< आमोस 7 >

1 परमेश्वराने मला असे दाखविले की पाहा, वसंत ऋतुचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय.
Thus hath the Lord Jehovah shewed me, and lo, He is forming locusts at the beginning of the ascending of the latter growth, and lo, the latter growth [is] after the mowings of the king;
2 टोळांनी देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हास क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही, कारण तो फारच लहान आहे.”
and it hath come to pass, when it hath finished to consume the herb of the land, that I say: 'Lord Jehovah, forgive, I pray Thee, How doth Jacob arise — for he [is] small?'
3 मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
Jehovah hath repented of this, 'It shall not be,' said Jehovah.
4 प्रभू परमेश्वराने, मला पुढील गोष्टी दाखविल्या, पाहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलावले. त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता.
Thus hath the Lord Jehovah shewed me, and lo, the Lord Jehovah is calling to contend by fire, and it consumeth the great deep, yea, it hath consumed the portion, and I say:
5 पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, याकोब कसा वाचेल? करण तो खूपच लहान आहे.”
'Lord Jehovah, cease, I pray Thee, How doth Jacob arise — for he [is] small?'
6 मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदयपरिवर्तन झाले. प्रभू परमेश्वर म्हणाला, “हे ही घडणार नाही.”
Jehovah hath repented of this, 'It also shall not be,' said the Lord Jehovah.
7 परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता.
Thus hath He shewed me, and lo, the Lord is standing by a wall [made according to] a plumb-line, and in His hand a plumb-line;
8 परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो ओळंबा, मग प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या मनुष्यांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
and Jehovah saith unto me, 'What art thou seeing, Amos?' And I say, 'A plumb-line;' and the Lord saith: 'Lo, I am setting a plumb-line in the midst of My people Israel, I do not add any more to pass over to it.
9 इसहाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल, इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील, आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
And desolated have been high places of Isaac, And sanctuaries of Israel are wasted, And I have risen against the house of Jeroboam with a sword.'
10 १० बेथेल येथील याजक अमस्या ह्याने, “इस्राएलाचा राजा, यराबामाला निरोप पाठविला. आमोसाने इस्राएलाच्या घरामध्ये तुझ्याविरुध्द कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही.
And Amaziah priest of Beth-El sendeth unto Jeroboam king of Israel, saying, 'Amos hath conspired against thee in the midst of the house of Israel; the land is not able to bear all his words,
11 ११ कारण आमोस असे म्हणतो, यराबाम तलवारीने मरेल, आणि इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
for thus said Amos: By sword die doth Jeroboam, And Israel certainly removeth from off its land.'
12 १२ अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे.
And Amaziah saith unto Amos, 'Seer, go flee for thee unto the land of Judah, and eat there bread, and there thou dost prophesy;
13 १३ पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस. कारण ही राजाचे पवित्रस्थान आहे व राज घराणे आहेत.”
and [at] Beth-El do not add to prophesy any more, for it [is] the king's sanctuary, and it [is] the royal house.'
14 १४ मग आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नव्हतो व संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.
And Amos answereth and saith unto Amaziah, 'I [am] no prophet, nor a prophet's son [am] I, but a herdsman I [am], and a cultivator of sycamores,
15 १५ मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांस, इस्राएलाला, भविष्य सांग.’
and Jehovah taketh me from after the flock, and Jehovah saith unto me, Go, prophesy unto My people Israel.
16 १६ म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.
And now, hear a word of Jehovah: thou art saying, Do not prophesy against Israel, nor drop [any thing] against the house of Isaac,
17 १७ पण परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल; तुझी मुले-मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील, इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”
therefore thus said Jehovah: Thy wife in the city doth go a-whoring, And thy sons and thy daughters by sword do fall, And thy land by line is apportioned, And thou on an unclean land diest, And Israel certainly removeth from off its land.'

< आमोस 7 >