< अनुवाद 18 >
1 १ लेवी याजकाला म्हणजे लेव्यांच्या सर्व वंशातील लोकांस इस्राएलमध्ये जमिनीत वाटा किंवा वतन मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा.
Duhovniki Lévijevci in ves Lévijev rod ne bodo imeli niti deleža niti dediščine z Izraelom. Jedli bodo Gospodove daritve, narejene z ognjem in [od] njegove dediščine.
2 २ त्यांच्या इतर भाऊबंदाप्रमाणे लेवींना जमिनीत वतन नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचे वतन होय.
Zato ne bodo imeli dediščine med svojim brati. Gospod je njihova dediščina, kakor jim je rekel.
3 ३ यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.
In to bo pripadlo duhovniku od ljudstva, od tistih, ki darujejo klavno daritev, bodisi je to vol ali ovca; in duhovniku bodo dali pleče, dve ličnici in vamp.
4 ४ धान्य, नवीन द्राक्षरस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
Tudi prve sadove svojega žita, svojega vina, svojega olja in prvo runo svojih ovc mu boš dal.
5 ५ कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे.
Kajti Gospod, tvoj Bog, ga je izbral izmed vseh tvojih rodov, da stoji, da služi v Gospodovem imenu, njemu in njegovim sinovom na veke.
6 ६ प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्यास काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कोणत्याही नगरात राहणारा कोणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्यास मुभा आहे.
Če pride Lévijevec od katerihkoli izmed tvojih velikih vrat, ven iz vsega Izraela, kjer je začasno bival in pride z vso željo svojega uma na kraj, ki ga bo Gospod izbral,
7 ७ परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी.
potem bo služil v imenu Gospoda, svojega Boga, kakor počno vsi njegovi bratje Lévijevci, ki stojijo tam pred Gospodom.
8 ८ त्यास इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.
Za jesti bodo imeli podobne obroke, poleg tega, kar pride od prodaje imetja njegovega očeta.
9 ९ तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या ठिकाणी राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.
Ko prideš v deželo, ki ti jo daje Gospod, tvoj Bog, se ne boš naučil ravnati po gnusobah teh narodov.
10 १० आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.
Naj ne bo najti med vami nikogar, ki primora svojega sina ali svojo hčer, da gre skozi ogenj ali da uporablja vedeževanje ali astrologa ali uročevalca ali čarovnico
11 ११ वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. तुमच्यापैकी कोणीमध्यस्थ, मांत्रिक बनू नये. मृतात्म्याशी विचारणारा असू नये.
ali zaklinjevalca ali posvetovalca z osebnimi duhovi ali čarovnika ali rotilca duhov umrlih.
12 १२ अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल.
Kajti vsi ti, ki počno te stvari, so gnusoba Gospodu in zaradi teh gnusob jih bo Gospod, tvoj Bog, pognal izpred tebe.
13 १३ तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशीच पूर्णपणे विश्वासू असा.
Popoln boš z Gospodom, svojim Bogom.
14 १४ इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक ज्योतिषी, चेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास तसे करु देणार नाही.
Kajti ti narodi, ki se jih boš polastil, so poslušali astrologe in vedeževalce, toda kar se tebe tiče, ti Gospod, tvoj Bog, ni dopustil, da tako počneš.
15 १५ परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.
Gospod, tvoj Bog, ti bo iz tvoje srede, izmed tvojih bratov, obudil Preroka, podobnega meni. Njemu boste prisluhnili,
16 १६ तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हास या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.
glede na vse, kar si na Horebu želel od Gospoda, svojega Boga, na dan zbora, rekoč: ›Naj ne poslušam ponovno glasu Gospoda, svojega Boga niti naj ne vidim več tega velikega ognja, da ne umrem.‹
17 १७ तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, यांचे म्हणणे ठीकच आहे.
Gospod mi je rekel: ›Dobro so govorili to, kar so govorili.
18 १८ मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.
Vzdignil jim bom preroka izmed njihovih bratov, podobnega tebi in svoje besede bom položil v njegova usta in govoril jim bo vse, kar mu bom zapovedal.
19 १९ हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन.
In zgodilo se bo, da kdorkoli ne bo prisluhnil mojim besedam, ki jih bo govoril v mojem imenu, bom to zahteval od njega.
20 २० पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्यास मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित उदयास येईल. त्यालाही ठार मारले पाहिजे.
Toda prerok, ki si bo predrznil govoriti besedo v mojem imenu, ki mu je nisem zapovedal govoriti ali ki bo govoril v imenu drugih bogov, celo ta prerok bo umrl.‹
21 २१ तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार?
In če v svojem srcu rečeš: ›Kako bomo spoznali besedo, ki je Gospod ni govoril?‹
22 २२ तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत: चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही.
Kadar prerok spregovori v Gospodovem imenu, če stvar ne sledi niti se ne zgodi, to je stvar, ki je Gospod ni rekel, temveč je prerok to prepotentno govoril. Ne boš se ga bal.