< प्रेषि. 5 >

1 तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली,
tadA anAniyanAmaka eko jano yasya bhAryyAyA nAma saphIrA sa svAdhikAraM vikrIya
2 मग त्याने त्या किंमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने ठेवून घेतला, आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.
svabhAryyAM j nApayitvA tanmUlyasyaikAMshaM sa Ngopya sthApayitvA tadanyAMshamAtramAnIya preritAnAM charaNeShu samarpitavAn|
3 तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?
tasmAt pitarokathayat he anAniya bhUme rmUlyaM ki nchit sa Ngopya sthApayituM pavitrasyAtmanaH sannidhau mR^iShAvAkyaM kathayitu ncha shaitAn kutastavAntaHkaraNe pravR^ittimajanayat?
4 ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय? आणि ती विकल्यानंतर त्याची आलेली किंमत तुझ्याच स्वाधीन नव्हते काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू मनुष्याशी नाही, तर देवाशी लबाडी केली आहे.
sA bhUmi ryadA tava hastagatA tadA kiM tava svIyA nAsIt? tarhi svAntaHkaraNe kuta etAdR^ishI kukalpanA tvayA kR^itA? tvaM kevalamanuShyasya nikaTe mR^iShAvAkyaM nAvAdIH kintvIshvarasya nikaTe. api|
5 तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले.
etAM kathAM shrutvaiva so. anAniyo bhUmau patan prANAn atyajat, tadvR^ittAntaM yAvanto lokA ashR^iNvan teShAM sarvveShAM mahAbhayam ajAyat|
6 तेव्हा काही तरूणांनी उठून त्यास गुंडाळले, व बाहेर नेऊन पुरले.
tadA yuvalokAstaM vastreNAchChAdya bahi rnItvA shmashAne. asthApayan|
7 त्यानंतर सुमारे तीन तासांनतर त्याची पत्नी आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते.
tataH praharaikAnantaraM kiM vR^ittaM tannAvagatya tasya bhAryyApi tatra samupasthitA|
8 तेव्हा पेत्राने तिला म्हटले, “मला सांग तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय.” आणि तिने म्हटले, “होय, एवढ्यालाच.”
tataH pitarastAm apR^ichChat, yuvAbhyAm etAvanmudrAbhyo bhUmi rvikrItA na vA? etatvaM vada; tadA sA pratyavAdIt satyam etAvadbhyo mudrAbhya eva|
9 पण पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पाहा ज्यांनी तुझ्या पतीला पुरले त्यांचे पाय दारापाशी आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील.”
tataH pitarokathayat yuvAM kathaM parameshvarasyAtmAnaM parIkShitum ekamantraNAvabhavatAM? pashya ye tava patiM shmashAne sthApitavantaste dvArasya samIpe samupatiShThanti tvAmapi bahirneShyanti|
10 १० तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला, आणि तरूण आत आले तेव्हा ती मरण पावलेली; अशी आढळली आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले.
tataH sApi tasya charaNasannidhau patitvA prANAn atyAkShIt| pashchAt te yuvAno. abhyantaram Agatya tAmapi mR^itAM dR^iShTvA bahi rnItvA tasyAH patyuH pArshve shmashAne sthApitavantaH|
11 ११ आणि सर्व मंडळीला व ज्यांनी या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले.
tasmAt maNDalyAH sarvve lokA anyalokAshcha tAM vArttAM shrutvA sAdhvasaM gatAH|
12 १२ तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भूते घडत असत. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत.
tataH paraM preritAnAM hastai rlokAnAM madhye bahvAshcharyyANyadbhutAni karmmANyakriyanta; tadA shiShyAH sarvva ekachittIbhUya sulemAno. alinde sambhUyAsan|
13 १३ आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत,
teShAM sa NghAntargo bhavituM kopi pragalbhatAM nAgamat kintu lokAstAn samAdriyanta|
14 १४ इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरूष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत.
striyaH puruShAshcha bahavo lokA vishvAsya prabhuM sharaNamApannAH|
15 १५ इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले.
pitarasya gamanAgamanAbhyAM kenApi prakAreNa tasya ChAyA kasmiMshchijjane lagiShyatItyAshayA lokA rogiNaH shivikayA khaTvayA chAnIya pathi pathi sthApitavantaH|
16 १६ आणखी यरूशलेम शहराच्या, आसपासच्या चहूकडल्या गावांतील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांस घेउन येत असत.
chaturdiksthanagarebhyo bahavo lokAH sambhUya rogiNo. apavitrabhutagrastAMshcha yirUshAlamam Anayan tataH sarvve svasthA akriyanta|
17 १७ तेव्हा महायाजक उठले आणि तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले.
anantaraM mahAyAjakaH sidUkinAM matagrAhiNasteShAM sahacharAshcha
18 १८ आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले.
mahAkrodhAntvitAH santaH preritAn dhR^itvA nIchalokAnAM kArAyAM baddhvA sthApitavantaH|
19 १९ परंतु त्यारात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले,
kintu rAtrau parameshvarasya dUtaH kArAyA dvAraM mochayitvA tAn bahirAnIyAkathayat,
20 २० “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.”
yUyaM gatvA mandire daNDAyamAnAH santo lokAn pratImAM jIvanadAyikAM sarvvAM kathAM prachArayata|
21 २१ हे ऐकून उजाडताच ते परमेश्वराच्या भवनामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले, इकडे महायाजक व त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले, आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
iti shrutvA te pratyUShe mandira upasthAya upadiShTavantaH| tadA sahacharagaNena sahito mahAyAjaka Agatya mantrigaNam isrAyelvaMshasya sarvvAn rAjasabhAsadaH sabhAsthAn kR^itvA kArAyAstAn ApayituM padAtigaNaM preritavAn|
22 २२ पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत, म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले,
tataste gatvA kArAyAM tAn aprApya pratyAgatya iti vArttAm avAdiShuH,
23 २३ “बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हास आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही.”
vayaM tatra gatvA nirvvighnaM kArAyA dvAraM ruddhaM rakShakAMshcha dvArasya bahirdaNDAyamAnAn adarshAma eva kintu dvAraM mochayitvA tanmadhye kamapi draShTuM na prAptAH|
24 २४ हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले.
etAM kathAM shrutvA mahAyAjako mandirasya senApatiH pradhAnayAjakAshcha, ita paraM kimaparaM bhaviShyatIti chintayitvA sandigdhachittA abhavan|
25 २५ इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले, पाहा, “ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर परमेश्वराच्या भवनात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत.”
etasminneva samaye kashchit jana Agatya vArttAmetAm avadat pashyata yUyaM yAn mAnavAn kArAyAm asthApayata te mandire tiShThanto lokAn upadishanti|
26 २६ तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील, असे त्यांना भय वाटत होते.
tadA mandirasya senApatiH padAtayashcha tatra gatvA chellokAH pAShANAn nikShipyAsmAn mArayantIti bhiyA vinatyAchAraM tAn Anayan|
27 २७ त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा महायाजकाने त्यांना विचारले,
te mahAsabhAyA madhye tAn asthApayan tataH paraM mahAyAjakastAn apR^ichChat,
28 २८ “या नावाने शिक्षण देऊ नका, असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले होते की नाही, तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम शहर भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”
anena nAmnA samupadeShTuM vayaM kiM dR^iDhaM na nyaShedhAma? tathApi pashyata yUyaM sveShAM tenopadeshene yirUshAlamaM paripUrNaM kR^itvA tasya janasya raktapAtajanitAparAdham asmAn pratyAnetuM cheShTadhve|
29 २९ परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे,
tataH pitaronyapreritAshcha pratyavadan mAnuShasyAj nAgrahaNAd IshvarasyAj nAgrahaNam asmAkamuchitam|
30 ३० ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले, त्यास आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले.
yaM yIshuM yUyaM krushe vedhitvAhata tam asmAkaM paitR^ika Ishvara utthApya
31 ३१ त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्यास आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
isrAyelvaMshAnAM manaHparivarttanaM pApakShamA ncha karttuM rAjAnaM paritrAtAra ncha kR^itvA svadakShiNapArshve tasyAnnatim akarot|
32 ३२ या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला, आहे तो सुध्दा साक्षी आहे.”
etasmin vayamapi sAkShiNa Asmahe, tat kevalaM nahi, Ishvara Aj nAgrAhibhyo yaM pavitram AtmanaM dattavAn sopi sAkShyasti|
33 ३३ हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.
etadvAkye shrute teShAM hR^idayAni viddhAnyabhavan tataste tAn hantuM mantritavantaH|
34 ३४ परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता, त्याने न्यायसभेत उभे राहून त्या मनुष्यांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले.
etasminneva samaye tatsabhAsthAnAM sarvvalokAnAM madhye sukhyAto gamilIyelnAmaka eko jano vyavasthApakaH phirUshiloka utthAya preritAn kShaNArthaM sthAnAntaraM gantum Adishya kathitavAn,
35 ३५ मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही या मनुष्यांचे काय करणार ह्याविषयी जपून असा.
he isrAyelvaMshIyAH sarvve yUyam etAn mAnuShAn prati yat karttum udyatAstasmin sAvadhAnA bhavata|
36 ३६ कारण काही दिवसांपूर्वी, थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे, असे म्हणू लागला, त्यास सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्यास मानत होते त्या सर्वाची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.
itaH pUrvvaM thUdAnAmaiko jana upasthAya svaM kamapi mahApuruSham avadat, tataH prAyeNa chatuHshatalokAstasya matagrAhiNobhavan pashchAt sa hatobhavat tasyAj nAgrAhiNo yAvanto lokAste sarvve virkIrNAH santo. akR^itakAryyA abhavan|
37 ३७ त्याच्यामागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले त्याचाही नाश झाला. व जितके त्यास मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली.
tasmAjjanAt paraM nAmalekhanasamaye gAlIlIyayihUdAnAmaiko jana upasthAya bahUllokAn svamataM grAhItavAn tataH sopi vyanashyat tasyAj nAgrAhiNo yAvanto lokA Asan te sarvve vikIrNA abhavan|
38 ३८ म्हणून मी तुम्हास आता सांगतो, या मनुष्यांपासून दूर राहा व त्याना जाऊ द्या कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल.
adhunA vadAmi, yUyam etAn manuShyAn prati kimapi na kR^itvA kShAntA bhavata, yata eSha sa Nkalpa etat karmma cha yadi manuShyAdabhavat tarhi viphalaM bhaviShyati|
39 ३९ परंतु ते देवाचे असल्यास तुम्हास ते नष्ट करता यावयाचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”
yadIshvarAdabhavat tarhi yUyaM tasyAnyathA karttuM na shakShyatha, varam IshvararodhakA bhaviShyatha|
40 ४० तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले, त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले.
tadA tasya mantraNAM svIkR^itya te preritAn AhUya prahR^itya yIsho rnAmnA kAmapi kathAM kathayituM niShidhya vyasarjan|
41 ४१ ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.
kintu tasya nAmArthaM vayaM lajjAbhogasya yogyatvena gaNitA ityatra te sAnandAH santaH sabhAsthAnAM sAkShAd agachChan|
42 ४२ आणि दररोज, परमेश्वराच्या भवनात व घरोघर शिकवण्याचे, व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.
tataH paraM pratidinaM mandire gR^ihe gR^ihe chAvishrAmam upadishya yIshukhrIShTasya susaMvAdaM prachAritavantaH|

< प्रेषि. 5 >