< अनुवाद 10 >
1 १ तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले.
En ce temps-là, Yahweh me dit: Taille-toi deux tables de pierre, comme les premières, et monte vers moi sur la montagne; tu feras aussi une arche de bois.
2 २ तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.”
J’écrirais sur ces tables les paroles qui étaient sur les premières tables, que tu as brisées, et tu les mettras dans l’arche.
3 ३ मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.
Je fis une arche de bois d’acacia et, ayant taillé deux tables de pierre comme les premières, je montai sur la montagne, les deux tables dans ma main.
4 ४ मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हास दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.
Il écrivit sur ces tables ce qui avait été écrit sur les premières, les dix paroles que Yahweh vous avait dites sur la montagne, du milieu du feu, le jour de l’assemblée; et Yahweh me les donna.
5 ५ मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.
Je me tournai et, étant descendu de la montagne, je mis les tables dans l’arche que j’avais faite, et elles y sont restées, comme Yahweh me l’avait ordonné.
6 ६ इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्यास तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला.
Les enfants d’Israël partirent de Béeroth-Bené-Jakan pour Moséra. Là mourut Aaron, et il y fut enterré; Eléazar, son fils, fut grand prêtre à sa place.
7 ७ इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले.
De là ils partirent pour Gadgad, et de Gadgad pour Jétébatha, pays riche en cours d’eaux.
8 ८ त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांस आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात.
En ce temps-là, Yahweh sépara la tribu de Lévi, pour porter l’arche de l’alliance de Yahweh, pour se tenir devant Yahweh, pour le servir et pour bénir en son nom: ce qu’elle a fait jusqu’à ce jour.
9 ९ त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत व वतनात वाटा मिळाला नाही. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे.
C’est pourquoi Lévi n’a ni part ni héritage avec ses frères: c’est Yahweh qui est son héritage, comme Yahweh, ton Dieu, le lui a dit.
10 १० मी पहिल्या वेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले.
Je me tins sur la montagne, comme précédemment, quarante jours et quarante nuits, et Yahweh m’exauça encore cette fois: Yahweh ne voulut pas te détruire.
11 ११ तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, “ऊठ आणि लोकांस पुढच्या प्रवासास घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.”
Yahweh me dit: « Lève-toi, va te mettre à la tête du peuple; qu’ils entrent et qu’ils prennent possession du pays que j’ai juré à leurs pères de leur donner.
12 १२ आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी.
Et maintenant, Israël, que demande de toi Yahweh, ton Dieu, si ce n’est que tu craignes Yahweh, ton Dieu, en marchant dans toutes ses voies, en aimant et en servant Yahweh, ton Dieu, de tout ton cœur et de toute ton âme,
13 १३ परमेश्वराच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हास आज्ञापिले ते तुम्ही पाळावे, याशिवाय तुमचा देव तुमच्याकडून काय मागतो?
en observant les commandements de Yahweh et ses lois que je te prescris aujourd’hui, afin que tu sois heureux?
14 १४ सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे.
Vois! À Yahweh, ton Dieu, appartiennent le ciel et le ciel des cieux, la terre et tout ce qu’elle renferme.
15 १५ परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे.
Et c’est à tes pères seulement que Yahweh s’est attaché pour les aimer; et c’est leur postérité après eux, c’est vous qu’il a choisi d’entre tous les peuples, comme vous le voyez aujourd’hui.
16 १६ तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत: करणे परमेश्वरास द्या.
Circoncisez donc votre cœur et ne raidissez plus votre cou.
17 १७ कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही.
Car Yahweh, votre Dieu, est le Dieu des dieux, le Seigneur des seigneurs, le Dieu grand, fort et terrible, qui ne fait point acception des personnes et qui ne reçoit point de présent,
18 १८ अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो.
qui fait droit à l’orphelin et à la veuve, qui aime l’étranger et lui donne de la nourriture et des vêtements.
19 १९ म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात.
Vous aimerez l’étranger, car vous avez été étrangers dans le pays d’Égypte.
20 २० तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.
Tu craindras Yahweh, ton Dieu, tu le serviras, tu t’attacheras à lui, et tu jureras par son nom.
21 २१ फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
Il est ta louange, il est ton Dieu; c’est lui qui a fait pour toi ces choses grandes et terribles que tes yeux ont vues.
22 २२ तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने अधिक, आकाशातील ताऱ्यांइतके झाला आहात.
Tes pères descendirent en Égypte au nombre de soixante-dix personnes, et maintenant Yahweh, ton Dieu, a fait de toi une multitude comme les étoiles du ciel.