< अनुवाद 10 >

1 तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले.
那時上主對我說:「你再鑿兩塊石版,與先前的一樣,然後上山到我跟前來;還要做一個木櫃。
2 तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.”
我要把你先前摔碎的那兩塊版上的話,寫在這兩塊版上。你要將這兩塊石版放在櫃裏。」
3 मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.
我於是做了一個皂莢木櫃,鑿了兩塊與先前一樣的石版,手裏拿著這兩塊石版上山去了。
4 मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हास दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.
上主將先前所寫的,即在集會之日,在山上由火中對你們所說的那十句話,寫在這兩塊版上,交給了我。
5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.
我遂轉身下山,照上主吩咐我的,將版放在我做的櫃內,存在那裏。
6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्यास तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला.
以色列子民由貝洛特貝乃雅干起程,到了摩色辣,亞郎在那裏死了,也埋在那裏;他的兒子厄肋阿匝爾繼他做了大司祭。
7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले.
又從那裏起程,到了古德哥達,又從古德哥達到了多溪水之地約特巴達。
8 त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांस आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात.
那時,上主選拔了肋未支派,叫他們抬上主的約櫃,侍立在上主面前事奉他,並奉他的名祝福,直到今日。
9 त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत व वतनात वाटा मिळाला नाही. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे.
為此,肋未人同自己的兄弟沒有分得產業,因為照上主你的天主對他們所說的:上主自己是他們的產業。
10 १० मी पहिल्या वेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले.
我如先前一樣,在山上逗留了四十天四十夜;上主這一次又俯聽了我,放棄了消滅你的意思。
11 ११ तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, “ऊठ आणि लोकांस पुढच्या प्रवासास घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.”
上主且對我說:「起來,在人民前面領路,叫他們去佔領我對他們祖先誓許要賜給他們的地方。」
12 १२ आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी.
以色列! 現今上主你的天主向你要求什麼﹖是要求你敬畏上主你的天主,履行他的一切道路,愛他,全心全靈事奉上主你的天主,
13 १३ परमेश्वराच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हास आज्ञापिले ते तुम्ही पाळावे, याशिवाय तुमचा देव तुमच्याकडून काय मागतो?
遵守我今天吩咐你的天主的誡命和法令,好使你能獲得幸福。
14 १४ सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे.
看天與天上的天,地和地上的一切,都屬於上主你的天主;
15 १५ परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे.
但上主只喜歡了你的祖先,鍾愛他們,由萬民中揀選了他們的後裔,就是你們,正如你們今日所見的一樣。
16 १६ तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत: करणे परमेश्वरास द्या.
為此,你們要心受割損,不要執拗,
17 १७ कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही.
因為上主你們的天主是萬神之神,萬主之主,偉大、有力、可畏的天主,是不顧情面,不受賄賂,
18 १८ अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो.
為孤兒、寡婦主持正義,友愛外方人,供給他們食糧和衣服的天主。
19 १९ म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात.
為此,你們也應友愛外方人,因為你們在埃及也曾做過外方人。
20 २० तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.
你應敬畏上主你的天主,事奉依賴他,奉他的名起誓。
21 २१ फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
他是你的光榮,是你的天主,是他為你做了你親眼所見的奇異可畏的事。
22 २२ तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने अधिक, आकाशातील ताऱ्यांइतके झाला आहात.
你的祖先下到埃及時,總共不過七十人,現在上主你的天主卻使你多得有如天上的繁星。

< अनुवाद 10 >