< प्रेषि. 1 >
1 १ हे थियफिला, येशूने जे शिकवले आणि केले, व ज्या विषयी मी पहिल्या ग्रंथात नमुद केले,
Den ersten Bericht [O. die erste Erzählung, Darstellung] habe ich verfaßt, o Theophilus, von allem, was Jesus anfing, sowohl zu tun als auch zu lehren,
2 २ त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या.
bis zu dem Tage, an welchem er aufgenommen wurde, nachdem er den Aposteln, die er sich auserwählt, durch den Heiligen Geist Befehl gegeben hatte;
3 ३ मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
welchen er sich auch nach seinem Leiden in vielen sicheren Kennzeichen lebendig dargestellt hat, indem er vierzig Tage hindurch von ihnen gesehen wurde und über die Dinge redete, welche das Reich Gottes betreffen.
4 ४ नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरूशलेम शहर सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या, ज्या देणगी विषयी, तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पाहा.
Und als er mit ihnen versammelt war, befahl er ihnen, sich nicht von Jerusalem zu entfernen, sondern auf die Verheißung des Vaters zu warten, -die ihr von mir gehört habt;
5 ५ कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
denn Johannes taufte zwar mit Wasser, ihr aber werdet mit [W. in] Heiligem Geiste getauft werden nach nunmehr nicht vielen Tagen.
6 ६ मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”
Sie nun, als sie zusammengekommen waren, fragten ihn und sagten: Herr, stellst du in dieser Zeit dem Israel das Reich wieder her?
7 ७ तो त्यांना म्हणाला, “पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.
Er sprach aber zu ihnen: Es ist nicht eure Sache, Zeit oder Zeiten [W. Zeiten oder bestimmte Zeiten] zu wissen, die der Vater in seine eigene Gewalt gesetzt hat. [And. üb.: in seiner eigenen Gewalt festgesetzt hat]
8 ८ परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, आणि यरूशलेम शहरात सर्व यहूदीया आणि शोमरोन प्रांतात, व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”
Aber ihr werdet Kraft empfangen, wenn der Heilige Geist auf euch gekommen ist; und ihr werdet meine Zeugen sein, sowohl in Jerusalem als auch in ganz Judäa und Samaria und bis an das Ende der Erde.
9 ९ असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले.
Und als er dies gesagt hatte, wurde er emporgehoben, indem sie es sahen, [O. indem sie zusahen] und eine Wolke nahm ihn auf von ihren Augen hinweg.
10 १० नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले.
Und wie sie unverwandt gen Himmel schauten, als er auffuhr, siehe, da standen zwei Männer in weißem Kleide bei ihnen,
11 ११ आणि ते असे बोलले, “अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल.”
welche auch sprachen: Männer von Galiläa, was stehet ihr und sehet hinauf gen Himmel? Dieser Jesus, der von euch weg in den Himmel aufgenommen worden ist, wird also kommen, wie ihr ihn gen Himmel habt auffahren sehen.
12 १२ मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले.
Da kehrten sie nach Jerusalem zurück von dem Berge, welcher Ölberg heißt, der nahe bei Jerusalem ist, einen Sabbathweg [d. i. 5-6 Stadien] entfernt.
13 १३ आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते, तिथे गेले.
Und als sie hineingekommen waren, stiegen sie auf den Obersaal, wo sie blieben: [O. sich aufzuhalten pflegten] sowohl Petrus, als Johannes und Jakobus und Andreas, Philippus und Thomas, Bartholomäus und Matthäus, Jakobus, Alphäus Sohn, und Simon, der Eiferer, und Judas, Jakobus Bruder. [And.: Sohn]
14 १४ हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
Diese alle verharrten einmütig im Gebet mit etlichen Weibern und Maria, der Mutter Jesu, und mit seinen Brüdern.
15 १५ त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये, सुमारे एकशेवीस मनुष्यांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला,
Und in diesen Tagen stand Petrus in der Mitte der Brüder auf und sprach [es war aber eine Menge [W. Menge von Namen] von etwa hundertzwanzig beisammen]:
16 १६ “बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते, ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
Brüder, [W. Männer, Brüder [ein Hebraismus], so gewöhnlich bei der Anrede] es mußte die Schrift erfüllt werden, welche der Heilige Geist durch den Mund Davids vorhergesagt hat über Judas, der denen, die Jesum griffen, ein Wegweiser geworden ist.
17 १७ तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेतल्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता.”
Denn er war unter uns gezählt und hatte das Los dieses Dienstes empfangen.
18 १८ (त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली.
[Dieser nun hat zwar von dem Lohne der Ungerechtigkeit einen Acker erworben und ist, kopfüber gestürzt, mitten entzwei geborsten, und alle seine Eingeweide sind ausgeschüttet worden.
19 १९ हे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.)
Und es ist allen Bewohnern von Jerusalem kundgeworden, so daß jener Acker in ihrer eigenen Mundart Akeldama, das ist Blutacker, genannt worden ist.]
20 २० स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे की, त्याचे घर उजाड पडो, व त्यामध्ये कोणीही न राहो. आणि, त्याचा हुद्दा दूसरा घेवो.
Denn es steht im Buche der Psalmen geschrieben: "Seine Wohnung werde öde, und es sei niemand, der darin wohne", [Ps. 69,25] und: "Sein Aufseheramt empfange ein anderer". [Ps. 109,8]
21 २१ म्हणून, प्रभू येशू, आमच्यामध्ये आत बाहेर येत जात होता त्या सर्व काळात,
Es muß nun von den Männern, die mit uns gegangen sind in all der Zeit, in welcher der Herr Jesus bei uns ein- und ausging,
22 २२ योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, त्या दिवसापर्यंत तर जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.
anfangend von der Taufe Johannes bis zu dem Tage, an welchem er von uns aufgenommen wurde, -von diesen muß einer ein Zeuge seiner Auferstehung mit uns werden.
23 २३ तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते, तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मत्थिया, या दोघांना त्यांनी पुढे आणले.
Und sie stellten zwei dar: Joseph, genannt Barsabas, der Justus zubenamt war, und Matthias.
24 २४ मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वाची हृदये जाणणाऱ्या प्रभू,
Und sie beteten und sprachen: Du, Herr, Herzenskündiger aller, zeige von diesen beiden den einen an, den du auserwählt hast,
25 २५ हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.”
um das Los dieses Dienstes und Apostelamtes [Eig. dieser Apostelschaft] zu empfangen, von welchem Judas abgewichen ist, um an seinen eigenen Ort zu gehen.
26 २६ मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्यास अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.
Und sie gaben Lose über [O. für] sie; und das Los fiel auf Matthias, und er wurde den elf Aposteln zugezählt.