< आमोस 9 >

1 मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्यास तलवारीने ठार मारीन. त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही, आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही.
רָאִ֨יתִי אֶת־אֲדֹנָ֜י נִצָּ֣ב עַֽל־הַמִּזְבֵּ֗חַ וַיֹּאמֶר֩ הַ֨ךְ הַכַּפְתּ֜וֹר וְיִרְעֲשׁ֣וּ הַסִּפִּ֗ים וּבְצַ֙עַם֙ בְּרֹ֣אשׁ כֻּלָּ֔ם וְאַחֲרִיתָ֖ם בַּחֶ֣רֶב אֶהֱרֹ֑ג לֹֽא־יָנ֤וּס לָהֶם֙ נָ֔ס וְלֹֽא־יִמָּלֵ֥ט לָהֶ֖ם פָּלִֽיט׃
2 ते खणून मृतलोकांत जरी गेले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच चढून गेले, तरी मी त्यांना तेथून खाली आणीन. (Sheol h7585)
אִם־יַחְתְּר֣וּ בִשְׁא֔וֹל מִשָּׁ֖ם יָדִ֣י תִקָּחֵ֑ם וְאִֽם־יַעֲלוּ֙ הַשָּׁמַ֔יִם מִשָּׁ֖ם אוֹרִידֵֽם׃ (Sheol h7585)
3 ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन व तो त्यांना चावेल.
וְאִם־יֵחָֽבְאוּ֙ בְּרֹ֣אשׁ הַכַּרְמֶ֔ל מִשָּׁ֥ם אֲחַפֵּ֖שׂ וּלְקַחְתִּ֑ים וְאִם־יִסָּ֨תְר֜וּ מִנֶּ֤גֶד עֵינַי֙ בְּקַרְקַ֣ע הַיָּ֔ם מִשָּׁ֛ם אֲצַוֶּ֥ה אֶת־הַנָּחָ֖שׁ וּנְשָׁכָֽם׃
4 ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले, तर तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील. मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे, तर त्यांना त्रास कसा होईल या करीता लावीन.”
וְאִם־יֵלְכ֤וּ בַשְּׁבִי֙ לִפְנֵ֣י אֹֽיבֵיהֶ֔ם מִשָּׁ֛ם אֲצַוֶּ֥ה אֶת־הַחֶ֖רֶב וַהֲרָגָ֑תַם וְשַׂמְתִּ֨י עֵינִ֧י עֲלֵיהֶ֛ם לְרָעָ֖ה וְלֹ֥א לְטוֹבָֽה׃
5 आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात, तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे, आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.
וַאדֹנָ֨י יְהוִ֜ה הַצְּבָא֗וֹת הַנּוֹגֵ֤עַ בָּאָ֙רֶץ֙ וַתָּמ֔וֹג וְאָבְל֖וּ כָּל־י֣וֹשְׁבֵי בָ֑הּ וְעָלְתָ֤ה כַיְאֹר֙ כֻּלָּ֔הּ וְשָׁקְעָ֖ה כִּיאֹ֥ר מִצְרָֽיִם
6 ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या, आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे.
הַבּוֹנֶ֤ה בַשָּׁמַ֙יִם֙ מעלותו וַאֲגֻדָּת֖וֹ עַל־אֶ֣רֶץ יְסָדָ֑הּ הַקֹּרֵ֣א לְמֵֽי־הַיָּ֗ם וַֽיִּשְׁפְּכֵ֛ם עַל־פְּנֵ֥י הָאָ֖רֶץ יְהוָ֥ה שְׁמֽוֹ׃
7 परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलाचे लोकहो, तुम्ही मला कूशी लोकांप्रमाणे नाही काय? मी इस्राएलाला मिसर देशातून पलिष्ट्यांना कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले नाही काय?”
הֲל֣וֹא כִבְנֵי֩ כֻשִׁיִּ֨ים אַתֶּ֥ם לִ֛י בְּנֵ֥י יִשְׂרָאֵ֖ל נְאֻם־יְהוָ֑ה הֲל֣וֹא אֶת־יִשְׂרָאֵ֗ל הֶעֱלֵ֙יתִי֙ מֵאֶ֣רֶץ מִצְרַ֔יִם וּפְלִשְׁתִּיִּ֥ים מִכַּפְתּ֖וֹר וַאֲרָ֥ם מִקִּֽיר׃
8 पाहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे, आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन, पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
הִנֵּ֞ה עֵינֵ֣י ׀ אֲדֹנָ֣י יְהוִ֗ה בַּמַּמְלָכָה֙ הַֽחַטָּאָ֔ה וְהִשְׁמַדְתִּ֣י אֹתָ֔הּ מֵעַ֖ל פְּנֵ֣י הָאֲדָמָ֑ה אֶ֗פֶס כִּ֠י לֹ֣א הַשְׁמֵ֥יד אַשְׁמִ֛יד אֶת־בֵּ֥ית יַעֲקֹ֖ב נְאֻם־יְהוָֽה׃
9 “पाहा, मी आज्ञा करीन, धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन, व त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही.”
כִּֽי־הִנֵּ֤ה אָֽנֹכִי֙ מְצַוֶּ֔ה וַהֲנִע֥וֹתִי בְכָֽל־הַגּוֹיִ֖ם אֶת־בֵּ֣ית יִשְׂרָאֵ֑ל כַּאֲשֶׁ֤ר יִנּ֙וֹעַ֙ בַּכְּבָרָ֔ה וְלֹֽא־יִפּ֥וֹל צְר֖וֹר אָֽרֶץ׃
10 १० माझ्या लोकांतील पापी जे असे म्हणतात, “आमचे काही वाईट होणार नाही किंवा ते आम्हास आडवेही येणार नाही. ते सर्व तलवारीने मारतील.”
בַּחֶ֣רֶב יָמ֔וּתוּ כֹּ֖ל חַטָּאֵ֣י עַמִּ֑י הָאֹמְרִ֗ים לֹֽא־תַגִּ֧ישׁ וְתַקְדִּ֛ים בַּעֲדֵ֖ינוּ הָרָעָֽה׃
11 ११ त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे, मी तो पुन्हा उभारीन. मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे, ते मी पुन्हा बांधीन. मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन.
בַּיּ֣וֹם הַה֔וּא אָקִ֛ים אֶת־סֻכַּ֥ת דָּוִ֖יד הַנֹּפֶ֑לֶת וְגָדַרְתִּ֣י אֶת־פִּרְצֵיהֶ֗ן וַהֲרִֽסֹתָיו֙ אָקִ֔ים וּבְנִיתִ֖יהָ כִּימֵ֥י עוֹלָֽם׃
12 १२ “ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना, आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे, त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.” परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो.
לְמַ֨עַן יִֽירְשׁ֜וּ אֶת־שְׁאֵרִ֤ית אֱדוֹם֙ וְכָל־הַגּוֹיִ֔ם אֲשֶׁר־נִקְרָ֥א שְׁמִ֖י עֲלֵיהֶ֑ם נְאֻם־יְהוָ֖ה עֹ֥שֶׂה זֹּֽאת׃ פ
13 १३ परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,” नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील. आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील.
הִנֵּ֨ה יָמִ֤ים בָּאִים֙ נְאֻם־יְהוָ֔ה וְנִגַּ֤שׁ חוֹרֵשׁ֙ בַּקֹּצֵ֔ר וְדֹרֵ֥ךְ עֲנָבִ֖ים בְּמֹשֵׁ֣ךְ הַזָּ֑רַע וְהִטִּ֤יפוּ הֶֽהָרִים֙ עָסִ֔יס וְכָל־הַגְּבָע֖וֹת תִּתְמוֹגַֽגְנָה׃
14 १४ मी माझ्या लोकांस, इस्राएलाला, कैदेतून सोडवून परत आणीन, ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील.
וְשַׁבְתִּי֮ אֶת־שְׁב֣וּת עַמִּ֣י יִשְׂרָאֵל֒ וּבָנ֞וּ עָרִ֤ים נְשַׁמּוֹת֙ וְיָשָׁ֔בוּ וְנָטְע֣וּ כְרָמִ֔ים וְשָׁת֖וּ אֶת־יֵינָ֑ם וְעָשׂ֣וּ גַנּ֔וֹת וְאָכְל֖וּ אֶת־פְּרִיהֶֽם׃
15 १५ मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.
וּנְטַעְתִּ֖ים עַל־אַדְמָתָ֑ם וְלֹ֨א יִנָּתְשׁ֜וּ ע֗וֹד מֵעַ֤ל אַדְמָתָם֙ אֲשֶׁ֣ר נָתַ֣תִּי לָהֶ֔ם אָמַ֖ר יְהוָ֥ה אֱלֹהֶֽיךָ׃

< आमोस 9 >