< प्रेषि. 6 >
1 १ त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, ग्रीक बोलणारे यहूदी लोक आणि इब्री बोलणारे यहूदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.
तस्मिन् समये शिष्याणां बाहुल्यात् प्रात्यहिकदानस्य विश्राणनै र्भिन्नदेशीयानां विधवास्त्रीगण उपेक्षिते सति इब्रीयलोकैः सहान्यदेशीयानां विवाद उपातिष्ठत्।
2 २ तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.
तदा द्वादशप्रेरिताः सर्व्वान् शिष्यान् संगृह्याकथयन् ईश्वरस्य कथाप्रचारं परित्यज्य भोजनगवेषणम् अस्माकम् उचितं नहि।
3 ३ तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू.
अतो हे भ्रातृगण वयम् एतत्कर्म्मणो भारं येभ्यो दातुं शक्नुम एतादृशान् सुख्यात्यापन्नान् पवित्रेणात्मना ज्ञानेन च पूर्णान् सप्प्रजनान् यूयं स्वेषां मध्ये मनोनीतान् कुरुत,
4 ४ म्हणजे, आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
किन्तु वयं प्रार्थनायां कथाप्रचारकर्म्मणि च नित्यप्रवृत्ताः स्थास्यामः।
5 ५ ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.
एतस्यां कथायां सर्व्वे लोकाः सन्तुष्टाः सन्तः स्वेषां मध्यात् स्तिफानः फिलिपः प्रखरो निकानोर् तीमन् पर्म्मिणा यिहूदिमतग्राही-आन्तियखियानगरीयो निकला एतान् परमभक्तान् पवित्रेणात्मना परिपूर्णान् सप्त जनान्
6 ६ त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले, आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
प्रेरितानां समक्षम् आनयन्, ततस्ते प्रार्थनां कृत्वा तेषां शिरःसु हस्तान् आर्पयन्।
7 ७ मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरूशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासास मान्यता दिली.
अपरञ्च ईश्वरस्य कथा देशं व्याप्नोत् विशेषतो यिरूशालमि नगरे शिष्याणां संख्या प्रभूतरूपेणावर्द्धत याजकानां मध्येपि बहवः ख्रीष्टमतग्राहिणोऽभवन्।
8 ८ स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन, लोकात मोठी अद्भूते व चिन्हे करत असे.
स्तिफानोे विश्वासेन पराक्रमेण च परिपूर्णः सन् लोकानां मध्ये बहुविधम् अद्भुतम् आश्चर्य्यं कर्म्माकरोत्।
9 ९ तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर व आलेक्सांद्रिये नगरातील काही लोक, आणि किलिकिया व आशिया. प्रांतातील काही लोक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
तेन लिबर्त्तिनीयनाम्ना विख्यातसङ्घस्य कतिपयजनाः कुरीणीयसिकन्दरीय-किलिकीयाशीयादेशीयाः कियन्तो जनाश्चोत्थाय स्तिफानेन सार्द्धं व्यवदन्त।
10 १० पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
किन्तु स्तिफानो ज्ञानेन पवित्रेणात्मना च ईदृशीं कथां कथितवान् यस्यास्ते आपत्तिं कर्त्तुं नाशक्नुवन्।
11 ११ तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, “आम्ही स्तेफनाला मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले.”
पश्चात् तै र्लोभिताः कतिपयजनाः कथामेनाम् अकथयन्, वयं तस्य मुखतो मूसा ईश्वरस्य च निन्दावाक्यम् अश्रौष्म।
12 १२ आणि लोकांस, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले, त्यांनी स्तेफनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले.
ते लोकानां लोकप्राचीनानाम् अध्यापकानाञ्च प्रवृत्तिं जनयित्वा स्तिफानस्य सन्निधिम् आगत्य तं धृत्वा महासभामध्यम् आनयन्।
13 १३ आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, ते म्हणाले, “हा मनुष्य या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूद्ध दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.
तदनन्तरं कतिपयजनेषु मिथ्यासाक्षिषु समानीतेषु तेऽकथयन् एष जन एतत्पुण्यस्थानव्यवस्थयो र्निन्दातः कदापि न निवर्त्तते।
14 १४ कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.”
फलतो नासरतीययीशुः स्थानमेतद् उच्छिन्नं करिष्यति मूसासमर्पितम् अस्माकं व्यवहरणम् अन्यरूपं करिष्यति तस्यैतादृशीं कथां वयम् अशृणुम।
15 १५ तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.
तदा महासभास्थाः सर्व्वे तं प्रति स्थिरां दृष्टिं कृत्वा स्वर्गदूतमुखसदृशं तस्य मुखम् अपश्यन्।