर लागेल. ती भूमी एसावाच्या वंशाजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे त्यांना तुमची भीती वाटेल तेव्हा सांभाळा.
E manda ao povo, dizendo: Passando vós pelo termo de vossos irmãos os filhos de Esaú, que habitam em Seir, eles terão medo de vós; mas vós guardai-vos muito:
5 त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे.
Não vos metais com eles; que não vos darei de sua terra nem ainda a pisadura da planta de um pé; porque eu dei por herança a Esaú o monte de Seir.
6 तुमचे अन्न पैसे देवून, विकत घेवून खा. पाणीही विकत घेवून प्या.
Comprareis deles por dinheiro os alimentos, e comereis; e também comprareis deles a água, e bebereis:
7 तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही.’
Pois o SENHOR teu Deus te abençoou em toda obra de tuas mãos: ele sabe que andas por este grande deserto: estes quarenta anos o SENHOR teu Deus foi contigo; e nenhuma coisa te faltou.
8 तेव्हा एसावचे वंशज राहत असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो.
E passamos por nossos irmãos os filhos de Esaú, que habitavam em Seir, pelo caminho da planície de Elate e de Eziom-Geber. E voltamos, e passamos caminho do deserto de Moabe.
9 परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’”
E o SENHOR me disse: Não perturbeis a Moabe, nem te empenhes com eles em guerra, que não te darei possessão de sua terra; porque eu dei a Ar por herança aos filhos de Ló.
10 १० पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते.
(Os emins habitaram nela antes, povo grande, e numeroso, e alto como gigantes:
11 ११ या एमींना लोक अनाकी यांच्याप्रमाणेच रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.
Por gigantes eram eles também contados, como os anaquins; e os moabitas os chamam emins.
12 १२ पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत. पण एसावाच्या वंशजांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलींनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.
E em Seir habitaram antes os horeus, aos quais os filhos de Esaú expulsaram; e os destruíram de diante de si, e moraram em lugar deles; como fez Israel na terra de sua possessão que lhes deu o SENHOR.)
13 १३ “मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले.” त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.
Levantai-vos agora, e passai o ribeiro de Zerede. E passamos o ribeiro de Zerede.
14 १४ कादेश बर्ण्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या पिढीतील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने शपथ वाहिल्या प्रमाणे हे झाले.
E os dias que andamos de Cades-Barneia até que passamos o ribeiro de Zerede, foram trinta e oito anos; até que se acabou toda a geração dos homens de guerra do meio do acampamento, como o SENHOR lhes havia jurado.
15 १५ त्यांचा समूळ नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा त्यांच्यावर हात उगारलेला होता
E também a mão do SENHOR foi sobre eles para destruí-los do meio do campo, até acabá-los.
16 १६ ह्याप्रकारे सर्व योद्धे मरण पावले, ती पिढी नामशेष झाली,
E aconteceu que quando se acabaram de morrer todos os homens de guerra dentre o povo,
17 १७ परमेश्वर मला म्हणाला,
O SENHOR me falou, dizendo:
18 १८ “तुला आज मवाबाची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे.
Tu passarás hoje o termo de Moabe, a Ar,
19 १९ तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”
E te aproximarás diante dos filhos de Amom: não os perturbeis, nem te metas com eles; porque não te tenho de dar possessão da terra dos filhos de Amom; que aos filhos de Ló a dei por herança.
20 २० त्या भागाला “रेफाई देश” असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना “जमजुम्मी” म्हणत.
(Por terra de gigantes foi também ela tida: habitaram nela gigantes em outro tempo, aos quais os amonitas chamavam zanzumins;
21 २१ जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते. पण त्यांचा संहार करायला अम्मोनी लोकांस परमेश्वराचे साहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात.
Povo grande, e numeroso, e alto, como os anaquins; aos quais o SENHOR destruiu de diante dos amonitas, os quais lhes sucederam, e habitaram em seu lugar:
22 २२ एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात.
Como fez com os filhos de Esaú, que habitavam em Seir, de diante dos quais destruiu aos horeus; e eles lhes sucederam, e habitaram em seu lugar até hoje.
23 २३ त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते, त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत.
E aos aveus que habitavam em vilas até Gaza, os caftoreus que saíram de Caftor os destruíram, e habitaram em seu lugar.)
24 २४ पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा व आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर.
Levantai-vos, parti, e passai o ribeiro de Arnom: eis que dei em tua mão a Seom rei de Hesbom, amorreu, e a sua terra: começa a tomar possessão, e empenha-te com ele em guerra.
25 २५ तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील.”
Hoje começarei a pôr teu medo e teu espanto sobre os povos debaixo de todo o céu, os quais ouvirão tua fama, e tremerão, e se angustiarão diante de ti.
26 २६ मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,
E enviei mensageiros desde o deserto de Quedemote a Seom rei de Hesbom, com palavras de paz, dizendo:
27 २७ “तुमच्या देशातून आम्हास जाऊ दे. आमची वाट सोडून आम्ही उजवीडावीकडे वळणार नाही.
Passarei por tua terra pelo caminho: pelo caminho irei, sem apartar-me à direita nem à esquerda:
28 २८ तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पाणीही पैसे घेऊन विकत प्यायवयास दे, आम्हास फक्त इथून पलीकडे पायी जाऊ दे.
A comida me venderás por dinheiro e comerei: a água também me darás por dinheiro, e beberei: somente passarei a pé;
29 २९ यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हास देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हास जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हास जाऊ दिले तसेच तूही कर.”
Como o fizeram comigo os filhos de Esaú que habitavam em Seir, e os moabitas que habitavam em Ar; até que passe o Jordão à terra que nos dá o SENHOR nosso Deus.
30 ३० पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्यास पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यास कठोर केले. त्याचे मन कठीण केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.
Mas Seom rei de Hesbom não quis que passássemos pelo território seu; porque o SENHOR teu Deus havia endurecido seu espírito, e obstinado seu coração para entregá-lo em tua mão, como hoje.
31 ३१ परमेश्वर मला म्हणाला, “सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून त्यांचा ताबा घे.”
E disse-me o SENHOR: Eis que eu comecei a dar diante de ti a Seom e a sua terra; começa a tomar possessão, para que herdes sua terra.
32 ३२ आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले.
E saiu-nos Seom ao encontro, ele e todo seu povo, para lutar em Jaza.
33 ३३ परमेश्वर देवाने त्यास आपल्या ताब्यात दिले म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व सर्व लोकांचा पराभव करू शकलो.
Mas o SENHOR nosso Deus o entregou diante de nós; e ferimos a ele e a seus filhos, e a todo seu povo.
34 ३४ त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.
E tomamos então todas suas cidades, e destruímos todas as cidades, homens, e mulheres, e crianças; não deixamos ninguém:
35 ३५ तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली.
Somente tomamos para nós os animais, e os despojos das cidades que havíamos tomado.
36 ३६ आर्णोन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एक नगर तसेच आर्णोन खोरे ते गिलादापर्यंत सर्व नगरे, आमचा देव परमेश्वर याने आम्हास दिली. आम्हास दुर्गम असे एकही नगर नव्हते.
Desde Aroer, que está junto à beira do ribeiro de Arnom, e a cidade que está no ribeiro, até Gileade, não houve cidade que escapasse de nós: todas as entregou o SENHOR nosso Deus em nosso poder.
37 ३७ अम्मोन्याचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही गेलो नाही. कारण आमचा देव परमेश्वर याने तेथे जाण्यास बंदी केली होती.
Somente à terra dos filhos de Amom não chegaste, nem a tudo o que está à beira do ribeiro de Jaboque nem às cidades do monte, nem a lugar algum que o SENHOR nosso Deus havia proibido.

< अनुवाद 2 >