< आमोस 7 >
1 १ परमेश्वराने मला असे दाखविले की पाहा, वसंत ऋतुचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय.
haec ostendit mihi Dominus Deus et ecce fictor lucustae in principio germinantium serotini imbris et ecce serotinus post tonsorem regis
2 २ टोळांनी देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हास क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही, कारण तो फारच लहान आहे.”
et factum est cum consummasset comedere herbam terrae et dixi Domine Deus propitius esto obsecro quis suscitabit Iacob quia parvulus est
3 ३ मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
misertus est Dominus super hoc non erit dixit Dominus
4 ४ प्रभू परमेश्वराने, मला पुढील गोष्टी दाखविल्या, पाहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलावले. त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता.
haec ostendit mihi Dominus Deus et ecce vocabat iudicium ad ignem Dominus Deus et devoravit abyssum multam et comedit simul partem
5 ५ पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, याकोब कसा वाचेल? करण तो खूपच लहान आहे.”
et dixi Domine Deus quiesce obsecro quis suscitabit Iacob quia parvulus est
6 ६ मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदयपरिवर्तन झाले. प्रभू परमेश्वर म्हणाला, “हे ही घडणार नाही.”
misertus est Dominus super hoc sed et istud non erit dixit Dominus Deus
7 ७ परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता.
haec ostendit mihi et ecce Dominus stans super murum litum et in manu eius trulla cementarii
8 ८ परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो ओळंबा, मग प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या मनुष्यांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
et dixit Dominus ad me quid tu vides Amos et dixi trullam cementarii et dixit Dominus ecce ego ponam trullam in medio populi mei Israhel non adiciam ultra superinducere eum
9 ९ इसहाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल, इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील, आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
et demolientur excelsa idoli et sanctificationes Israhel desolabuntur et consurgam super domum Hieroboam in gladio
10 १० बेथेल येथील याजक अमस्या ह्याने, “इस्राएलाचा राजा, यराबामाला निरोप पाठविला. आमोसाने इस्राएलाच्या घरामध्ये तुझ्याविरुध्द कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही.
et misit Amasias sacerdos Bethel ad Hieroboam regem Israhel dicens rebellavit contra te Amos in medio domus Israhel non poterit terra sustinere universos sermones eius
11 ११ कारण आमोस असे म्हणतो, यराबाम तलवारीने मरेल, आणि इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
haec enim dicit Amos in gladio morietur Hieroboam et Israhel captivus migrabit de terra sua
12 १२ अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे.
et dixit Amasias ad Amos qui vides gradere fuge in terram Iuda et comede ibi panem et ibi prophetabis
13 १३ पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस. कारण ही राजाचे पवित्रस्थान आहे व राज घराणे आहेत.”
et in Bethel non adicies ultra ut prophetes quia sanctificatio regis est et domus regni est
14 १४ मग आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नव्हतो व संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.
et respondit Amos et dixit ad Amasiam non sum propheta et non sum filius prophetae sed armentarius ego sum vellicans sycomoros
15 १५ मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांस, इस्राएलाला, भविष्य सांग.’
et tulit me Dominus cum sequerer gregem et dixit ad me Dominus vade propheta ad populum meum Israhel
16 १६ म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.
et nunc audi verbum Domini tu dicis non prophetabis super Israhel et non stillabis super domum idoli
17 १७ पण परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल; तुझी मुले-मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील, इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”
propter hoc haec dicit Dominus uxor tua in civitate fornicabitur et filii tui et filiae tuae in gladio cadent et humus tua funiculo metietur et tu in terra polluta morieris et Israhel captivus migrabit de terra sua