< आमोस 8 >
1 १ परमेश्वराने मला हे दाखवले, पाहा, उन्हाळ्यातल्या फळांची टोपली दिसली.
ʼAdonay Yavé me mostró: Mira ahí una cesta con frutas de verano.
2 २ तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे; मी त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करणार नाही.
Y dijo: ¿Qué ves, Amós? Y respondí: Una cesta con frutas de verano. Entonces Yavé me dijo: Mi pueblo Israel está maduro. No lo toleraré más.
3 ३ परमेश्वर, असे म्हणातो, त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील, प्रत्येक स्थानांत लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील.”
Aquel día, dice ʼAdonay Yavé, los carruajes del palacio se convertirán en aullidos. Muchos serán los cadáveres que en silencio serán echados en cualquier lugar.
4 ४ जे तुम्ही गरिबांना तुडविता, आणि देशातील गरीबांना काढता. ते तुम्ही हे ऐका.
Oigan esto ustedes, los que pisotean al necesitado y destruyen a los pobres de la tierra,
5 ५ तुम्ही म्हणता “चंद्रदर्शन केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हास गहू विकता येईल? मग आपण एफा लहान करू, व शेकेल नाणे मोठे करू व कपटाचे तराजू घेऊन फसवू.
mientras dicen: ¿Cuándo pasará la luna nueva para que vendamos grano, o el sábado, para que ofrezcamos trigo, para reducir el peso y aumentar el precio, para engañar con balanza falsa,
6 ६ आपण चांदी देऊन गरीबांना आणि एका जोड्याच्या किंमतीत गरजूंना विकत घेऊ आणि गव्हाचे भूसही विकून टाकू.”
para comprar a los pobres por dinero y a los necesitados por un par de sandalias?
7 ७ परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहीली आहे की, “खचित त्यांच्या कर्मातले कोणतेही मी विसरणार नाही.
Por causa del orgullo de Jacob, Yavé juró: ¡No olvidaré jamás todas sus obras!
8 ८ त्यांमुळे भूमी हादरणार नाही काय? आणि या देशात राहणारा प्रत्येकजण शोक करणार नाही काय? त्यातील सर्व नील नदीप्रमाणे चढेल, आणि मिसरातल्या नदी सारखी खवळेल व पुन्हा खाली ओसरेल.”
¿No temblará la tierra por esto, y harán luto todos sus habitantes? Subirá toda como un río, crecerá y mermará como el Nilo de Egipto.
9 ९ परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात,” “मी सूर्याला दुपारीच मावळवीन आणि पृथ्वीला निरभ्र दिवशी अंधकारमय करीन.
En aquel día, dice ʼAdonay Yavé, ocultaré el sol al mediodía, oscureceré la tierra en pleno día,
10 १० मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन, आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप अशी करीन. मी प्रत्येकाला गोणताटाचे कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. ए कुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”
convertiré sus fiestas en duelo y todos sus cánticos en lamentos. Impulsaré a que toda cintura se cubra de tela áspera, y que toda cabeza se rape. Les impondré un duelo como por el unigénito, y su fin será un amargo día.
11 ११ परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन, ते दिवस येतच आहेत, तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल, पाण्याचा दुष्काळ नसेल, परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”
Ciertamente vienen días, dice ʼAdonay Yavé, cuando enviaré hambre a la tierra, no hambre de pan, ni sed de agua, sino de oír las Palabras de Yavé.
12 १२ “लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.
Irán errantes de mar a mar, y vagarán en busca de la Palabra de Yavé desde el norte hasta el oriente, pero no la hallarán.
13 १३ त्यावेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील.
Aquel día las hermosas doncellas y los jóvenes desmayarán de sed.
14 १४ जे शोमरोनाच्या पापाची शपथ वाहतात, आणि ‘हे दाना’, तुझा परमेश्वर जिवंत आहे, असे म्हणतात, आणि बैर-शेब्याचा देव जिवंत आहे, असे म्हणतात, ते पडतील, आणि ते परत कधीही उठणार नाहीत.”
Los que juran por el pecado de Samaria: ¡Por tu ʼElohim, oh Dan! Y: ¡Por el camino a Beerseba caerán, y nunca más se levantarán!