< आमोस 9 >
1 १ मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्यास तलवारीने ठार मारीन. त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही, आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही.
मैंने ख़ुदावन्द को मज़बह के पास खड़े देखा, और उसने फ़रमाया: “सुतूनों के सिर पर मार, ताकि आस्ताने हिल जाएँ; और उन सबके सिरों पर उनको पारा — पारा कर दे, और उनके बक़िये को मैं तलवार से क़त्ल करूँगा; उनमें से एक भी भाग न सकेगा, उनमें से एक भी बच न निकलेगा।
2 २ ते खणून मृतलोकांत जरी गेले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच चढून गेले, तरी मी त्यांना तेथून खाली आणीन. (Sheol )
अगर वह पाताल में घुस जाएँ, तो मेरा हाथ वहाँ से उनको खींच निकालेगा; और अगर आसमान पर चढ़ जाएँ, तो मैं वहाँ से उनको उतार लाऊँगा (Sheol )
3 ३ ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन व तो त्यांना चावेल.
अगर वह कोह — ए — कर्मिल की चोटी पर जा छिपें, तो मैं उनको वहाँ से ढूंड निकालूँगा; और अगर समन्दर की तह में मेरी नज़र से ग़ायब हो जाए तो मैं वहाँ साँप को हुक्म करूँगा और वह उनको काटेगा।
4 ४ ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले, तर तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील. मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे, तर त्यांना त्रास कसा होईल या करीता लावीन.”
और अगर दुश्मन उनको ग़ुलाम करके ले जाएँ, तो वहाँ तलवार को हुक्म करूँगा, और वह उनको क़त्ल करेगी; और मैं उनकी भलाई के लिए नहीं, बल्कि बुराई के लिए उन पर निगाह रखूँगा।”
5 ५ आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात, तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे, आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.
क्यूँकि ख़ुदावन्द रब्ब — उल — अफ़वाज वह है कि अगर ज़मीन को छू दे तो वह गुदाज़ हो जाए, और उसकी सब मा'मूरी मातम करे; वह बिल्कुल दरिया-ए-नील की तरह उठे और रोद — ए — मिस्र की तरह फिर सुकड़ जाए।
6 ६ ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या, आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे.
वही आसमान पर अपने बालाख़ाने ता'मीर करता है, उसी ने ज़मीन पर अपने गुम्बद की बुनियाद रख्खी है; वह समन्दर के पानी को बुलाकर इस ज़मीन पर फैला देता है; उसी का नाम ख़ुदावन्द है।
7 ७ परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलाचे लोकहो, तुम्ही मला कूशी लोकांप्रमाणे नाही काय? मी इस्राएलाला मिसर देशातून पलिष्ट्यांना कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले नाही काय?”
ख़ुदावन्द फ़रमाता है, ऐ बनी — इस्राईल, क्या तुम मेरे लिए अहल — ए — कूश की औलाद की तरह नहीं हो? क्या मैं इस्राईल को मुल्क — ए — मिस्र से, और फ़िलिस्तियों को कफ़तूर से, और अरामियों को क़ीर से नहीं निकाल लाया हूँ?
8 ८ पाहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे, आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन, पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
देखो, ख़ुदावन्द ख़ुदा की आँखें इस गुनाहगार मम्लुकत पर लगी हैं, ख़ुदावन्द फ़रमाता है, मैं उसे इस ज़मीन से हलाक — ओ — बर्बाद कर दूँगा, मगर या'क़ूब के घराने को बिल्कुल हलाक न करूँगा।
9 ९ “पाहा, मी आज्ञा करीन, धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन, व त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही.”
क्यूँकि देखो, मैं हुक्म करूँगा और बनी — इस्राईल को सब क़ौमों में जैसे छलनी से छानते हैं, छानूँगा और एक दाना भी ज़मीन पर गिरने न पाएगा।
10 १० माझ्या लोकांतील पापी जे असे म्हणतात, “आमचे काही वाईट होणार नाही किंवा ते आम्हास आडवेही येणार नाही. ते सर्व तलवारीने मारतील.”
मेरी उम्मत के सब गुनहगार लोग जो कहते हैं कि 'हम पर न पीछे से आफ़त आएगी न आगे से,' तलवार से मारे जाएँगे।
11 ११ त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे, मी तो पुन्हा उभारीन. मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे, ते मी पुन्हा बांधीन. मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन.
मैं उस रोज़ दाऊद के गिरे हुए घर को खड़ा करके, उसके रख़नों को बंद करूँगा; और उसके खंडर की मरम्मत करके, उसे पहले की तरह ता'मीर करूँगा;
12 १२ “ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना, आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे, त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.” परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो.
ताकि वह अदोम के बक़िये और उन सब क़ौमों पर जो मेरे नाम से कहलाती हैं क़ाबिज़ हो उसको वुक़ू' में लाने वाला ख़ुदावन्द फ़रमाता है।
13 १३ परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,” नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील. आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील.
देखो, वह दिन आते हैं, ख़ुदावन्द फ़रमाता है, जोतने वाला काटने वाले को, और अंगूर कुचलने वाला बोने वाले को जा लेगा; और पहाड़ों से नई मय टपकेगी, और सब टीले गुदाज़ होंगे।
14 १४ मी माझ्या लोकांस, इस्राएलाला, कैदेतून सोडवून परत आणीन, ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील.
और मैं बनी — इस्राईल, अपने लोगों को ग़ुलामी से वापस लाऊँगा; वह उजड़े शहरों को ता'मीर करके उनमें क़याम करेंगे और बाग़ लगाकर उनकी मय पिएँगे। वह बाग़ लगाएँगे और उनके फल खाएँगे।
15 १५ मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.
क्यूँकि मैं उनको उनके मुल्क में क़ायम करूँगा और वह फिर कभी अपने वतन से जो मैने उनको बख़्शा है, निकाले न जाएँगे, ख़ुदावन्द तेरा ख़ुदा फ़रमाता है।