< आमोस 5 >
1 १ इस्राएलाचे घराणे हो, हे वचन जे विलापासारखे आहे, असे तुमच्याकडे आणतो ते ऐका.
以色列家啊,要听我为你们所作的哀歌:
2 २ इस्राएलाची कुमारिका पडली आहे; ती पुन्हा कधीही उठणार नाही; तिला एकटीलाच सोडून दिले आहे, तिला उठवणारा कोणीही नाही.
以色列民跌倒,不得再起; 躺在地上,无人搀扶。
3 ३ परमेश्वर असे म्हणतो, “ज्या शहरातून हजार निघाले त्यामध्ये फक्त शंभर उरतील आणि ज्यातून शंभर असत त्यामध्ये इस्राएलाच्या घराण्याला दहा उरतील.”
主耶和华如此说: 以色列家的城发出一千兵的,只剩一百; 发出一百的,只剩十个。
4 ४ परमेश्वर इस्राएलाच्या घराण्याला असे म्हणतो, “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल.”
耶和华向以色列家如此说: 你们要寻求我,就必存活。
5 ५ पण बेथेलास शरण जाऊ नका; गिल्गालला जाऊ नका; सीमा ओलांडून खाली बैर-शेबालाही जाऊ नका. गिलगालमधील लोकांस कैदी म्हणून नेले जाईल, आणि बेथेल नाहीसे होईल.
不要往伯特利寻求, 不要进入吉甲, 不要过到别是巴; 因为吉甲必被掳掠, 伯特利也必归于无有。
6 ६ परमेश्वरास शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल, नाहीतर तो अग्नीसारखा योसेफाच्या घरावर पडेल आणि ते भस्मसात होऊन जाईल आणि त्यास विझवायला बेथेलमधे कोणी नसणार.
要寻求耶和华,就必存活, 免得他在约瑟家像火发出, 在伯特利焚烧,无人扑灭。
7 ७ जे तुम्ही न्यायाला कडूपणामध्ये बदलता आणि न्यायीपण धुळीस मिळवता,
你们这使公平变为茵 、 将公义丢弃于地的,
8 ८ ते तुम्ही, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे बनवली, तोच दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो; आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो; समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव “परमेश्वर” आहे.
要寻求那造昴星和参星, 使死荫变为晨光, 使白日变为黑夜, 命海水来浇在地上的— 耶和华是他的名;
9 ९ तो बलवानावर एकाएकी नाश आणतो म्हणून किल्ल्यांवर नाश येतो.
他使力强的忽遭灭亡, 以致保障遭遇毁坏。
10 १० जे त्यांना वेशींवर सरळ करु ईच्छीतात, त्यांचा ते द्वेष करतात, आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात.
你们怨恨那在城门口责备人的, 憎恶那说正直话的。
11 ११ तुम्ही गरिबांना तुडवीता, आणि त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली, पण त्यामध्ये तुम्ही रहाणार नाही. तुमच्या द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पिणार नाही.
你们践踏贫民, 向他们勒索麦子; 你们用凿过的石头建造房屋, 却不得住在其内; 栽种美好的葡萄园, 却不得喝所出的酒。
12 १२ कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे, आणि तुम्ही खरोखरच खूप वाईट कृत्ये केली आहेत. तुम्ही लाच घेता, धार्मिकाला त्रास देता, आणि वेशींत गरिबांचा न्याय विपरीत करता.
我知道你们的罪过何等多, 你们的罪恶何等大。 你们苦待义人,收受贿赂,在城门口屈枉穷乏人。
13 १३ त्यावेळी, सुज्ञ गप्प बसतील, कारण ती वाईट वेळ असेल.
所以通达人见这样的时势必静默不言, 因为时势真恶。
14 १४ तुम्ही जगावे म्हणून जे उत्तम आहे त्याचा शोध करा, वाईटाला शोधू नका. म्हणजे जसे तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल.
你们要求善, 不要求恶,就必存活。 这样,耶和华—万军之 神 必照你们所说的与你们同在。
15 १५ वाईटाचा द्वेष करा व चांगुलपणावर प्रेम करा, नगराच्या वेशीत न्याय स्थापित करा. मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव, योसेफाच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.
要恶恶好善, 在城门口秉公行义; 或者耶和华—万军之 神向约瑟的余民施恩。
16 १६ यास्तव सेनाधीश परमेश्वर देव, प्रभू असे म्हणतो, “सर्व चव्हाट्यावर रडणे असेल, आणि गल्लोगल्ली लोक हाय हाय करतील, आणि ते शेतकऱ्याला शोक करायला आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रोश करायला बोलवून आणतील.
主耶和华—万军之 神如此说: 在一切宽阔处必有哀号的声音; 在各街市上必有人说: 哀哉!哀哉! 又必叫农夫来哭号, 叫善唱哀歌的来举哀。
17 १७ द्राक्षमळ्यांत लोक रडत असतील, कारण मी तुमच्यामध्ये फिरत जाईन.” असे परमेश्वर म्हणतो.
在各葡萄园必有哀号的声音, 因为我必从你中间经过。 这是耶和华说的。
18 १८ जे परमेश्वराच्या न्यायाच्या दिवसाची इच्छा धरतात त्यांना हाय हाय! तुम्हास तो दिवस का बरे पहावयाचा आहे? तो अंधार आहे, उजेड नाही.
想望耶和华日子来到的有祸了! 你们为何想望耶和华的日子呢? 那日黑暗没有光明,
19 १९ जणू काय एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला आणि अस्वलाने त्यास गाठले, अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला आणि त्यास साप चावाला.
景况好像人躲避狮子又遇见熊, 或是进房屋以手靠墙,就被蛇咬。
20 २० परमेश्वराचा दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही काय? प्रकाशाचा एक किरण नसलेला व त्यामध्ये काही तेज नाही असा असेल.
耶和华的日子不是黑暗没有光明吗? 不是幽暗毫无光辉吗?
21 २१ “मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो, मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाहीत.
我厌恶你们的节期, 也不喜悦你们的严肃会。
22 २२ तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत, तरी मी ती स्वीकारणार नाही, शांत्यर्पणात, तुम्ही दिलेल्या पुष्ट प्राण्यांकडे मी पाहणारसुध्दा नाही.
你们虽然向我献燔祭和素祭, 我却不悦纳, 也不顾你们用肥畜献的平安祭;
23 २३ तुमच्या गाण्यांच्या कोलाहल येथून दूर न्या, तुमच्या वीणांचा आवज मी ऐकणार नाही.
要使你们歌唱的声音远离我, 因为我不听你们弹琴的响声。
24 २४ तर जलांप्रमाणे न्याय व न्यायीपण अविरतपणे वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो.
惟愿公平如大水滚滚, 使公义如江河滔滔。
25 २५ इस्राएल, वाळवंटात, चाळीस वर्षे तू मला यज्ञ व दाने अर्पणे करत होता काय?
“以色列家啊,你们在旷野四十年,岂是将祭物和供物献给我呢?
26 २६ तुम्ही तर आपल्या राजाचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देव्हारा, आपणासाठी केलेला तुमच्या देवाचा तारा, ही वाहून न्याल.
你们抬着为自己所造之摩洛的帐幕和偶像的龛,并你们的神星。
27 २७ म्हणून मी तुम्हास कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन.” असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश देव हे त्याचे नाव आहे.
所以我要把你们掳到大马士革以外。”这是耶和华、名为万军之 神说的。