< दानीएल 3 >
1 १ नबुखद्नेस्सर राजाने सोन्याचा एक पुतळा केला त्याची उंची साठ हात आणि रुंदी सात हात होती, त्याची स्थापना त्याने बाबेल प्रांताच्या दुरा मैदानात केली.
१नबूकदनेस्सर राजा ने सोने की एक मूरत बनवाई, जिसकी ऊँचाई साठ हाथ, और चौड़ाई छः हाथ की थी। और उसने उसको बाबेल के प्रान्त के दूरा नामक मैदान में खड़ा कराया।
2 २ नंतर नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्र होण्यास आपले प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी हयांस निरोप पाठवला.
२तब नबूकदनेस्सर राजा ने अधिपतियों, हाकिमों, राज्यपालों, सलाहकारों, खजांचियों, न्यायियों, शास्त्रियों, आदि प्रान्त-प्रान्त के सब अधिकारियों को बुलवा भेजा कि वे उस मूरत की प्रतिष्ठा में आएँ जो उसने खड़ी कराई थी।
3 ३ नंतर प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक, प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यासाठी एकत्र आले की, नबुखद्नेस्सर राजाने स्थापित केलेल्या पुतळ्याचे समर्पण व्हावे.
३तब अधिपति, हाकिम, राज्यपाल, सलाहकार, खजांची, न्यायी, शास्त्री आदि प्रान्त-प्रान्त के सब अधिकारी नबूकदनेस्सर राजा की खड़ी कराई हुई मूरत की प्रतिष्ठा के लिये इकट्ठे हुए, और उस मूरत के सामने खड़े हुए।
4 ४ तेव्हा दवंडी देणारा ओरडला, “अहो विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनो,
४तब ढिंढोरिये ने ऊँचे शब्द से पुकारकर कहा, “हे देश-देश और जाति-जाति के लोगों, और भिन्न-भिन्न भाषा बोलनेवालो, तुम को यह आज्ञा सुनाई जाती है कि,
5 ५ ज्यावेळी तुम्ही शिंग, बासरी, सतार, विणा, पुंजी आणि सर्व प्रकारची वाद्ये यांचे संगीत ऐकाल त्यावेळी त्या सुवर्ण पुतळयास दंडवत करा ज्याची स्थापना नबुखद्नेस्सर राजाने केली आहे.
५जिस समय तुम नरसिंगे, बाँसुरी, वीणा, सारंगी, सितार, शहनाई आदि सब प्रकार के बाजों का शब्द सुनो, तुम उसी समय गिरकर नबूकदनेस्सर राजा की खड़ी कराई हुई सोने की मूरत को दण्डवत् करो।
6 ६ जो कोणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल.”
६और जो कोई गिरकर दण्डवत् न करेगा वह उसी घड़ी धधकते हुए भट्ठे के बीच में डाल दिया जाएगा।”
7 ७ मग शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी इत्यादी वाद्यांचा आवाज ऐकताच विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनी त्या सुवर्ण पुतळयास पालथे पडून दंडवत केले जो नबुखद्नेस्सर राजाने स्थापला होता.
७इस कारण उस समय ज्यों ही सब जाति के लोगों को नरसिंगे, बाँसुरी, वीणा, सारंगी, सितार शहनाई आदि सब प्रकार के बाजों का शब्द सुन पड़ा, त्यों ही देश-देश और जाति-जाति के लोगों और भिन्न-भिन्न भाषा बोलनेवालों ने गिरकर उस सोने की मूरत को जो नबूकदनेस्सर राजा ने खड़ी कराई थी, दण्डवत् किया।
8 ८ आता यावेळी काही खास्द्यांनी जवळ येऊन यहूद्यांवर दोषारोप केला.
८उसी समय कई एक कसदी पुरुष राजा के पास गए, और कपट से यहूदियों की चुगली की।
9 ९ ते नबुखद्नेस्सर राजास म्हणाले, “महाराज चिरायु असा.
९वे नबूकदनेस्सर राजा से कहने लगे, “हे राजा, तू चिरंजीवी रहे।
10 १० महाराज तुम्ही असे फर्मान काढले आहे ना, की, जो कोणी शिंग, बासरी, सतार, विणा, पुंगी आणि इतर वाद्याचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण् पुतळयास दंडवत करावे.
१०हे राजा, तूने तो यह आज्ञा दी है कि जो मनुष्य नरसिंगे, बाँसुरी, वीणा, सारंगी, सितार, शहनाई आदि सब प्रकार के बाजों का शब्द सुने, वह गिरकर उस सोने की मूरत को दण्डवत् करे;
11 ११ जो कोणी त्यास पायापडून नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल.
११और जो कोई गिरकर दण्डवत् न करे वह धधकते हुए भट्ठे के बीच में डाल दिया जाए।
12 १२ आता येथे काही यहूदी आहेत ज्यांची नेमणूक तुम्ही बाबेलाच्या प्रांतात केली, त्यांची नावे शद्रख, मेशख अबेदनगो ही आहेत. हे लोक, राजा, आपली पर्वा करत नाहीत, ते तुमच्या देवास नमन करत नाहीत, त्याची सेवा करत नाही, किंवा तुमच्या पुतळ्यास दंडवत करत नाहीत, ज्याची तुम्ही स्थापना केली आहे.”
१२देख, शद्रक, मेशक, और अबेदनगो नामक कुछ यहूदी पुरुष हैं, जिन्हें तूने बाबेल के प्रान्त के कार्य के ऊपर नियुक्त किया है। उन पुरुषों ने, हे राजा, तेरी आज्ञा की कुछ चिन्ता नहीं की; वे तेरे देवता की उपासना नहीं करते, और जो सोने की मूरत तूने खड़ी कराई है, उसको दण्डवत् नहीं करते।”
13 १३ तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रख, मेशख, अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले.
१३तब नबूकदनेस्सर ने रोष और जलजलाहट में आकर आज्ञा दी कि शद्रक, मेशक और अबेदनगो को लाओ। तब वे पुरुष राजा के सामने हाजिर किए गए।
14 १४ नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “काय तुम्ही शद्रख, मेशख, अबेदनगो आपल्या मनाची तयारी केली? की तुम्ही माझ्या स्थपलेल्या सुवर्ण पुतळयास नमन करून त्यास दंडवत करणार नाही?
१४नबूकदनेस्सर ने उनसे पूछा, “हे शद्रक, मेशक और अबेदनगो, तुम लोग जो मेरे देवता की उपासना नहीं करते, और मेरी खड़ी कराई हुई सोने की मूरत को दण्डवत् नहीं करते, तो क्या तुम जान बूझकर ऐसा करते हो?
15 १५ आता जर तुम्ही तयार आहात तर, जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी आणि इतर वाद्ययांचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही या पुतळयापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे; पण जर तुम्ही नमन करणार नाही, तर तुम्हास त्वरीत तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हास माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे?”
१५यदि तुम अभी तैयार हो, कि जब नरसिंगे, बाँसुरी, वीणा, सारंगी, सितार, शहनाई आदि सब प्रकार के बाजों का शब्द सुनो, और उसी क्षण गिरकर मेरी बनवाई हुई मूरत को दण्डवत् करो, तो बचोगे; और यदि तुम दण्डवत् न करो तो इसी घड़ी धधकते हुए भट्ठे के बीच में डाले जाओगे; फिर ऐसा कौन देवता है, जो तुम को मेरे हाथ से छुड़ा सके?”
16 १६ शद्रख, मेशख, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, “हे नबुखद्नेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही.
१६शद्रक, मेशक और अबेदनगो ने राजा से कहा, “हे नबूकदनेस्सर, इस विषय में तुझे उत्तर देने का हमें कुछ प्रयोजन नहीं जान पड़ता।
17 १७ जर काही उत्तर आहे, तर ते हे की, ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त आग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे, आणि महाराज तो आम्हास आपल्या हातून सोडवील.
१७हमारा परमेश्वर, जिसकी हम उपासना करते हैं वह हमको उस धधकते हुए भट्ठे की आग से बचाने की शक्ति रखता है; वरन् हे राजा, वह हमें तेरे हाथ से भी छुड़ा सकता है।
18 १८ पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि त्याच्या पुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही.”
१८परन्तु, यदि नहीं, तो हे राजा तुझे मालूम हो, कि हम लोग तेरे देवता की उपासना नहीं करेंगे, और न तेरी खड़ी कराई हुई सोने की मूरत को दण्डवत् करेंगे।”
19 १९ नबुखद्नेस्सर रागाने संतप्त झाला, त्याची शद्रख, मेशख, अबेदनगो विरूद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमीपेक्षा सातपटीने तप्त करण्यात यावी.
१९तब नबूकदनेस्सर झुँझला उठा, और उसके चेहरे का रंग शद्रक, मेशक और अबेदनगो की ओर बदल गया। और उसने आज्ञा दी कि भट्ठे को सात गुणा अधिक धधका दो।
20 २० नंतर त्याने आपल्या सैनिकातील काही बलवान पुरुषास आज्ञा केली की, शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बांधा आणि तप्त भट्टीत टाका.
२०फिर अपनी सेना में के कई एक बलवान पुरुषों को उसने आज्ञा दी, कि शद्रक, मेशक और अबेदनगो को बाँधकर उन्हें धधकते हुए भट्ठे में डाल दो।
21 २१ ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे झगे आणि इतर वस्त्र घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले.
२१तब वे पुरुष अपने मोजों, अंगरखों, बागों और वस्त्रों सहित बाँधकर, उस धधकते हुए भट्ठे में डाल दिए गए।
22 २२ राजाची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त केलेली होती. शद्रख, मेशख, अबेदनगो यांना ज्यांनी भट्टीत टाकले ते सैनिक तिच्या ज्वालेने मरण पावले.
२२वह भट्ठा तो राजा की दृढ़ आज्ञा होने के कारण अत्यन्त धधकाया गया था, इस कारण जिन पुरुषों ने शद्रक, मेशक और अबेदनगो को उठाया वे ही आग की आँच से जल मरे।
23 २३ तिथे ते पुरुष शद्रख, मेशख, अबेदनगो हातपाय बांधलेले असे त्या भट्टीत पडले.
२३और उसी धधकते हुए भट्ठे के बीच ये तीनों पुरुष, शद्रक, मेशक और अबेदनगो, बंधे हुए फेंक दिए गए।
24 २४ नंतर नबुखद्नेस्सर चकीत होऊन त्वरीत उभा राहिला त्याने आपल्या सल्लागारास विचारले, “आपण त्या तिघांना बांधून भट्टीत टाकले ना?” त्यांनी उत्तर दिले, निश्चित राजे.
२४तब नबूकदनेस्सर राजा अचम्भित हुआ और घबराकर उठ खड़ा हुआ। और अपने मंत्रियों से पूछने लगा, “क्या हमने उस आग के बीच तीन ही पुरुष बंधे हुए नहीं डलवाए?” उन्होंने राजा को उत्तर दिया, “हाँ राजा, सच बात तो है।”
25 २५ तो म्हणाला, मला असे दिसते की, चार माणसे अग्नीत मोकळे फिरत आहेत, त्यांना काही एक दुखापत झालेली नाही, चौथ्याचे तेज हे जणू देवपुत्रासारखे आहे.
२५फिर उसने कहा, “अब मैं देखता हूँ कि चार पुरुष आग के बीच खुले हुए टहल रहे हैं, और उनको कुछ भी हानि नहीं पहुँची; और चौथे पुरुष का स्वरूप परमेश्वर के पुत्र के सदृश्य है।”
26 २६ तेव्हा नबुखद्नेस्सराने धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली “शद्रख, मेशख, अबेदनगो, सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या.” येथे या, नंतर शद्रख, मेशख, अबेदनगो अग्नीतून बाहेर आले.
२६फिर नबूकदनेस्सर उस धधकते हुए भट्ठे के द्वार के पास जाकर कहने लगा, “हे शद्रक, मेशक और अबेदनगो, हे परमप्रधान परमेश्वर के दासों, निकलकर यहाँ आओ!” यह सुनकर शद्रक, मेशक और अबेदनगो आग के बीच से निकल आए।
27 २७ तेथे जमलेले प्रांताधिकारी, प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार ह्यांनी त्यास पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या त्याचा एकही केस होरपळला नाही. त्यांना अग्नीचा वासही लागला नाही.
२७जब अधिपति, हाकिम, राज्यपाल और राजा के मंत्रियों ने, जो इकट्ठे हुए थे, उन पुरुषों की ओर देखा, तब उनकी देह में आग का कुछ भी प्रभाव नहीं पाया; और उनके सिर का एक बाल भी न झुलसा, न उनके मोजे कुछ बिगड़े, न उनमें जलने की कुछ गन्ध पाई गई।
28 २८ नबुखद्नेस्सर म्हणाला या आपण शद्रख, मेशख, अबेदनगो यांच्या देवाचे स्तवन करूया, कारण त्याने आपला दिव्यदूत पाठवला आणि ज्या आपल्या सेवकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला, आणि राजाची आज्ञा पालटवली, आणि आपल्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा दुसऱ्या कोणाला नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली त्यांना त्याने सोडवले आहे.
२८नबूकदनेस्सर कहने लगा, “धन्य है शद्रक, मेशक और अबेदनगो का परमेश्वर, जिसने अपना दूत भेजकर अपने इन दासों को इसलिए बचाया, क्योंकि इन्होंने राजा की आज्ञा न मानकर, उसी पर भरोसा रखा, और यह सोचकर अपना शरीर भी अर्पण किया, कि हम अपने परमेश्वर को छोड़, किसी देवता की उपासना या दण्डवत् न करेंगे।
29 २९ त्यामुळे मी ठराव करतो की, कुणीही लोक, कुठल्याही देशाचे, कोणतीही भाषा बोलणारे जर शद्रख, मेशख, अबेदनगो, यांच्या देवाच्या विरोधात बोलतील तर त्यांचे तुकडे करण्यात येतील, आणि त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही.
२९इसलिए अब मैं यह आज्ञा देता हूँ कि देश-देश और जाति-जाति के लोगों, और भिन्न-भिन्न भाषा बोलनेवालों में से जो कोई शद्रक, मेशक और अबेदनगो के परमेश्वर की कुछ निन्दा करेगा, वह टुकड़े-टुकड़े किया जाएगा, और उसका घर घूरा बनाया जाएगा; क्योंकि ऐसा कोई और देवता नहीं जो इस रीति से बचा सके।”
30 ३० नंतर राजाने शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बाबेलच्या परगण्यात बढती दिली.
३०तब राजा ने बाबेल के प्रान्त में शद्रक, मेशक, अबेदनगो का पद और ऊँचा किया।