< दानीएल 11 >

1 दारयावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की, मिखाएलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे.
«وَأَنَا فِي ٱلسَّنَةِ ٱلْأُولَى لِدَارِيُّوسَ ٱلْمَادِيِّ وَقَفْتُ لِأُشَدِّدَهُ وَأُقَوِّيَهُ.١
2 आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो. पारसात तिन राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वांस ग्रीसच्या राज्याच्या विरोधास उठवील.
وَٱلْآنَ أُخْبِرُكَ بِٱلْحَقِّ. هُوَذَا ثَلَاثَةُ مُلُوكٍ أَيْضًا يَقُومُونَ فِي فَارِسَ، وَٱلرَّابِعُ يَسْتَغْنِي بِغِنًى أَوْفَرَ مِنْ جَمِيعِهِمْ، وَحَسَبَ قُوَّتِهِ بِغِنَاهُ يُهَيِّجُ ٱلْجَمِيعَ عَلَى مَمْلَكَةِ ٱلْيُونَانِ.٢
3 एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल.
وَيَقُومُ مَلِكٌ جَبَّارٌ وَيَتَسَلَّطُ تَسَلُّطًا عَظِيمًا وَيَفْعَلُ حَسَبَ إِرَادَتِهِ.٣
4 आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल, चार दिशांत त्यांचे विभाग होईल; पण ते त्याच्या संततीला प्राप्त होणार नाही, आणि राज्य उपटले जाईल व ते त्यांच्याखेरीज इतरांस प्राप्त होईल.
وَكَقِيَامِهِ تَنْكَسِرُ مَمْلَكَتُهُ وَتَنْقَسِمُ إِلَى رِيَاحِ ٱلسَّمَاءِ ٱلْأَرْبَعِ، وَلَا لِعَقِبِهِ وَلَا حَسَبَ سُلْطَانِهِ ٱلَّذِي تَسَلَّطَ بِهِ، لِأَنَّ مَمْلَكَتَهُ تَنْقَرِضُ وَتَكُونُ لِآخَرِينَ غَيْرِ أُولَئِكَ.٤
5 दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करील.
وَيَتَقَوَّى مَلِكُ ٱلْجَنُوبِ. وَمِنْ رُؤَسَائِهِ مَنْ يَقْوَى عَلَيْهِ وَيَتَسَلَّطُ. تَسَلُّطٌ عَظِيمٌ تَسَلُّطُهُ.٥
6 काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून देण्यात येईल ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल.
وَبَعْدَ سِنِينَ يَتَعَاهَدَانِ، وَبِنْتُ مَلِكِ ٱلْجَنُوبِ تَأْتِي إِلَى مَلِكِ ٱلشِّمَالِ لِإِجْرَاءِ ٱلِٱتِّفَاقِ، وَلَكِنْ لَا تَضْبِطُ ٱلذِّرَاعُ قُوَّةً، وَلَا يَقُومُ هُوَ وَلَا ذِرَاعُهُ. وَتُسَلَّمُ هِيَ وَٱلَّذِينَ أَتَوْا بِهَا وَٱلَّذِي وَلَدَهَا وَمَنْ قَوَّاهَا فِي تِلْكَ ٱلْأَوْقَاتِ.٦
7 तरी तिच्या कुळातून एक अंकूर उगवेल तो तिची जागा घेईल तो सैन्यासह उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करून त्याच्याशी युध्द करील आणि त्यामध्ये तो विजयी होईल.
وَيَقُومُ مِنْ فَرْعِ أُصُولِهَا قَائِمٌ مَكَانَهُ، وَيَأْتِي إِلَى ٱلْجَيْشِ وَيَدْخُلُ حِصْنَ مَلِكِ ٱلشِّمَالِ وَيَعْمَلُ بِهِمْ وَيَقْوَى.٧
8 तो त्यांची दैवते ओतीव मुर्त्या आणि मौल्यवान सोने व चांदीची पात्रे मिसर देशात घेऊन जाईल आणि काही वर्षासाठी उत्तरेच्या राजावर हल्ला करणार नाही.
وَيَسْبِي إِلَى مِصْرَ آلِهَتَهُمْ أَيْضًا مَعَ مَسْبُوكَاتِهِمْ وَآنِيَتِهِمِ ٱلثَّمِينَةِ مِنْ فِضَّةٍ وَذَهَبٍ، وَيَقْتَصِرُ سِنِينَ عَنْ مَلِكِ ٱلشِّمَالِ.٨
9 उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर चढाई करून जाईल पण त्यास स्वदेशी परत जावे लागेल.
فَيَدْخُلُ مَلِكُ ٱلْجَنُوبِ إِلَى مَمْلَكَتِهِ وَيَرْجِعُ إِلَى أَرْضِهِ.٩
10 १० त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील ते पुराप्रमाणे येत राहतील ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील.
«وَبَنُوهُ يَتَهَيَّجُونَ فَيَجْمَعُونَ جُمْهُورَ جُيُوشٍ عَظِيمَةٍ، وَيَأْتِي آتٍ وَيَغْمُرُ وَيَطْمُو وَيَرْجِعُ وَيُحَارِبُ حَتَّى إِلَى حِصْنِهِ.١٠
11 ११ दक्षिणेचा राजा रागात येऊन उत्तरेच्या राजाबरोबर लढाई करील उत्तरेचा राजा मोठे सैन्य उभारील पण ते सैन्य दक्षिणेच्या राजास देण्यात येईल.
وَيَغْتَاظُ مَلِكُ ٱلْجَنُوبِ وَيَخْرُجُ وَيُحَارِبُهُ أَيْ مَلِكَ ٱلشِّمَالِ، وَيُقِيمُ جُمْهُورًا عَظِيمًا فَيُسَلَّمُ ٱلْجُمْهُورُ فِي يَدِهِ.١١
12 १२ जेव्हा सैन्य पुढे चालत राहील, तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरुन जाईल तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही.
فَإِذَا رُفِعَ ٱلْجُمْهُورُ يَرِتْفِعُ قَلْبُهُ وَيَطْرَحُ رَبَوَاتٍ وَلَا يَعْتَزُّ.١٢
13 १३ उत्तरेचा राजा पुन्हा येईल तेव्हा आधीपेक्षा मोठे उकृष्ट सैन्य व धन घेऊन येईल सैन्य आणि उपकरणे घेऊन येईल.
فَيَرْجِعُ مَلِكُ ٱلشِّمَالِ وَيُقِيمُ جُمْهُورًا أَكْثَرَ مِنَ ٱلْأَوَّلِ، وَيَأْتِي بَعْدَ حِينٍ، بَعْدَ سِنِينَ بِجَيْشٍ عَظِيمٍ وَثَرْوَةٍ جَزِيلَةٍ.١٣
14 १४ त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राजाच्या विरोधास उठतील, तुझ्या लोकातून आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.
وَفِي تِلْكَ ٱلْأَوْقَاتِ يَقُومُ كَثِيرُونَ عَلَى مَلِكِ ٱلْجَنُوبِ، وَبَنُو ٱلْعُتَاةِ مِنْ شَعْبِكَ يَقُومُونَ لِإِثْبَاتِ ٱلرُّؤْيَا وَيَعْثُرُونَ.١٤
15 १५ अशाप्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्चे लावून नगर काबीज करील. दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही, त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तीहीन होतील.
فَيَأْتِي مَلِكُ ٱلشِّمَالِ وَيُقِيمُ مِتْرَسَةً وَيَأْخُذُ ٱلْمَدِينَةَ ٱلْحَصِينَةَ، فَلَا تَقُومُ أَمَامَهُ ذِرَاعَا ٱلْجَنُوبِ وَلَا قَوْمُهُ ٱلْمُنْتَخَبُ، وَلَا تَكُونُ لَهُ قُوَّةٌ لِلْمُقَاوَمَةِ.١٥
16 १६ पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्यास कोणी थांबवू शकणार नाही, त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील.
وَٱلْآتِي عَلَيْهِ يَفْعَلُ كَإِرَادَتِهِ وَلَيْسَ مَنْ يَقِفُ أَمَامَهُ، وَيَقُومُ فِي ٱلْأَرْضِ ٱلْبَهِيَّةِ وَهِيَ بِٱلتَّمَامِ بِيَدِهِ.١٦
17 १७ उत्तरेचा राजा आपल्या राज्यातील सर्व ताकदीने येईल. आणि तो उत्तरेच्या राजाशी करार करील तो दक्षिणेच्या राजाला आपली कन्या भष्ट करण्यास देईल म्हणजे त्यास दक्षिणेचे राज्य नष्ट करता येईल पण त्याची योजना यशस्वी होणार नाही.
وَيَجْعَلُ وَجْهَهُ لِيَدْخُلَ بِسُلْطَانِ كُلِّ مَمْلَكَتِهِ، وَيَجْعَلُ مَعَهُ صُلْحًا، وَيُعْطِيهِ بِنْتَ ٱلنِّسَاءِ لِيُفْسِدَهَا، فَلَا تَثْبُتَ وَلَا تَكُونَ لَهُ.١٧
18 १८ ह्यानंतर उत्तरेचा राजा आपले लक्ष द्विपाकडे लावून त्यापैकी बरेच काबीज करील; पण एक सरदार त्याने केलेली अप्रतिष्ठा नाहीशी करील; आणखी तो आपली अप्रतिष्टा त्याच्यावर फिरवील.
وَيُحَوِّلُ وَجْهَهُ إِلَى ٱلْجَزَائِرِ وَيَأْخُذُ كَثِيرًا مِنْهَا، وَيُزِيلُ رَئِيسٌ تَعْيِيرَهُ فَضْلًا عَنْ رَدِّ تَعْيِيرِهِ عَلَيْهِ.١٨
19 १९ मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा लावील पण तो ठोकर खाऊन पडेल व तो सापडणार नाही.
وَيُحَوِّلُ وَجْهَهُ إِلَى حُصُونِ أَرْضِهِ وَيَعْثُرُ وَيَسْقُطُ وَلَا يُوجَدُ.١٩
20 २० नंतर त्याच्या जागी एक उदयास येईल जो त्या वैभवी राज्यात कर देण्याचा आग्रह करील पण काही दिवसात त्याचा नाश होईल पण तो रागात किंवा युध्दात होणार नाही.
«فَيَقُومُ مَكَانَهُ مَنْ يُعَبِّرُ جَابِيَ ٱلْجِزْيَةِ فِي فَخْرِ ٱلْمَمْلَكَةِ، وَفِي أَيَّامٍ قَلِيلَةٍ يَنْكَسِرُ لَا بِغَضَبٍ وَلَا بِحَرْبٍ.٢٠
21 २१ मग त्याच्या जागी नकारलेला आणि वैभव न मिळालेला असा एक उदयास येईल तो शांतपणे येऊन खुशामतीने राज्य प्राप्त करील.
فَيَقُومُ مَكَانَهُ مُحْتَقَرٌ لَمْ يَجْعَلُوا عَلَيْهِ فَخْرَ ٱلْمَمْلَكَةِ، وَيَأْتِي بَغْتَةً وَيُمْسِكُ ٱلْمَمْلَكَةَ بِٱلتَّمَلُّقَاتِ.٢١
22 २२ आणि उचंबळणारी बळे त्याच्या समोरून ओसरून जातील, व मोडून खातील, आणि कराराचा अधिपतीही मोडून जाईल.
وَأَذْرُعُ ٱلْجَارِفِ تُجْرَفُ مِنْ قُدَّامِهِ وَتَنْكَسِرُ، وَكَذَلِكَ رَئِيسُ ٱلْعَهْدِ.٢٢
23 २३ त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोड्याशा लोकांच्या मदतीने तो बलवान होईल.
وَمِنَ ٱلْمُعَاهَدَةِ مَعَهُ يَعْمَلُ بِٱلْمَكْرِ وَيَصْعَدُ وَيَعْظُمُ بِقَوْمٍ قَلِيلٍ.٢٣
24 २४ सूचना न देता तो प्रांतातील धनवान भागात येईल आणि तो ते करील जे त्याच्या वडिलाने किंवा त्यांच्या वडीलांच्या वडीलाने केले नाही ते तो करील; आपल्या सहकाऱ्यास लूट आणि धन वाटून देईल काही काळ तो किल्ले घेण्याचे कारस्थान करील.
يَدْخُلُ بَغْتَةً عَلَى أَسْمَنِ ٱلْبِلَادِ وَيَفْعَلُ مَا لَمْ يَفْعَلْهُ آبَاؤُهُ وَلَا آبَاءُ آبَائِهِ. يَبْذُرُ بَيْنَهُمْ نَهْبًا وَغَنِيمَةً وَغِنًى، وَيُفَكِّرُ أَفْكَارَهُ عَلَى ٱلْحُصُونِ، وَذَلِكَ إِلَى حِينٍ.٢٤
25 २५ दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल दक्षिणेचा राजा मोठा फौजफाटा घेऊन युध्द करेल पण कटकारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही.
وَيُنْهِضُ قُوَّتَهُ وَقَلْبَهُ عَلَى مَلِكِ ٱلْجَنُوبِ بِجَيْشٍ عَظِيمٍ، وَمَلِكُ ٱلْجَنُوبِ يَتَهَيَّجُ إِلَى ٱلْحَرْبِ بِجَيْشٍ عَظِيمٍ وَقَوِيٍّ جِدًّا، وَلَكِنَّهُ لَا يَثْبُتُ لِأَنَّهُمْ يُدَبِّرُونَ عَلَيْهِ تَدَابِيرَ.٢٥
26 २६ जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करु पाहतील. त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकी अनेक मरतील.
وَٱلْآكِلُونَ أَطَايِبَهُ يَكْسِرُونَهُ، وَجَيْشُهُ يَطْمُو، وَيَسْقُطُ كَثِيرُونَ قَتْلَى.٢٦
27 २७ हे दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात वाईट योजतील एकाच मेजावर बसून एकमेकांशी लबाड बोलतील पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार.
وَهَذَانِ ٱلْمَلِكَانِ قَلْبُهُمَا لِفِعْلِ ٱلشَّرِّ، وَيَتَكَلَّمَانِ بِٱلْكَذِبِ عَلَى مَائِدَةٍ وَاحِدَةٍ وَلَا يَنْجَحُ، لِأَنَّ ٱلِٱنْتِهَاءَ بَعْدُ إِلَى مِيعَادٍ.٢٧
28 २८ उत्तरेचा राजा मोठी संपत्ती आपल्या देशात घेऊन जाईल पण त्याचे मन पवित्र कराराच्या विरोधात राहील त्याच्या मनात येईल तसे तो वागेल आणि तो आपल्या भूमीत परत येईल.
فَيَرْجِعُ إِلَى أَرْضِهِ بِغِنًى جَزِيلٍ وَقَلْبُهُ عَلَى ٱلْعَهْدِ ٱلْمُقَدَّسِ، فَيَعْمَلُ وَيَرْجِعُ إِلَى أَرْضِهِ.٢٨
29 २९ नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील पण हयावेळी त्याचे काहीच चालणार नाही.
«وَفِي ٱلْمِيعَادِ يَعُودُ وَيَدْخُلُ ٱلْجَنُوبَ، وَلَكِنْ لَا يَكُونُ ٱلْآخِرُ كَٱلْأَوَّلِ.٢٩
30 ३० कारण कित्तीमाची जहाजे त्याच्या विरोधात येतील आणि तो निराश होऊन मागे फिरेल तो पवित्र करारावर खिन्न होऊन ज्यांनी हा करार सोडला त्यांच्यावर लक्ष लावील.
فَتَأْتِي عَلَيْهِ سُفُنٌ مِنْ كِتِّيمَ فَيَيْئَسُ وَيَرْجِعُ وَيَغْتَاظُ عَلَى ٱلْعَهْدِ ٱلْمُقَدَّسِ، وَيَعْمَلُ وَيَرْجِعُ وَيَصْغَى إِلَى ٱلَّذِينَ تَرَكُوا ٱلْعَهْدَ ٱلْمُقَدَّسَ.٣٠
31 ३१ त्याचे सैन्य उठून वेदी आणि गड भ्रष्ट करतील रोजची बलिहवने ते बंद करतील आणि नाशदायी अमंगळाची ते स्थापना करतील.
وَتَقُومُ مِنْهُ أَذْرُعٌ وَتُنَجِّسُ ٱلْمَقْدِسَ ٱلْحَصِينَ، وَتَنْزِعُ ٱلْمُحْرَقَةَ ٱلدَّائِمَةَ، وَتَجْعَلُ ٱلرِّجْسَ ٱلْمُخَرِّبَ.٣١
32 ३२ जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील.
وَٱلْمُتَعَدُّونَ عَلَى ٱلْعَهْدِ يُغْوِيهِمْ بِٱلتَّمَلُّقَاتِ. أَمَّا ٱلشَّعْبُ ٱلَّذِينَ يَعْرِفُونَ إِلَهَهُمْ فَيَقْوَوْنَ وَيَعْمَلُونَ.٣٢
33 ३३ लोकांमधील चतूर इतरांना समज देतील पण ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास, व लूटालूट यांनी संकटात पडतील.
وَٱلْفَاهِمُونَ مِنَ ٱلشَّعْبِ يُعَلِّمُونَ كَثِيرِينَ. وَيَعْثُرُونَ بِٱلسَّيْفِ وَبِاللَّهِيبِ وَبِالسَّبْيِ وَبِالنَّهْبِ أَيَّامًا.٣٣
34 ३४ ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील.
فَإِذَا عَثَرُوا يُعَانُونَ عَوْنًا قَلِيلًا، وَيَتَّصِلُ بِهِمْ كَثِيرُونَ بِٱلتَّمَلُّقَاتِ.٣٤
35 ३५ सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.
وَبَعْضُ ٱلْفَاهِمِينَ يَعْثُرُونَ ٱمْتِحَانًا لَهُمْ لِلتَّطْهِيرِ وَلِلتَّبْيِيضِ إِلَى وَقْتِ ٱلنِّهَايَةِ. لِأَنَّهُ بَعْدُ إِلَى ٱلْمِيعَادِ.٣٥
36 ३६ राजा मनात येईल तसे तो करील; तो आपणास इतर सर्व देवासमोर उंच आणि महान करील आणि देवा विरोधात तो धक्कादायक गोष्टी बोलेल, कोपाची पूर्णता होईपर्यंत तो बढती मिळवील जे ठरले आहे ते घडेलच.
«وَيَفْعَلُ ٱلْمَلِكُ كَإِرَادَتِهِ، وَيَرْتَفِعُ وَيَتَعَظَّمُ عَلَى كُلِّ إِلَهٍ، وَيَتَكَلَّمُ بِأُمُورٍ عَجِيبَةٍ عَلَى إِلَهِ ٱلْآلِهَةِ، وَيَنْجَحُ إِلَى إِتْمَامِ ٱلْغَضَبِ، لِأَنَّ ٱلْمَقْضِيَّ بِهِ يُجْرَى.٣٦
37 ३७ तो आपल्या पुर्वजाचे देव, स्त्रियांच्या प्रेमाचा किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही तो गर्वाने वागेल आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील.
وَلَا يُبَالِي بِآلِهَةِ آبَائِهِ وَلَا بِشَهْوَةِ ٱلنِّسَاءِ، وَبِكُلِّ إِلَهٍ لَا يُبَالِي لِأَنَّهُ يَتَعَظَّمُ عَلَى ٱلْكُلِّ.٣٧
38 ३८ आणि तो आपल्या ठिकाणी गडांच्या देवाला मान देईल, आणि जो देव त्याच्या पूर्वजांनी जाणला नाही त्यास तो सोन्याने व रुप्याने व मोलवान पाषाणांनी व मनोरम पदार्थांनी मान देईल.
وَيُكْرِمُ إِلَهَ ٱلْحُصُونِ فِي مَكَانِهِ، وَإِلَهًا لَمْ تَعْرِفْهُ آبَاؤُهُ، يُكْرِمُهُ بِٱلذَّهَبِ وَٱلْفِضَّةِ وَبِالْحِجَارَةِ ٱلْكَرِيمَةِ وَٱلنَّفَائِسِ.٣٨
39 ३९ तो परक्या देवाच्या मदतीने बलाढ्य दुर्गावर हल्ला करील. जे ह्याला जाणतात त्यांचा तो आदर करील त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किंमतीसाठी जमिनीचे तुकडे करील.
وَيَفْعَلُ فِي ٱلْحُصُونِ ٱلْحَصِينَةِ بِإِلَهٍ غَرِيبٍ. مَنْ يَعْرِفُهُ يَزِيدُهُ مَجْدًا، وَيُسَلِّطُهُمْ عَلَى كَثِيرِينَ، وَيَقْسِمُ ٱلْأَرْضَ أُجْرَةً.٣٩
40 ४० शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील.
«فَفِي وَقْتِ ٱلنِّهَايَةِ يُحَارِبُهُ مَلِكُ ٱلْجَنُوبِ، فَيَثُورُ عَلَيْهِ مَلِكُ ٱلشِّمَالِ بِمَرْكَبَاتٍ وَبِفُرْسَانٍ وَبِسُفُنٍ كَثِيرَةٍ، وَيَدْخُلُ ٱلْأَرَاضِيَ وَيَجْرُفُ وَيَطْمُو.٤٠
41 ४१ तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील पण अनेकांचा त्याच्या हातून बचाव होईल अदोम, मवाब आणि अम्मोनाचे सरदार, हे त्याच्या हातून सुटतील.
وَيَدْخُلُ إِلَى ٱلْأَرْضِ ٱلْبَهِيَّةِ فَيُعْثَرُ كَثِيرُونَ، وَهَؤُلَاءِ يُفْلِتُونَ مِنْ يَدِهِ: أَدُومُ وَمُوآبُ وَرُؤَسَاءُ بَنِي عَمُّونَ.٤١
42 ४२ तो अनेक देशावर आपले बळ वाढवील, मिसर त्यातून सुटणार नाही.
وَيَمُدُّ يَدَهُ عَلَى ٱلْأَرَاضِي، وَأَرْضُ مِصْرَ لَا تَنْجُو.٤٢
43 ४३ त्यास मिसर देशातील सोने, आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्यास अधिकार मिळाले. लुबी आणि कुशी त्याची चाकरी करतील.
وَيَتَسَلَّطُ عَلَى كُنُوزِ ٱلذَّهَبِ وَٱلْفِضَّةِ وَعَلَى كُلِّ نَفَائِسِ مِصْرَ. وَٱللُّوبِيُّونَ وَٱلْكُوشِيُّونَ عِنْدَ خُطُوَاتِهِ.٤٣
44 ४४ पण पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणारी बातमी त्यास चिंताग्रस्त करील तेव्हा तो मोठया रागाने अनेकांचा नाश करण्यासाठी निघून जाईल.
وَتُفْزِعُهُ أَخْبَارٌ مِنَ ٱلشَّرْقِ وَمِنَ ٱلشِّمَالِ، فَيَخْرُجُ بِغَضَبٍ عَظِيمٍ لِيُخْرِبَ وَلِيُحَرِّمَ كَثِيرِينَ.٤٤
45 ४५ तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्यास मदत करणार नाही.
وَيَنْصُبُ فُسْطَاطَهُ بَيْنَ ٱلْبُحُورِ وَجَبَلِ بَهَاءِ ٱلْقُدْسِ، وَيَبْلُغُ نِهَايَتَهُ وَلَا مُعِينَ لَهُ.٤٥

< दानीएल 11 >