< प्रेषि. 9 >

1 शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला.
А Савл, іще дишучи грізьбою й убивством на учнів Господніх, приступивши до первосвященика,
2 शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे.
попросив від нього листи́ у Дама́ск синагогам, щоб, коли зна́йде яких чоловіків та жінок, що тієї дороги вони, то зв'язати й приве́сти до Єрусалиму.
3 मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला;
А коли він ішов й наближа́вся до Дамаску, то ось нагло ося́яло світло із неба його,
4 शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?”
а він повали́вся на землю, і голос почув, що йому говорив: „Са́вле, Са́вле, — чому́ ти Мене переслідуєш?“
5 शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे;
А він запитав: „Хто Ти, Пане?“А Той: „Я Ісус, що Його переслідуєш ти. Трудно тобі бити ногою колючку! “
6 आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.”
А він, затрусившися та налякавшися, каже: „Чого, Господи, хочеш, щоб я вчинив?“А до нього Господь: „Уставай, та до міста подайся, а там тобі скажуть, що́ маєш робити!“
7 जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही.
А люди, що йшли з ним, онімілі стояли, бо вони чули голос, та ніко́го не бачили.
8 शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले, पण त्यास काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिष्क शहरात नेले.
Тоді Савл підвівся з землі, і хоч очі розплю́щені мав, ніко́го не бачив... І за руку його повели́ й привели́ до Дамаску.
9 तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही.
І три дні невидю́щий він був, і не їв, і не пив.
10 १० दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता त्याचे नाव हनन्या होते; प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला तो म्हणाला, “हनन्या.” हनन्याने उत्तर दिले, “मी इथे आहे, प्रभू.”
А в Дама́ску був учень один, на йме́ння Ана́ній. І Господь у видінні промовив до нього: „ Ана́нію!“А він відказав: „Ось я, Господи!“
11 ११ प्रभू हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे.
Господь же до нього: „Устань, і піди на вулицю, що Про́стою зветься, і пошукай в домі Юдовім Са́вла на йме́ння, тарся́нина, ось бо він мо́литься,
12 १२ शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला, असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्यास दिसले.”
і мужа в видінні він бачив, на йме́ння Ананія, що до нього прийшов і руку на нього поклав, щоб став він видю́щий“.
13 १३ परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू, मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे; यरूशलेम शहरातील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
Відповів же Ана́ній: „Чув я, Господи, від багатьох про цього́ чоловіка, скільки зла він учинив в Єрусалимі святим Твоїм!
14 १४ आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकांकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
І тут має вла́ду від первосвящеників, щоб в'язати усіх, хто кли́че Ім'я́ Твоє“.
15 १५ परंतु प्रभू म्हणाला, “जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
І промовив до нього Господь: „Іди, бо для Мене — посу́дина ви́брана він, щоб носити Ім'я́ Моє перед наро́дами, і царями, і синами Ізраїля.
16 १६ माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन,”
Бо Я покажу́ йому, скільки має він витерпіти за Ім'я́ Моє“.
17 १७ हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.”
І Ананій пішов, і до дому ввійшов, і руки поклавши на нього, промовив: „Са́вле брате, Господь Ісус, що з'явився тобі на дорозі, якою ти йшов, послав ось мене, щоб став ти видю́щий, і напо́внився Духа Святого!“
18 १८ लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.
І хвилі тієї відпала з очей йому ніби луска́, і зараз видю́щий він став... І, вставши, охристився,
19 १९ नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
і, прийнявши поживу, на силах зміцнів.
20 २० यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे.
І він зараз зачав у синагогах звіщати про Ісуса, що Він — Божий Син,
21 २१ ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले ते म्हणाले, “यरूशलेम शहरातील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वाचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरूशलेम शहरातील मुख्य याजकांसमोर उभे करणार आहे.”
І дивом усі дивувалися, хто чув, і говорили: „Хіба це не той, що переслідував в Єрусалимі визна́вців оцього Ім'я́, та й сюди не на те він прибув, щоб отих пов'язати й приве́сти до первосвящеників?“
22 २२ परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते. दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
А Савл іще більше зміцнявся, і непокоїв юдеїв, що в Дамаску жили, удово́днюючи, що Той — то Христос.
23 २३ काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
А як ча́су минуло доволі, юдеї змовилися його вбити,
24 २४ यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
та Са́влові стала відо́ма їхня змова. А вони день і ніч чатува́ли в воро́тях, щоб убити його.
25 २५ एके रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले, नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली.
Тому учні забрали його вночі, та й із муру спустили в коші́.
26 २६ नंतर शौल यरूशलेमे शहरास गेला तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्यास घाबरत होते, त्यांचा विश्वासच बसत नव्हता, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे.
А коли він до Єрусалиму прибув, то силкува́вся пристати до учнів, та його всі ляка́лися, не вірячи, що він учень.
27 २७ परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्यास घेऊन प्रेषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे, येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले, मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांस सांगितली.
Варнава тоді взяв його та й привів до апо́столів, і їм розповів, як дорогою той бачив Господа, і як Він йому промовляв, і як сміли́во навчав у Дамаску в Ісусове Йме́ння.
28 २८ मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.
І він із ними входив і вихо́див до Єрусалиму, і відважно звіщав в Ім'я́ Господа.
29 २९ शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते.
Він також розмовляв й сперечався з огре́ченими, а вони намагалися вбити його.
30 ३० जेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्यास कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्यास तार्सास पाठवले.
Тому браття, довідавшися, відвели́ його до Кесарі́ї, і до Та́рсу його відіслали.
31 ३१ अशाप्रकारे सर्व यहूदिया, गालील प्रांत, शोमरोन या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली; आणि, मंडळी पवित्र आत्म्याच्या सांत्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली.
А Церква по всій Юдеї, і Галілеї, і Самарі́ї мала мир, будуючись і ходячи в стра́сі Господньому, і сповня́лася втіхою Духа Святого.
32 ३२ मग असे झाले की, पेत्र यरूशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला, लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला.
І сталося, як Петро всіх обходив, то прибув і до святих, що ме́шкали в Лі́дді.
33 ३३ लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता.
Знайшов же він там чоловіка одно́го, на йме́ння Ене́й, що на ліжку лежав вісім років, — він розсла́блений був.
34 ३४ पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला.
І промовив до нього Петро: „Енею, тебе вздоровляє Ісус Христос. Уставай, і постели́ собі сам!“І той зараз устав.
35 ३५ लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
І його оглядали усі, хто мешкав у Лі́дді й Саро́ні, які навернулися до Господа.
36 ३६ यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती, तिचे नाव तबिथा होते, (ग्रीक भाषेत तिचे नाव “दुर्कस” होते. त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे गरीबांना दानधर्म करीत असे.
А в Йоппі́ї була одна у́чениця, на ймення Таві́та, що в перекладі Са́рною зветься. Вона повна була добрих вчинків та ми́лостині, що чинила.
37 ३७ जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले.
І трапилося тими днями, що вона занедужала й умерла. Обмили ж її й покла́ли в го́рниці.
38 ३८ यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.”
А що Лі́дда лежить недалеко Йоппі́ї, то учні, прочувши, що в ній пробуває Петро, послали до нього двох му́жів, що благали: „Не гайся прибути до нас!“
39 ३९ पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला, जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले, सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या, त्या रडत होत्या, दुर्कस जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले.
І, вставши Петро, пішов із ними. А коли він прибув, то ввели його в го́рницю. І обступили його всі вдови́ці, плачучи та показуючи йому су́кні й плащі, що їх Сарна робила, як із ними була́.
40 ४० पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली.
Петро ж із кімна́ти всіх ви́провадив, і, ставши навко́лішки, помолився, і, звернувшись до тіла, промовив: „Тавіто, вставай!“А вона свої очі розплю́щила, і сіла, уздрівши Петра.
41 ४१ त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले, त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती.
Він же руку подав їй, і підвів її, і закли́кав святих і вдовиць, та й поставив живою її.
42 ४२ यापोमधील सर्व लोकांस हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
А це стало відо́ме по ці́лій Йоппі́ї, і багато-хто в Господа ввірували.
43 ४३ नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहीला.
І сталось, що він багато днів пробув у Йоппі́ї, в одно́го гарбарника Си́мона.

< प्रेषि. 9 >