< दानीएल 10 >
1 १ पारसाचा राजा कोरेश हयाच्या तिसऱ्या वर्षी दानीएल (ज्याला बेल्टशस्सर हे नाव होते) यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता, म्हणजे तो एक मोठ्या युध्दाविषयी होता. दानीएलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला.
Pers Kralı Koreş'in krallığının üçüncü yılında Belteşassar diye çağrılan Daniel'e bir giz açıklandı. Büyük bir savaşla ilgili olan bu giz gerçekti. Daniel görümde kendisine açıklanan gizi anladı.
2 २ त्या दिवसात मी दानीएल, तीन आठवडे शोक करत होतो.
O sırada ben Daniel üç haftadır yas tutuyordum.
3 ३ ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पक्वान्न खाल्ले नाही मी द्राक्षरस प्यालो, नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही.
Üç hafta dolana dek ağzıma ne güzel bir yiyecek ya da et koydum, ne şarap içtim, ne de yağ süründüm.
4 ४ पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदीच्या काठावर होतो.
Birinci ayın yirmi dördüncü günü, Büyük Irmak'ın, yani Dicle'nin kıyısındayken,
5 ५ मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कंबरेत उफाज देशाच्या शुध्द सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला.
gözlerimi kaldırıp bakınca keten giysi giyinmiş, beline Ufaz altınından kemer kuşanmış bir adam gördüm.
6 ६ त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता, त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि पाय उजळ पितळेसारखे होते आणि त्याचा शब्दाचा आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता.
Bedeni sarı yakut gibiydi. Yüzü şimşek gibi parlıyordu. Gözleri alevli meşalelere benziyordu. Kollarıyla bacakları cilalı tunç gibi parlıyor, sesi büyük bir kalabalığın çıkardığı gürültüyü andırıyordu.
7 ७ मी दानीएल एकट्याने हा दृष्टांत पाहिला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भिती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले.
Görümü yalnız ben Daniel gördüm. Yanımdakiler görmediler, ama dehşete düşerek gizlenmek için kaçtılar.
8 ८ मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही.
Böylece ben yalnız kaldım. Bu büyük görümü seyrederken gücüm tükendi, benzim büsbütün soldu, kendimi toparlayamadım.
9 ९ मग मी त्याची वाणी एकेली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.
Sonra adamın sesini duyunca yüzüstü yere düşüp derin bir uykuya daldım.
10 १० एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडगे आणि तळहात थरथरु लागले.
Derken bir el dokundu, titredim; beni dizlerimle ellerimin üzerine kaldırdı.
11 ११ तो दूत मला म्हणाला, “दानीएला परमप्रिय पुरुषा मी जे सांगतो ते मन लावून समजून घे; आणि स्थिर रहा, तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे,” जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो.
Bana, “Ey Daniel, sen ki çok sevilen birisin!” dedi, “Ayağa kalk ve söyleyeceklerime iyi kulak ver. Çünkü sana gönderildim.” O bunları söyler söylemez titreyerek ayağa kalktım.
12 १२ तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानीएला, भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले, आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे.
“Korkma, ey Daniel!” diye devam etti, “Anlayışa erişmeye ve kendini Tanrın'ın önünde alçaltmaya karar verdiğin gün duan işitildi. İşte bu yüzden geldim.
13 १३ परंतु पारसाच्या राज्याच्या एका अधिपतीने एकवीस दिवस मला आवरिले; आणि पाहा, मीखाएल, मुख्य अधिपतींपैकी एक, माझे साहाय्य करायला आला; मग मी तेथे पारसाच्या राजांजवळ राहिलो.
Pers krallığının önderi yirmi bir gün bana karşı durdu. Sonra baş önderlerden Mikail bana yardıma geldi, çünkü orada, Pers krallarının yanında alıkonulmuştum.
14 १४ आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.
Son günlerde halkının başına neler geleceğini sana açıklamak için geldim şimdi, çünkü bu görüm gelecekle ilgilidir.”
15 १५ जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला; मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही.
O bunları söyleyince, suskun suskun yere baktım.
16 १६ तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.
Derken insanoğluna benzeyen biri dudaklarıma dokundu. Ben de ağzımı açıp konuşmaya başladım. Karşımda durana, “Ey efendim, bu görüm yüzünden acı çekiyorum, kendimi toparlayamıyorum” dedim,
17 १७ मी तुझा दास आहे मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू? कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही.”
“Ben kulun nasıl seninle konuşayım? Gücüm tükendi, soluğum kesildi.”
18 १८ तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले.
İnsana benzeyen varlık yine dokunup beni güçlendirdi.
19 १९ तो म्हणाला, “हे परमप्रिय मानवा घाबरू नकोस, तुला शांती असो हिंमत धर. आता, नेट धर!” तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, “माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे.”
“Ey çok sevilen adam, korkma!” dedi, “Esenlik olsun sana! Güçlü ol! Evet, güçlü ol!” O benimle konuşunca güçlendim. “Konuşmanı sürdür, efendim, çünkü bana güç verdin” dedim.
20 २० तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपतीबरोबर लढणार, मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल.
Bunun üzerine, “Sana neden geldiğimi biliyor musun?” dedi, “Çok yakında dönüp Pers önderiyle savaşacağım. Ben gidince Grek önderi gelecek.
21 २१ परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही.
Ama önce Gerçek Kitap'ta neler yazıldığını sana bildireceğim. Onlara karşı önderiniz Mikail dışında bana yardım eden kimse yok.