< आमोस 3 >

1 इस्राएलाच्या लोकांनो, जे सर्व घराणे मी मिसरामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी, परमेश्वराने तुमच्याविरुध्द जे वचन सांगितले ते ऐका,
以色列人哪,你们全家是我从埃及地领上来的,当听耶和华攻击你们的话:
2 “पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून, मी फक्त तुम्हास निवडले आहे. म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी तुम्हास शिक्षा करीन.”
在地上万族中,我只认识你们; 因此,我必追讨你们的一切罪孽。
3 दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकतील काय?
二人若不同心,岂能同行呢?
4 शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय? तरुण सिंहाने काही धरले नसेल तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय?
狮子若非抓食,岂能在林中咆哮呢? 少壮狮子若无所得,岂能从洞中发声呢?
5 जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय? पाशांत काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय?
若没有机槛,雀鸟岂能陷在网罗里呢? 网罗若无所得,岂能从地上翻起呢?
6 रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भिणार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का?
城中若吹角,百姓岂不惊恐呢? 灾祸若临到一城,岂非耶和华所降的吗?
7 खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.
主耶和华若不将奥秘指示他的仆人—众先知, 就一无所行。
8 सिंहाने डरकाळी फोडल्यास, कोण भिणार नाही? परमेश्वर बोलला आहे; तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहवेल?
狮子吼叫,谁不惧怕呢? 主耶和华发命,谁能不说预言呢?
9 अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर एकत्र जमा, आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पाहा.
要在亚实突的宫殿中 和埃及地的宫殿里传扬说: 你们要聚集在撒马利亚的山上, 就看见城中有何等大的扰乱与欺压的事。
10 १० परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाहीत.”
那些以强暴抢夺财物、 积蓄在自己家中的人 不知道行正直的事。 这是耶和华说的。
11 ११ यास्तव परमेश्वर म्हणतो: “त्या देशाला शत्रू घेरतील, तो तुमचे सामर्थ्य तुमच्यापासून खाली आणेल, आणि तुझे महाल लुटले जातील.”
所以主耶和华如此说: 敌人必来围攻这地, 使你的势力衰微, 抢掠你的家宅。
12 १२ परमेश्वर असे म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून फक्त दोन पाय, किंवा कानाचा तुकडा वाचवितो, त्याचप्रकारे इस्राएली लोक जे शोमरोनामध्ये पलंगाच्या कोपऱ्यात किंवा खाटेच्या रेशमी गाद्यांवर बसतात ती वाचवली जातील.”
耶和华如此说:“牧人怎样从狮子口中抢回两条羊腿或半个耳朵,住撒马利亚的以色列人躺卧在床角上或铺绣花毯的榻上,他们得救也不过如此。”
13 १३ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः “ऐका, आणि याकोबाच्या घराण्या विरूद्ध साक्ष द्या.
主耶和华—万军之 神说: 当听这话,警戒雅各家。
14 १४ कारण ज्या दिवसात मी इस्राएलाला त्याच्या पापा बद्दल शिक्षा करीन तेव्हा मी बेथेलच्या वेद्याही नष्ट करीन, वेदीची शिंगे तोडली जातील आणि ती भूमीवर पडतील.
我讨以色列罪的日子,也要讨伯特利祭坛的罪; 坛角必被砍下,坠落于地。
15 १५ हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
我要拆毁过冬和过夏的房屋。 象牙的房屋也必毁灭; 高大的房屋都归无有。 这是耶和华说的。

< आमोस 3 >