< दानीएल 7 >

1 बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्यास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या.
در سال اول سلطنت بلشصر پادشاه بابِل، یک شب دانیال خوابی دید و آن را نوشت. این است شرح خواب او:
2 दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते.
من، دانیال، در خواب دریای پهناوری دیدم که در اثر وزش باد از هر سو، متلاطم شد.
3 चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली.
سپس چهار وحش بزرگ از دریا بیرون آمدند. هر کدام از آنها با دیگری تفاوت داشت.
4 पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्यास जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यात आले होते.
اولی شبیه شیر بود، اما بالهای عقاب داشت! وقتی به آن خیره شده بودم بالهایش کنده شد و دیگر نتوانست پرواز کند و مانند انسان روی دو پایش بر زمین ایستاد و عقل انسان به او داده شد.
5 नंतर दुसरे श्वापद अस्वलासारखे होते त्याच्या दातामध्ये तिन फासोळया धरल्या होत्या. त्यास सांगण्यात आले ‘उठ, पुढे पुष्कळ मांस खा.’
وحش دوم شبیه خرس بود و روی پاهایش ایستاد و آمادهٔ حمله شد. در میان دندانهایش سه دنده دیدم و صدایی شنیدم که به آن وحش می‌گفت: «برخیز و هر چه می‌توانی گوشت بخور!»
6 त्यानंतर मी पुन्हा पाहीले तो आणखी एक श्वापद चित्त्याप्रमाणे होते त्याच्या पाठीवर पक्षासारखे चार पंख होते. आणि त्यास चार शिरे होती. त्यास राज्य करण्यासाठी आधिकार दिला होता.
سومین وحش شبیه پلنگ بود. او بر پشتش چهار بال مثل بالهای پرندگان داشت و دارای چهار سر بود! به این وحش اقتدار و تسلط بر مردم داده شد.
7 त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्वापद पाहीले, विक्राळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्यास मोठे लोखंडी दात होते, ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी. आणि उरलेले पायाखाली तुडवी ते इतरांपेक्षा वेगळे होते. आणि त्यास दहा शिंगे होती.
سپس در خواب وحش چهارم را دیدم که بسیار هولناک و نیرومند بود. این وحش قربانیان خود را با دندانهای بزرگ و آهنینش پاره‌پاره کرد و بقیه را زیر پاهایش له نمود. این وحش از سه وحش دیگر متفاوت بود و ده شاخ داشت.
8 मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होते आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते.
وقتی به شاخهایش خیره شده بودم، ناگهان یک شاخ کوچک دیگر از میان آنها ظاهر شد و سه تا از شاخهای اول از ریشه کنده شدند. این شاخ کوچک چشمانی چون چشم انسان داشت و از دهانش سخنان تکبرآمیز بیرون می‌آمد.
9 मी पाहत होतो तेव्हा, आसने मांडण्यात आली; आणि एक पुराणपुरूष आसनावर बसला. त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते. आणि त्याची चाके जळणारा अग्नी होते.
آنگاه تختهایی دیدم که برای داوری برقرار شد و «قدیم الایام» بر تخت خود نشست. لباس او همچون برف، سفید و موی سرش مانند پشم، خالص بود. تخت او شعله‌ور بود و بر چرخهای آتشین قرار داشت.
10 १० त्याच्या समोर अग्नीची नदी वाहत होती, हजारो लोक त्याची सेवा करीत होते, लाखो लोक समोर उभे होते, न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती.
رودخانه‌ای از آتش در برابرش جریان داشت. هزاران نفر او را خدمت می‌کردند و میلیونها نفر در حضورش ایستاده بودند. آنگاه دفترها برای داوری گشوده شد.
11 ११ मी सतत त्याकडे पाहत होतो कारण ते लहान शिंग फुशारकी मारत होते. मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला त्याच्या शरीराचे तूकडे करून ते जाळण्यास देण्यात आले.
سپس آن وحش چهارم را دیدم که کشته شد و بدنش در آتش سوزانده شد، زیرا شاخی که او داشت سخنان تکبرآمیز می‌گفت.
12 १२ इतर चार श्वापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले.
قدرت سلطنت سه وحش دیگر نیز از ایشان گرفته شد، ولی اجازه داده شد مدتی همچنان زنده بمانند.
13 १३ त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले, आकाशातील मेघावर स्वार होऊन कोणी मानवपूत्रासारखा येताना मी पाहिला तो पुराणपुरूषाकडे आला व त्यास त्याने जवळ केले.
آنگاه در رویاهای شبانه خود دیدم کسی مانند پسر انسان با ابرهای آسمان می‌آمد. او نزد «قدیم الایام» رسید و به حضور وی آورده شد.
14 १४ आणि त्यास प्रभुत्व व वैभव व राज्य दिले, ते असे की, सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी; त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, ते टळून जायचे नाही, आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे.
و اقتدار و جلال و قدرت سلطنت به او داده شد تا همهٔ قومها از هر زبان و نژاد او را خدمت کنند. قدرت او ابدی و سلطنتش بی‌زوال است.
15 १५ मग मज दानीएलचा जीव घाबरा झाला. मला झालेल्या दृष्टांतामुळे माझे मन विचलीत झाले.
من، دانیال، از تمام آنچه دیده بودم گیج و مضطرب شدم.
16 १६ सिंहासनाच्या जवळ उभे असणाऱ्यांपैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टींचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला.
پس به یکی از کسانی که کنار تخت ایستاده بود نزدیک شده، معنی این رؤیا را از او پرسیدم و او نیز آن را اینچنین شرح داد:
17 १७ ती मोठी चार श्वापदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे आहेत.
«این چهار وحش بزرگ، چهار پادشاه هستند که بر زمین سلطنت خواهند کرد.
18 १८ पण सर्वोच्च देवाच्या संतांना राज्य प्राप्त होईल, ते युगानयुग त्यांच्या ताब्यात राहील.
ولی سرانجام برگزیدگان خدای متعال قدرت سلطنت را به دست خواهند گرفت، و تا ابدالاباد حکومت خواهند کرد.»
19 १९ नंतर मला त्या चौथ्या श्वापदा विषयी बोलण्याची इच्छा झाली, जे इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे दात लोखंडाचे भयंकर असे होते आणि त्याची नखे पितळेची होती, ते चावून चुरा करी. आणि उरलेले जे होते त्याचे पायाखाली तूकडे करी.
سپس دربارهٔ وحش چهارم که از سه وحش دیگر متفاوت بود سؤال کردم، آنکه هولناک بود و با دندانهای آهنین و چنگالهای مفرغین، قربانیان خود را پاره‌پاره می‌کرد و بقیه را زیر پاهایش له می‌نمود.
20 २० मला त्याची दहा शिंगे आणि त्याचे गुढ जाणायचे होते जी त्याच्या डोक्यावर होती. एक शिंग त्यामध्ये आणखी निघाले त्यामुळे तीन शिंगे तूटून पडली त्या शिंगाला डोळे असून तोंड होते त्यातून ते मोठमोठ्या गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्यांचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शविली.
همچنین دربارهٔ آن ده شاخ و شاخ کوچکی که بعد برآمد و نیز دربارۀ سه تا از آن ده شاخ که از ریشه کنده شد، سؤال کردم، یعنی شاخی که چشم داشت و از دهانش سخنان تکبرآمیز بیرون می‌آمد و از شاخهای دیگر بلندتر بود؛
21 २१ मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनांविरोधात युध्द करून त्यांच्यावर विजय मिळवला.
چون دیده بودم که این شاخ با برگزیدگان خدا جنگ کرده، بر آنها پیروز شد،
22 २२ आणि पुराणपुरूष येईपर्यंत ते त्यांच्यावर प्रबळ होत गेले. मग परात्पर देवाच्या पवित्र जनांस न्याय दिला, राज्य आपल्या मालकीचे करून घेतले, असा समय आला.
تا اینکه «قدیم الایام» آمد و داوری را آغاز کرده، از برگزیدگان خدای متعال حمایت نمود و زمانی رسید که قدرت سلطنت به ایشان واگذار شد.
23 २३ त्याने सांगितले चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल; हे इतर राज्यांपेक्षा वेगळे राहील ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, आणि तिचे पायाखाली तूकडे करीन.
او به من گفت: «وحش چهارم، سلطنت چهارم است که بر زمین ظهور خواهد کرد. این سلطنت از سلطنتهای دیگر متفاوت خواهد بود و تمام مردم دنیا را پاره‌پاره کرده زیر پاهایش له خواهد نمود.
24 २४ आता दहा शिंगाविषयी या राज्यातून दहा राजांचा उदय होईल; आणि त्यातून आणखी एक राजा निघेल. तो राजा वेगळा असेल आणि तो तीन राजांना पादाक्रांत करील.
ده شاخ او ده پادشاه هستند که از این سلطنت به قدرت می‌رسند. سپس پادشاهی دیگر روی کار خواهد آمد که با سه پادشاه پیشین فرق خواهد داشت و آنها را سرکوب خواهد کرد.
25 २५ तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल, आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.
او بر ضد خدای متعال سخن خواهد گفت و بر برگزیدگان او ظلم خواهد کرد و خواهد کوشید تمام قوانین و اعیاد مذهبی را دگرگون سازد. برگزیدگان خدا به مدت سه سال و نیم در زیر سلطه او خواهند بود.
26 २६ पण तिथे न्यायसभा होईल, आणि त्याचे राजकीय सामर्थ्य परत घेण्यात येतील. त्याचा नाश होऊन कायमचा नष्ट करण्यात येईल.
«اما پس از آن، داوری آغاز خواهد شد و قدرت سلطنت این پادشاه از او گرفته شده به کلی از بین خواهد رفت.
27 २७ राज्य, प्रभूत्व आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या पवित्र जनांना देण्यात येईल. त्याचे राज्य अनंतकालचे आहे; आणि इतर त्याची सेवा करून त्याचे आज्ञापालन करतील.”
آنگاه قدرت و عظمت تمام سلطنتهای دنیا به برگزیدگان خدای متعال واگذار خواهد شد. سلطنت خدای متعال سلطنتی جاودانی خواهد بود و تمام پادشاهان جهان او را عبادت و اطاعت خواهند کرد.»
28 २८ या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले; पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या.
این بود خوابی که دیدم. وقتی بیدار شدم، بسیار آشفته بودم و از ترس رنگم پریده بود، اما خوابم را برای کسی تعریف نکردم.

< दानीएल 7 >