< कलो. 4 >

1 धन्यांनो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.
أَيُّهَا السَّادَةُ، عَامِلُوا عَبِيدَكُمْ بِالْعَدْلِ وَالإِنْصَافِ، عَالِمِينَ أَنَّ لَكُمْ، أَنْتُمْ أَيْضاً، سَيِّداً فِي السَّمَاءِ.١
2 प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा.
دَاوِمُوا عَلَى الصَّلاةِ، مُتَيَقِّظِينَ فِيهَا بِالشُّكْرِ،٢
3 आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.
مُصَلِّينَ مَعاً لأَجْلِنَا أَيْضاً، كَيْ يَفْتَحَ لَنَا اللهُ بَاباً لِنُبَلِّغَ الرِّسَالَةَ، فَنَتَكَلَّمَ بِسِرِّ الْمَسِيحِ الَّذِي مِنْ أَجْلِهِ أَنَا مُقَيَّدٌ أَيْضاً،٣
4 म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे.
حَتَّى أُعْلِنَهُ كَمَا يَجِبُ أَنْ أَتَكَلَّمَ بِهِ.٤
5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
تَصَرَّفُوا بِحِكْمَةٍ مَعَ الَّذِينَ هُمْ مِنْ خَارِجِ الْكَنِيسَةِ، مُسْتَغِلِّينَ الْوَقْتَ أَحْسَنَ اسْتِغْلالٍ.٥
6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
لِيَكُنْ كَلامُكُمْ دَائِماً مَصْحُوباً بِالنِّعْمَةِ، وَلْيَكُنْ مُصْلَحاً بِمِلْحٍ، فَتَعْرِفُوا كَيْفَ يَجِبُ أَنْ تُجِيبُوا كُلَّ وَاحِدٍ.٦
7 माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील.
أَمَّا أَحْوَالِي كُلُّهَا، فَسَيُخْبِرُكُمْ بِها تِيخِيكُسُ، الأَخُ الْحَبِيبُ وَالْخَادِمُ الأَمِينُ وَرَفِيقُنَا الْعَبْدُ فِي الرَّبِّ،٧
8 मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे.
فَإِيَّاهُ قَدْ أَرْسَلْتُ إِلَيْكُمْ لِهَذَا الْغَرَضِ عَيْنِهِ، لِتَعْرِفُوا أَحْوَالَنَا وَيُشَجِّعَ قُلُوبَكُمْ،٨
9 मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील.
يُرَافِقُهُ أُونِسِيمُوسُ، الأَخُ الأَمِينُ الْحَبِيبُ الَّذِي هُوَ مِنْ عِنْدِكُمْ. فَهُمَا يُطْلِعَانِكُمْ عَلَى أَحْوَالِنَا هُنَا.٩
10 १० माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.)
يُسَلِّمُ عَلَيْكُمْ أَرِسْتَرْخُسُ رَفِيقِي فِي السِّجْنِ؛ وَمَرْقُسُ ابْنُ أُخْتِ بَرْنَابَا، وَفِي شَأْنِهِ تَلَقَّيْتُمْ بَعْضَ التَّوْصِيَاتِ: فَإِنْ جَاءَ إِلَيْكُمْ، فَرَحِّبُوا بِهِ؛١٠
11 ११ युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.
وَيَسُوعُ الْمَعْرُوفُ بِاسْمِ يُسْطُسَ. هؤُلاءِ جَمِيعاً مِنْ أَهْلِ الْخِتَانِ، وَهُمْ وَحْدُهُمْ مُعَاوِنِيَّ لأَجْلِ مَلَكُوتِ اللهِ، وَقَدْ كَانُوا لِي عَزَاءً.١١
12 १२ ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे रहावे.
يُسَلِّمُ عَلَيْكُمْ أَبَفْرَاسُ الَّذِي هُوَ مِنْكُمْ، وَهُوَ عَبْدٌ لِلْمَسِيحِ يَسُوعَ، يُجَاهِدُ كُلَّ حِينٍ لأَجْلِكُمْ فِي الصَّلَوَاتِ لِتَثْبُتُوا كَامِلِينَ وَلَكُمْ تَمَامُ الْيَقِينِ مِنْ جِهَةِ مَشِيئَةِ اللهِ كُلِّهَا.١٢
13 १३ तुम्हासाठी व जे लावदीकियात व हेरापलीत आहेत त्याच्यांसाठी तो फार श्रम करीत आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो.
فَإِنِّي أَشْهَدُ لَهُ بِأَنَّهُ يَجْتَهِدُ كَثِيراً لأَجْلِكُمْ وَلأَجْلِ الَّذِينَ فِي مَدِينَةِ لاوُدِكِيَّةَ وَالَّذِينَ فِي مَدِينَةِ هِيرَابُولِيسَ.١٣
14 १४ प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात.
يُسَلِّمُ عَلَيْكُمْ لُوقَا الطَّبِيبُ الْحَبِيبُ؛ وَدِيمَاسُ.١٤
15 १५ लावदीकियातील बंधू आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम द्या.
سَلِّمُوا عَلَى الإِخْوَةِ الَّذِينَ فِي لاوُدِكِيَّةَ، وَعَلَى نِمْفَاسَ، وَعَلَى الْكَنِيسَةِ الَّتِي تَجْتَمِعُ فِي بَيْتِهِ.١٥
16 १६ हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे.
وَبَعْدَ أَنْ تُقْرَأَ هذِهِ الرِّسَالَةُ عَلَيْكُمْ، ابْعَثُوا بِها لِتُقْرَأَ عَلَى كَنِيسَةِ مُؤْمِنِي لاوُدِكِيَّةَ، وَخُذُوا الرِّسَالَةَ الَّتِي عِنْدَهُمْ لِتَقْرَأُوهَا أَنْتُمْ أَيْضاً.١٦
17 १७ अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.
وَقُولُوا لأَرْخِبُّسَ: «تَنَبَّهْ لِلْخِدْمَةِ الَّتِي تَلَقَّيْتَهَا فِي الرَّبِّ، وَقُمْ بِها كَامِلَةً!»١٧
18 १८ मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.
هَذَا السَّلامُ بِخَطِّ يَدِي، أَنَا بُولُسَ. تَذَكَّرُوا قُيُودِي. لِتَكُنِ النِّعْمَةُ مَعَكُمْ.١٨

< कलो. 4 >