< आमोस 4 >

1 शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.
Listen to this message, women of Sameria, you well-fed cows of Bashan, who oppress the poor and crush the needy, who say to your husbands, “Bring us another drink!”
2 परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील.
The Lord God has sworn by his holiness: The time is coming when you will be carried away in baskets, your children carried away in fish-baskets,
3 तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल, तुम्ही आपणास हर्मोन पर्वतावर टाकाल, असे परमेश्वर म्हणतो.
and through the breaches in the city wall you will go, thrown out on the garbage dump, says the Lord.
4 “बेथेलला जा आणि पाप करा, गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा, तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
Come to Bethel and transgress, at Gilgald increase your transgression. Bring your sacrifices in the morning, every third day your tithes!
5 खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा; खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा; कारण हे इस्राएलाच्या लोकांनो, हे करायला तुम्हास आवडते.” असे परमेश्वर म्हणतो.
Burn some leavened bread as a thank-offering, proclaim aloud your voluntary offerings, for you love to do this, Israelites! says the Lord God.
6 “मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
But it was I who gave to you empty stomachs in all your cities, and lack of bread in all your towns, yet you have not returned to me, says the Lord.
7 “कापणीला तीन महिने राहीले असता, त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला. आणि मी एका शहरावर पाऊस पाडला आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही. एका भागावर पाऊस पडला आणि ज्या भागावर पाऊस पडला नाही तो सुकून गेला.
It was I who withheld from you the rain, sending rain on one city, while on another I allowed no rain. One field received rain, while a field without rain withered.
8 म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले. परंतु तृप्त झाले नाहीत, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
People from two or three cities ranged as far as another city for drinking water, and still they did not have enough, yet you did not return to me, says the Lord.
9 “मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा, व द्राक्षमळ्यांचा, व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
I struck you with blight and mildew, I laid waste your gardens and vineyards. The swarming locust devoured your fig and your olive trees, yet you did not return to me, says the Lord.
10 १० “मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत, आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत, तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे. तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
I sent plague among you like the plagues of Egypt, I slew your youths with the sword, your horses raided away, I caused the stench of your camps to rise in your nostrils, yet you did not return to me, says the Lord.
11 ११ “सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला; आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
I wrought a destruction among you, as God destroyed Sodom and Gomorrah. You were like a stick snatched from the fire, yet you did not return to me, says the Lord.
12 १२ “म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन, आणि हे इस्राएला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा, इस्राएलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो.
Therefore this is what I will do to you, Israel, and because I am about to do this to you, prepare to meet your God, Israel.
13 १३ कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो, आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो, जो पाहाटे अंधार करतो, आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो. त्याचे नाव परमेश्वर, सेनाधीश देव आहे.”
He is here! He who forms the mountains, creates the wind, declares to his thoughts to mortals, makes dawn and darkness, treads upon the heights of the earth, the Lord, the God of hosts, is his name!

< आमोस 4 >