< आमोस 6 >
1 १ जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना, आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय, जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत, ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.
国为列国之首,人最著名, 且为以色列家所归向, 在锡安和撒马利亚山安逸无虑的,有祸了!
2 २ “कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा, तेथून पलिष्ट्यांची नगरी गथला खाली जा. ते तुमच्या दोन्ही राज्यांपेक्षा चांगले आहेत काय? त्यांची सीमा तुमच्या सीमेपेक्षा मोठी आहे काय?
你们要过到甲尼察看, 从那里往大城哈马去, 又下到非利士人的迦特, 看那些国比你们的国还强吗? 境界比你们的境界还宽吗?
3 ३ तुम्ही जे वाईट दिवसास दूर करता, आणि हिंसाचाराचे आसन जवळ आणता, त्यांना हाय हाय.
你们以为降祸的日子还远, 坐在位上尽行强暴。
4 ४ तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि आपल्या गाद्यांवर पसरता. तुम्ही कळपातील कोकरे, आणि गोठ्यातील वासरे खाता.
你们躺卧在象牙床上,舒身在榻上, 吃群中的羊羔,棚里的牛犊;
5 ५ ते वीणेच्या संगीतावर मूर्खासारखे गातात, आणि दाविदाप्रमाणे ते वाद्यांवर सराव करतात.
弹琴鼓瑟唱消闲的歌曲, 为自己制造乐器,如同大卫所造的;
6 ६ ते प्यालांतून मद्य पितात आणि चांगल्या तेलाने आपणाला अभिषेक करतात. पण ते योसेफाचा नाश होत आहे, त्यावर शोक करीत नाहीत.”
以大碗喝酒,用上等的油抹身, 却不为约瑟的苦难担忧。
7 ७ तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील, आणि ख्यालीखुशालीत वेळ घालवणाऱ्यांचा गोंधळ नष्ट होईल.
所以这些人必在被掳的人中首先被掳; 舒身的人荒宴之乐必消灭了。
8 ८ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की, “मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो, त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्वकाही शत्रूच्या हाती देईल.”
主耶和华—万军之 神指着自己起誓说: 我憎恶雅各的荣华,厌弃他的宫殿; 因此,我必将城和其中所有的都交付敌人。
9 ९ त्यावेळी, कदाचित एका घरांत दहा लोक असतील, तर ते सर्व मरतील.
那时,若在一房之内剩下十个人,也都必死。
10 १० प्रेते घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी असेल तर, त्यास लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय?” तो मनुष्य म्हणेल, नाही, मग तो त्यास म्हणेल, “गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.”
死人的伯叔,就是烧他尸首的,要将这尸首搬到房外,问房屋内间的人说:“你那里还有人没有?”他必说:“没有”;又说:“不要作声,因为我们不可提耶和华的名。”
11 ११ कारण पाहा! परमेश्वर आज्ञा देईल, तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा-भुगा होईल.
看哪,耶和华出令, 大房就被攻破, 小屋就被打裂。
12 १२ घोडे खडकावरून धावतात का? तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का? पण तुम्ही तर न्यायाचे विष केले, आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.
马岂能在崖石上奔跑? 人岂能在那里用牛耕种呢? 你们却使公平变为苦胆, 使公义的果子变为茵 。
13 १३ तुम्ही ज्यात काहीच नाही त्यामध्ये आनंद करता, तुम्ही म्हणता, “आम्ही आमच्या बळावर सत्ता संपादन केली.”
你们喜爱虚浮的事,自夸说: 我们不是凭自己的力量取了角吗?
14 १४ “पण हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन, ते राष्ट्र तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला दु: ख देईल.” सेनाधीश परमेश्वर देव, असे म्हणतो.
耶和华、万军之 神说: 以色列家啊,我必兴起一国攻击你们; 他们必欺压你们, 从哈马口直到亚拉巴的河。