< आमोस 2 >

1 परमेश्वर असे म्हणतो, “मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्यांचा चुना केला.
چهار تقصیر موآب عقوبتش را نخواهم برگردانید زیرا که استخوانهای پادشاه ادوم راآهک پختند.۱
2 म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन, आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील. आणि मवाब गोंधळात, आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल.
پس آتش بر موآب می‌فرستم تاقصرهای قریوت را بسوزاند و موآب با هنگامه وخروش و صدای کرنا خواهد مرد.۲
3 मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन, आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.” असे परमेश्वर म्हणतो.
و خداوندمی گوید که داور را از میانش منقطع خواهم ساخت و همه سرورانش را با وی خواهم کشت.۳
4 परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नकारले आहे, आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली अशाच प्रकारे त्यांचे पुर्वजसुद्धा वागत होते.
خداوند چنین می‌گوید: به‌سبب سه و چهارتقصیر یهودا عقوبتش را نخواهم برگردانید زیراکه شریعت خداوند را ترک نموده، فرایض او رانگاه نداشتند و دروغهای ایشان که پدرانشان آنهارا پیروی نمودند ایشان را گمراه کرد.۴
5 म्हणून मी यहूदात आग लावीन. त्या आगीत यरूशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”
پس آتش بر یهودا خواهم فرستاد تا قصرهای اورشلیم رابسوزاند.۵
6 परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलच्या तिन्ही अपराधांमुळे, तर अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी चांदीसाठी निरपराध आणि पायातील वाहाणांच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे.
خداوند چنین می‌گوید: به‌سبب سه و چهارتقصیر اسرائیل عقوبتش را نخواهم برگردانیدزیرا که مرد عادل را به نقره و مسکین را به زوج نعلین فروختند.۶
7 जसे लोक माती पायाखाली तुडवतात तसेच ते गरीबांची मस्तके मातीत तुडवतात; आणि मुलांनी व त्यांच्या वडीलांनी एकाच स्त्रीशी संबंध ठेवले, अशासाठी की माझे नाव धुळीस मिळावे.
و به غبار زمین که بر سرمسکینان است حرص دارند و راه حلیمان رامنحرف می‌سازند و پسر و پدر به یک دختردرآمده، اسم قدوس مرا بی‌حرمت می‌کنند.۷
8 आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात, आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्यांचा द्राक्षरस पितात.
وبر رختی که گرو می‌گیرند، نزد هر مذبح می‌خوابند و شراب جریمه شدگان را در خانه خدای خود می‌نوشند.۸
9 मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला, ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती; ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
و حال آنکه من اموریان را که قامت ایشان مانند قد سرو آزاد بود و ایشان مثل بلوط تنومندبودند، پیش روی ایشان هلاک ساختم و میوه ایشان را از بالا و ریشه های ایشان را از پایین تلف نمودم.۹
10 १० तुम्हास मिसरमधून आणणारा मीच आणि चाळीस वर्षे मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले ह्यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा.
و من شما را از زمین مصر برآورده، چهل سال در بیابان گردش دادم تا زمین اموریان رابه تصرف آورید.۱۰
11 ११ मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे होण्यासाठी आणि तुमच्यातील काही तरुणांना नाजीर होण्यास वाढवले, इस्राएल लोकांनो, हे असे नाही काय?” असे परमेश्वरा म्हणतो.
و بعضی از پسران شما را انبیاو بعضی از جوانان شما را نذیره قرار دادم. خداوند می‌گوید: ای بنی‌اسرائیل آیا چنین نیست؟۱۱
12 १२ “पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले, आणि संदेष्ट्यांना भविष्य सांगण्यास मनाई केली.
اما شما نذیره‌ها را شراب نوشانیدید وانبیا را نهی نموده، گفتید که نبوت مکنید.۱۲
13 १३ पाहा, जसा पेंढ्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल, त्याच प्रकाराने मी तुम्हास दाबून टाकीन.
اینک من شما را تنگ خواهم گذارد چنانکه ارابه‌ای که از بافه‌ها پر باشد، تنگ گذارده می‌شود.۱۳
14 १४ चपळ व्यक्ती सुटणार नाही; बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही, आणि वीराला स्वत: चा जीव वाचवता येणार नाही.
و مفر برای تندرو فوت خواهد شد و تنومند به توانایی خویش غالب نخواهد آمد و جبار جان خود را نخواهد رهانید.۱۴
15 १५ धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही. आणि जोरात धावणारे सुटणार नाही; घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही.
و تیرانداز نخواهدایستاد و تیزپا خود را نخواهد رهانید و اسب‌سوارجان خود را خلاصی نخواهد داد.۱۵
16 १६ वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल” असे परमेश्वर म्हणतो.
و خداوندمی گوید که شجاع ترین جباران در آن روز عریان خواهند گریخت.۱۶

< आमोस 2 >