< कलो. 1 >

1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून;
Paulus, Kristi Jesu Apostel ved Guds Villie, og Broderen Timotheus
2 कलस्सै शहरातील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांस देव आपला पिता ह्याजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
til de hellige og troende Brødre i Kristus i Kolossæ: Naade være med eder og Fred fra Gud vor Fader!
3 आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नित्य देवाचे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो
Vi takke Gud og vor Herres Jesu Kristi Fader altid, naar vi bede for eder,
4 कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे.
da vi have hørt om eders Tro paa Kristus Jesus og den Kærlighed, som I have til alle de hellige
5 जी आशा तुमच्यासाठी स्वर्गात ठेवली आहे या आशेविषयी, तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले.
paa Grund af det Haab, som er henlagt til eder i Himlene, om hvilket I forud have hørt i Evangeliets Sandheds Ord,
6 ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत आणि तुम्हास सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्‍या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.
der er kommet til eder, ligesom det ogsaa er i den hele Verden, idet det bærer Frugt og vokser, ligesom det ogsaa gør iblandt eder fra den Dag, I hørte og erkendte Guds Naade i Sandhed,
7 आणि या कृपेविषयीही तुम्ही एपफ्रासकडून शिकलात; तो आमचा प्रिय जोडीदार-कामकरी आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे.
saaledes som I have lært af Epafras, vor elskede Medtjener, som er en tro Kristi Tjener for eder,
8 त्यानेच आत्म्याकडून असलेली तुमची प्रीती त्यानेच आम्हास कळवली.
han, som ogsaa gav os eders Kærlighed i Aanden til Kende.
9 म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडून देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की, तुम्हास सर्व आत्मिक ज्ञान व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
Derfor have ogsaa vi fra den Dag, vi hørte det, ikke ophørt at bede for eder og begære, at I maatte fyldes med Erkendelsen af hans Villie i al Visdom og aandelig Indsigt
10 १० ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास, प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्यास शोभेल असे जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
til at vandre Herren værdigt, til alt Velbehag, idet I bære Frugt og vokse i al god Gerning ved Erkendelsen af Gud,
11 ११ आणि तुम्हास सर्व धीर व आनंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गौरवाच्या बळाप्रमाणे तुम्हास संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे;
idet I styrkes med al Styrke efter hans Herligheds Kraft til al Udholdenhed og Taalmodighed med Glæde
12 १२ आणि प्रकाशातील पवित्रजनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.
og takke Faderen, som gjorde os dygtige til at have Del i de helliges Arvelod i Lyset,
13 १३ त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,
han, som friede os ud af Mørkets Magt og satte os over i sin elskede Søns Rige,
14 १४ आणि त्याच्याठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे.
i hvem vi have Forløsningen, Syndernes Forladelse,
15 १५ ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.
han, som er den usynlige Guds Billede, al Skabnings førstefødte;
16 १६ कारण स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
thi i ham bleve alle Ting skabte i Himlene og paa Jorden, de synlige og de usynlige, være sig Troner eller Herredømmer eller Magter eller Myndigheder. Alle Ting ere skabte ved ham og til ham;
17 १७ तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.
og han er forud for alle Ting, og alle Ting bestaa ved ham.
18 १८ तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्यास सर्व गोष्टींत प्राधान्य असावे.
Og han er Legemets Hoved, nemlig Menighedens, han, som er Begyndelsen, førstefødt ud af de døde, for at han skulde blive den ypperste i alle Ting;
19 १९ हे यासाठी की, त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता.
thi det behagede Gud, at i ham skulde hele Fylden bo,
20 २० आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टींचा, त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले.
og ved ham at forlige alle Ting med sig, være sig dem paa Jorden eller dem i Himlene, idet han stiftede Fred ved hans Kors's Blod.
21 २१ आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,
Ogsaa eder, som fordum vare fremmedgjorte og fjendske af Sindelag i eders onde Gerninger,
22 २२ त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे.
har han dog nu forligt i sit Køds Legeme ved Døden for at fremstille eder hellige og ulastelige og ustraffelige for sit Aasyn,
23 २३ कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
saa sandt I blive i Troen, grundfæstede og faste, uden at lade eder rokke fra Haabet i det Evangelium, som I have hørt, hvilket er blevet prædiket i al Skabningen under Himmelen, og hvis Tjener jeg Paulus er bleven.
24 २४ तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
Nu glæder jeg mig over mine Lidelser for eder, og hvad der fattes i Kristi Trængsler, udfylder jeg i mit Kød for hans Legeme, som er Menigheden,
25 २५ आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यामध्ये मी मंडळीचा सेवक झालो आहे.
hvis Tjener jeg er bleven efter den Guds Husholdning, som blev given mig over for eder, nemlig fuldelig at forkynde Guds Ord,
26 २६ जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता, त्याच्या पवित्रजनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे. (aiōn g165)
den Hemmelighed, der var skjult igennem alle Tider og Slægter, men nu er bleven aabenbaret for hans hellige, (aiōn g165)
27 २७ त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्रजनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
hvem Gud vilde tilkendegive, hvilken Rigdom paa Herlighed iblandt Hedningerne der ligger i denne Hemmelighed, som er Kristus i eder, Herlighedens Haab,
28 २८ आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्यास बोध करतो आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्यास आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की, आम्ही प्रत्येक मनुष्यास ख्रिस्ताच्या ठायी प्रौढ करून सादर करावे.
hvem vi forkynde, idet vi paaminde hvert Menneske og lære hvert Menneske med al Visdom, for at vi kunne fremstille hvert Menneske som fuldkomment i Kristus;
29 २९ याकरिता त्याची जी शक्ती माझ्याठायी सामर्थ्याने त्याचे कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.
hvorpaa jeg ogsaa arbejder, idet jeg kæmper ifølge hans Kraft, som virker mægtigt i mig.

< कलो. 1 >