< अनुवाद 16 >

1 अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास रात्रीच्या वेळी मिसरदेशातून बाहेर काढले.
Kepe thou the monethe of newe fruytis, and of the bigynnyng of somer, that thou make pask to thi Lord God; for in this monethe thi Lord God ledde thee out of Egipt in the nyyt.
2 परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वरास अर्पण करा. शेळ्यामेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा.
And thou schalt offre pask to thi Lord God, of scheep and of oxun, in the place which thi Lord God chees, that his name dwelle there.
3 त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे दु: ख स्मरणाची भाकर होय. त्याने तुम्हास मिसरमधील कष्टांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हास तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका.
Thou schalt not ete `ther ynne breed `diyt with sourdouy; in seuene daies thou schalt ete breed of affliccioun, with out sourdouy, for in drede thou yedist out of Egipt, that thou haue mynde of the dai of thi goyng out of Egipt, in alle the daies of thi lijf.
4 तेव्हा या सात दिवसात देशभर कोणाच्याही घरी खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली द्याल तो सूर्योदयापूर्वी खाऊन संपवून टाका.
No thing `diyt with sourdouy schal appere in alle thi termes by seuene daies, and of the fleischis of that that is offrid in the euentid, schal not dwelle in the firste dai in the morewtid.
5 वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका.
Thou schalt not mow offre pask in ech of thi citees whiche thi Lord God schal yyue to thee,
6 देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हास बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.
but in the place which thi Lord God chees, that his name dwelle there; thou schalt offre pask in the euentid, at the goyng doun of the sunne, whanne thou yedist out of Egipt.
7 तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा.
And thou schalt sethe, and ete, in the place which thi Lord God hath chose, and thou schalt rise in the morewtid of the secunde dai, and thou schalt go in to thi tabernaclis.
8 सहा दिवस बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा.
Bi sixe daies thou schalt ete therf breed; and in the seuenthe dai, for it is the gaderyng of thi Lord God, thou schalt not do werk.
9 पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा उभ्या पिकाला विळा लागल्यापासून सात आठवडे मोजा.
Thou schalt noumbre to thee seuene woukis, fro that dai in which thou settidist a sikil in to the corn;
10 १० मग, आपल्या खुशीने एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा.
and thou schalt halewe the feeste dai of woukis to thi Lord God, a wilful offryng of thyn hond, which thou schalt offre by the blessing of thi Lord God.
11 ११ परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, गावातील लेवी, परके, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या.
And thou schalt ete bifore thi Lord God, thou, and thi sone, and thi douytir, and thi seruaunt, and thin handmayde, and the dekene which is with ynne thi yatis, and the comelynge, and the fadirles ethir modirles child, and the widue, that dwellen with you, in the place `which thi Lord God chees that his name dwelle there.
12 १२ तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नये म्हणून हे विधी न चुकता पाळा.
And thou schalt haue mynde for thou were seruaunt in Egipt, and thou schalt kepe and do tho thingis that ben comaundid.
13 १३ खळ्यातील आणि द्राक्षकुंडामधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसानी मंडपाचा सण साजरा करा.
And thou schalt halewe the solempnytee of tabernaclis bi seuene daies, whanne thou hast gaderid thi fruytis of the cornfloor, and pressour.
14 १४ हा सणही मुले आणि मुली, दासदासी, लेवी, शहरातील वाटसरु, परके, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा.
And thou schalt ete in thi feeste dai, thou, and thi sone, and douytir, and thi seruaunt, and handmayde, also the dekene, and comelyng, and the fadirles ether modirles child, and the widewe, that ben with ynne thi yatis, `schulen ete.
15 १५ तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टी आहे. तेव्हा आनंदात राहा.
Bi seuene daies thou schalt halewe feestis to thi Lord God, in the place which the Lord chees; and thi Lord God schal blesse thee, in alle thi fruytis, and in al the werk of thin hondis, and thou schalt be in gladnesse.
16 १६ तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे.
In thre tymes bi the yeer al thi male kynde schal appere in the siyt of thi Lord, in the place which he chees, in the solempnyte of therf looues, and in the solempnyte of woukis, and in the solempnyte of tabernaclis. A man schal not appere voide bifor the Lord;
17 १७ प्रत्येकाने यथाशक्ती दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय आशीर्वाद दिला याचा विचार करून आपण काय द्यायचे ते ठरवावे.
but ech man schal offre vpe this that he hath, bi the blessyng of his Lord God, which he yaf to `that man.
18 १८ तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे.
Thou schalt ordeyne `iugis, and maystris, in alle thi yatis whiche thi Lord God schal yyue to thee, bi ech of thi lynagis, that thei deme the puple bi iust doom,
19 १९ त्यांनी नेहमी नि: पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात.
and bowe not in `to the tother part for fauour, ethir yifte `ayens equete. Thou schalt not take persoone nether yiftis, for whi yiftis blynden the iyen of wise men, `and chaungen the wordis of iust men.
20 २० चांगुलपणा आणि नि: पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेला हा प्रदेश संपादन करून तेथे तुम्ही सुखाने रहाल.
Thou schalt pursue iustli that that is iust, that thou lyue and welde the lond which thi Lord God schal yyue to thee.
21 २१ जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारू नका.
Thou schalt not plaunte a wode, and ech tre bi the auter of thi Lord God;
22 २२ कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.
nether thou schalt make to thee, and ordeyne an ymage; whiche thingis thi Lord God hatith.

< अनुवाद 16 >